असादुद्दिन ओवेसीः भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही #5मोठ्याबातम्या

ओवेसी

फोटो स्रोत, ANI

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही- असादुद्दिन ओवेसी

भारतीय मुस्लिमांचा आणि मुघलांचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी हा प्रश्न फेसबुकवर विचारला आहे. भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

याच पोस्टमध्ये ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. संघामध्ये स्वाभिमान आणि सहानुभूती हे गुण शिकवले जात नाहीत. मदरशांमध्ये ते शिकवले जातात असं ओवेसी यात म्हणतात. या देशाला भारतीय मुसलमानांनी समृद्ध केलंय पुढेही करत राहातील असं ते म्हणतात.

2. तारकर्लीमध्ये बोट बुडून दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची बोट बुडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सने या अपघाताची बातमी दिली आहे. या अपघातात बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचे भाचे आकाश यांचा समावेश आहे.

या बोटीवर 20 जण होते. ही बोट स्कूबा डायव्हिंगसाठी पर्यटकांना घेऊन गेली होती. परतीच्या मार्गावर असताना झालेल्या अपघातात बोट बुडाली. या अपघातात दोघेजण जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर मालवणमध्ये उपचार सुरू आहेत. बोटीमधील सर्व पर्यटक पुणे जिल्ह्यातील आणि मुंबईत राहणारे होते. बोट उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

3. 'पंढरपूरसह देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप'

पंढरपूरचे विठोबा मंदिर, ओरिसातले जगन्नाथ मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर अशी देशातली अनेक मंदिरं पुर्वी चैत्यगृहं, विहार आणि स्तूप होते, असं मत डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ताने त्याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.

ही सर्व मंदिरं पुरोहितांच्या उत्पन्नाचे स्रोत बनली आहेत, त्यामुळे पुरोहितांनी ही मंदिरं हस्तांतरित करावीत असं मत आगलावे यांनी व्यक्त केलं आहे.

संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' (1929) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, "ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या." असं आगलावे सांगतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध धर्माचे देवालय असल्याचे म्हटले आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन." असा संदर्भ त्यांनी दिला आहे.

4. तुमचं पानिपत निश्चित- चित्रा वाघ

येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत निश्चित होणार आहे असं मत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. सकाळने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.

चित्रा वाघ

फोटो स्रोत, facebook

त्या म्हणतात, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार ? तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा, नाहीतर मुस्लीम लीगला घेऊन लढा, तुमचं पानिपत निश्चित आहे, असा इशारा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

5. भगवान श्रीरामाशी तुमचं काय वैर आहे? हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला प्रश्न

भगवान श्रीराम यांच्या तुमचं काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का करता अशा प्रश्न गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केला होता. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ट्वीटरवरुन त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचं काम करतो हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवतो असं मी आधीही म्हटलं होतं. माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असं विधान केलं होतं. भगवान श्रीरामाशी तुमचं काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का करता असा प्रश्न मला काँग्रेसला विचारायचा आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)