You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Liger चा ट्रेलर रिलीज; विजय देवरकोंडाचा स्टायलिश लूक आणि माइक टायसनची चर्चा
अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या 'लायगर' सिनेमाचा ट्रेलर आज (21 जुलै) रिलीज झाला आहे.
हा चित्रपट साउथ सुपस्टार विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होत आहे.
या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरला सात तासांत जवळपास 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
चित्रपटातलं पहिलं गाणं (11 जुलै) रिलीज झालं होतं. अकडी पकडी गाणं रिलीज झाल्यावर अवघ्या काही तासांत ट्रेंड व्हायला लागलं.
2 जुलैला विजय देवरकोंडाचा लायगरमधला फर्स्ट लुक रिलीज केला गेला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. हातात फुलांचा गुच्छ घेतलेल्या त्याच्या न्यूड लुकमुळे चर्चा सुरू झाल्या.
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो पोस्ट करताना विजयनं लिहिलं होतं, "या चित्रपटाला मी सर्वस्व दिलंय...ही माझ्यासाठी मानसिक, शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक भूमिका आहे. मी तुला (भूमिकेला) सगळं दिलंय! कमिंग सून #LIGER"
8 जुलैला 'लायगर'च्या 'अकडी पकडी' गाण्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला.
'लेट्स सेलिब्रेट मास म्युझिक' असं म्हणत या गाण्याचा प्रोमो रिलीज केला. विजय देवरकोंडासोबतच या गाण्यात अभिनेत्री अनन्या पांडेचीही झलक पाहायला मिळते.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता काही दिवस उरले असताना इंटरेस्टिंग पद्धतीनं यातल्या कॅरेक्टर्स आणि इतर गोष्टींचं प्रमोशन करण्यात येत आहे.
'अकडी पकडी'च्या प्रोमोचं पोस्टर रिलीज करताना निर्माता करण जोहरनं म्हटलं होत, "पुढच्या 50 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल याची एक झलक...लेट्स सेलिब्रेट विथ सम मास म्युझिक! 'अकडी पकडी'- पहिलं गाणं 11 जुलैला येत आहे."
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'लायगर'मध्ये विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे, राम्या कृष्णन, रोनिक रॉय, विष्णू रेड्डी, मकरंद देशपांडे हे कलाकारही आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमीळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळममध्ये रिलीज होत आहे.
या चित्रपटाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रसिद्ध माजी बॉक्सिंगपटू माइक टायसन हाही स्क्रीन शेअर करत आहे. विजय देवरकोंडा या चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारत आहे. टायसन हा त्याच्या ट्रेनरच्या भूमिकेत असेल असं म्हटलं जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)