सुष्मिता सेननं तिला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना दिलं उत्तर...

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेननं उद्योगपती ललित मोदी यांच्यासोबतच्या नात्यामुळे तिला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय. सुष्मितानं तिला 'गोल्ड डिगर' म्हणजे 'पैशांसाठी हावरट' म्हटलं जात असल्याबद्दल खंत व्यक्त केलीय आणि हितचिंतकांचे आभार मानलेत.

भारतीय उद्योगपती ललित मोदी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यातील नात्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया समोर आल्या.

काही लोक ललित मोदींना टोमणे मारत आहेत की, त्यांच्या मोठ्या कालावधीपासूनच्या मेहनतीला यश मिळालं, तर काही लोक सुष्मिता सेनला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत.

आता सुष्मिता सेननं इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट करत, त्या फोटोसोबत लिहिलंय की, "हे दु:खद आहे की, आपल्या आजूबाजूचं जग दयनीय आणि दु:खी होत चाललीय. तथाकथित विचारवंत आपल्या सवयींमुळे, आपला मूर्खपणा आणि कधी रंजक गॉसिप्समुळे उपेक्षित... जे कधीच माझे मित्र नव्हते आणि ज्यांना मी कधीच भेटले नाही, असे सगळेच माझ्या आयुष्याबद्दल आणि चरित्राबद्दल वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत आहेत. ते स्वत: 'गोल्ड डिगर'पासून फायदा उठवत आहेत."

सुष्मितानं पुढे लिहिलंय की, "मी 'गोल्ड'च्या पुढच्या गोष्टींवर बोलते आणि नेहमीच डायमंड पसंत करते. आणि हो, मी आताही ते स्वत: खरेदी करू शकते."

"माझ्या सर्व हितचिंतक आणि निकटवर्तीयांचं समर्थन मिळाल्यानं चांगलं वाटलं. तुम्हाला सांगू इच्छिते की, तुमची सुश पूर्णपणे ठीक आहे, कारण मी कधीच इतरांच्या स्वीकृती आणि कौतुकाच्या प्रकाशावर जगत नाही. मी स्वत:च एक सूर्य आहे. स्वत:च्या आत आणि अंतरात्मात पूर्णपणे केंद्रित."

सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत सुष्मित सेनच्या ललित मोदीसोबच्या नात्यावर टीका केली गेली होती. ललित मोदी श्रीमंत असल्यानं सुष्मिता सेननं तिच्यापेक्षा वयानं मोठं असलेल्या व्यक्तीसोबत नातं जोडलं.

अभिनेत्री राखी सावंतचं असंच एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होतंय. जेव्हा पत्रकारांनी राखी सावंतला विचारलं की, ललित मोदी आयपीएलचे कमिशनर होते, त्यांच्यावर पैसे घेऊन पळाल्याचा आरोप आहे, तर राखी सावंत म्हणाली की, "पैसे घेऊन पळणाऱ्याला मोठ्या-मोठ्या हिरोईन्स तर मिळतीलच ना, पैसे नसतील तर कोण विचारतोय? हल्ली चेहरा किंवा अक्कलेचं कोण पाहत नाही."

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?

गोपाल दास नीरज नामक ट्विटर युजरनं म्हटलंय की, 'प्रेम एक भांडवलशाही विचार आहे, मुलींच्या स्वप्नात राजपुत्र येतात, कामगार नाही.'

करुणानिधी कनन नामक युजरनं लिहिलंय की, 'जर तुम्ही गोल्ड डिगर नाही, मग त्याला भारतात घेऊन या. लपवायचं कशाला?'

@tovijayprakash नामक युजरनं ट्वीट केलंय की, 'हेच खरंय की, तो पळपुटा आहे आणि त्याच्याकडे डॉलर असल्या कारणानेच तुम्ही त्याच्यासोबत नात्यात आहात, हे गोल्ड डिगरचाच प्रकार आहे'

सोशल मीडियावर सुष्मिता सेनचं समर्थन

सोशल मीडियावर अनेकांनी सुष्मिता सेनंच समर्थनही केलंय.

सुष्मिता सेनच्या पोस्टवर तिचं मनोबल वाढवताना अभिनेत्री प्रियंका चोप्रानं म्हटलं की, 'त्यांना सांग राणी'

@the_mimosa नामक एका युजरनं ट्वीट केलंय की, "जे लोक सुष्मिता सेनची वयस्कर व्यक्तीसोबत नातं जोडल्यामुळे खिल्ली उडवत आहेत आणि तिला 'गोल्ड डिगर म्हणत आहेत, त्यांना माहित आहे का, सुष्मिता यापूर्वी तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत नात्यात होती. तेव्हाही ती पैशासाठीच नात्यात होती का? नाही."

सुची एसएने लिहिलंय की, 'भारतीय आई-वडील, जे हुंड्याविना आपल्या मुलाचं लग्न करत नाहीत, तेच लोक सुष्मिता सेनला गोल्ड डिगर म्हणतायेत.'

अनु मित्तल या युजरनं लिहिलंय की, 'जर सुष्मिता सेन गोल्ड डिगर आहे, तर तुम्ही त्या पुरुषांना काय म्हणाल,जे लोक हुंडा मागतात. आणि लग्नानंतर सासरवाडीकडून भेटवस्तू आणि पैसे मागत राहतात.'

डॉ. सोनाली वैद यांनीही सुष्मिता सेनंचं कौतुक करत समर्थन केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)