प्लेबॉय : एक असं मासिक जे कायम लपवून ठेवलं जायचं, लपून वाचलं जायचं

ह्यू हेफनर

फोटो स्रोत, Getty Images

शब्दांपेक्षा बोल्ड चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'प्लेबॉय' मासिकाची ही गोष्ट आहे.

हेफनर यांनी 1953 मध्ये त्यांच्या स्वयंपाकघरातून प्लेबॉय हे मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. 'प्लेबॉय' हे जगातील पुरुषांमध्ये सर्वाधिक विकलं जाणारं मासिक ठरलं होतं.

एक काळ असा होता जेव्हा या मासिकाच्या एका महिन्यात 70 लाख प्रती विकल्या जात होत्या.

पहिल्या अंकात मार्लेन मनरो

हेफनर यांचा जन्म 9 एप्रिल 1926 रोजी शिकागो येथे झाला. त्यांनी सुरुवातीला अमेरिकन सैन्यात लेखक म्हणून काम केलं आणि नंतर मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.

पुढे 1953 मध्ये त्यांनी 8,000 डॉलर इतकं कर्ज घेऊन 'प्लेबॉय'चा पहिला अंक प्रकाशित केला. यासाठी मदत म्हणून त्यांच्या आईने त्यांना 1,000 डॉलर एवढी रक्कम दिली.

प्लेबॉय

फोटो स्रोत, PLAYBOY

या मासिकाच्या विक्रीबद्दल हेफनर यांना फारसा विश्वास नव्हता आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या अंकात प्रकाशनाची तारीखही नमूद केली नव्हती.

मासिकाच्या पहिल्या अंकात त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री मार्लेन मनरोची नग्न छायाचित्रे प्रकाशित केली होती. हेफनर यांनी मनरोची ही छायाचित्रे 200 डॉलरमध्ये विकत घेतली होती. ही छायाचित्रे 1949 च्या कॅलेंडरसाठी पोझ करण्यात आली होती.

व्हीडिओ कॅप्शन, चॉकलेट खालल्याने सेक्स क्षमता वाढते का?

प्लेबॉय मासिकाची लोकप्रियता इतकी जास्त होती की त्याच्या कव्हर पेजवर नग्न छायाचित्रे प्रकाशित करण्यास महिला उत्सुक असायच्या.

हे मासिक पुरुषांमध्ये नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलं. पण यामधील कंटेंटमुळे त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं. या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसल्यानं अभिनेत्रींना प्रसिद्धी मिळते, असं म्हटलं जायचं. अनेक अभिनेत्रींनी आपलं बुडत चाललेलं करिअर सावरण्यासाठी या मासिकाचा आधार घेतला.

प्लेबॉय

फोटो स्रोत, Getty Images

या मासिकाच्या कव्हर पेजवर अनेक सेलिब्रिटी दिसले. यात जेन मॅन्सफिल्ड आणि पामेला अँडरसन यांच्याशिवाय बो डेरेक, किम बासिंगर, फराह फेवकट आणि मॅडोना यांचाही समावेश आहे.

हेफनर यांनी शिकागोमध्ये पहिला प्लेबॉय क्लब सुरू केला. यात 'प्लेबॉय'चा लोगो सशाच्या कानासारख्या टोप्या घातलेल्या वेट्रेसही होत्या. त्यानंतर हेफनर यांनी यूकेमध्ये तीन प्लेबॉय कसिनो सुरू केले.

डर्टी मॅगेझिन

'प्लेबॉय' मध्ये मार्टिन ल्यूथर किंग आणि जिमी कार्टर यांसारख्या दिग्गजांच्या मुलाखती देखील प्रदर्शित केल्या गेल्या. असं असलं तरी या मासिकावरील डर्टी मॅगेझिनचं लेबल कधीच हटलं नाही. या मॅगेझिनला कधीच लोकांच्या ड्रॉईंग रूममध्ये जागा मिळाली नाही. ते घरांमध्ये लपवून ठेवलं जायचं.

प्लेबॉय

फोटो स्रोत, Getty Images

या मासिकाची विक्री जसजशी वाढत गेली तसतसा धार्मिक गट आणि महिला हक्क संघटनांनीही त्याविरोधात जोर धरला. हे मासिक तरुण पिढीची दिशाभूल करत आहे, महिलांचे शोषण असे आरोप या मासिकावर करण्यात आले.

'प्लेबॉय'च्या मुखपृष्ठावर शर्लिन चोप्रा

पॉर्न आणि अॅडल्ट कंटेंट इंटरनेटवर सहज उपलब्ध असल्याने प्लेबॉयच्या निवृत्तीची वेळ आली आहे, असं वाटत होतं. पण हे मासिक डिजिटल, टेलिव्हिजन, फॅशन अशा अनेक अवतारात दिसलं आणि त्यानं सर्वत्र आपली जागा पक्की केली.

प्लेबॉयची लोकप्रियता अनेक सीमा पार करत भारतातही पोहोचली. त्यामुळे मग 'प्लेबॉय'नं आपल्या मासिकात भारतीय महिलांना स्थान देण्याचा विचार केला.

शर्लिन चोप्रा ही पहिली भारतीय महिला जिला मासिकात स्थान मिळालं होतं. 2012 मध्ये खुद्द शर्लिननं याबाबत माहिती दिली होती. या मॅगझिनसाठी तिनं न्यूड पोज दिली होती.

शर्लिन चोप्रा

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, शर्लिन चोप्रा

यानंतर 2013 मध्ये 'प्लेबॉय'ने गोव्यात भारतातील पहिला क्लब सुरू करण्याची योजना आखली. पण गोवा सरकारने ही मागणी फेटाळून लावली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं की, गोवा सरकार तांत्रिक कारणास्तव या प्रस्तावावर विचार करणार नाही.

हेफनर नेहमी म्हणायचे की, 'प्लेबॉय' हे सेक्स मॅगझिन नाही, तर ते एक लाईफस्टाईल मॅगझिन आहे, ज्यामध्ये सेक्स हा फक्त एक महत्त्वाचा भाग आहे.

प्लेबॉय

फोटो स्रोत, Getty Images

1970 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलं की, अमेरिकेतील एक चतुर्थांश महाविद्यालयीन तरुणांनी हे मासिक विकत घेतलं होतं.

हे वाचलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, 'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा नृत्य : जगातले सर्वांत सेक्सी नृत्य

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)