Sunny Leone : सनी लियोनीचं गाणं हटवलं, गाण्याचे बोलही बदलले

सनी लियोनी

फोटो स्रोत, SUNNYLEONE

फोटो कॅप्शन, सनी लियोनी

अभिनेत्री सनी लियोनीच्या एका म्युझिक व्हीडिओवरून वाद झाल्यानंतर सारेगामा कंपनीनं अखेर वादग्रस्त व्हीडिओ हटवला आहे. तर त्याऐवजी कंपनीनं शब्द बदलून नवं गाणं रिलीज केलं आहे.

सारेगामा कंपनीनं 'मधुबन मे राधिका नाचे' हे गाणं रिलीज केलं होतं. पण त्यावरून वाद झाल्यानंतर कंपनीनं ते गाणं मागं घेत बदल करून गाणं सादर करणार, असं सांगितलं होतं.

"गाण्याबाबत मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहता, देशातील नागरिकांच्या भावनांचा आदर करत आम्ही मधुबन गाण्याचं नाव आणि बोल बदलणार आहोत," असं सारेगामानं म्हटलं होतं.

त्यानुसार कंपनीनं युट्यूबवरून गाण्याचा व्हीडिओ हटवला आहे. तसंच सारेगामानं त्यांच्या वेबसाईटवर बदल केलेलं नवं ऑडिओ साँग अपलोड केलं आहे.

काय केला बदल?

सनी लियोनीवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याचे बोल 'मधुबन मे राधिका नाचे' असे होते. त्याचा व्हीडिओदेखील रिलीज करण्यात आला होता. पण आक्षेपानंतर त्यात आता बदल करण्यात आला आहे.

'मधुबन मे राधिका नाचे' ऐवजी आता या गाण्यामध्ये 'पनघटपे प्रेमिका नाचे' असे शब्द टाकण्यात आले आहेत. सारेगामाच्या नव्या साईटवर हे नवं गाणं ऑडिओ स्वरुपात उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावर आक्षेप घेत म्युझिक कंपनीसह अभिनेत्री सनी लियोनी आणि संगीतकारांना इशारा दिला होता.

काय होता वाद?

"काही लोक सातत्यानं हिंदुंच्या भावनांवर आघात करत आहेत. असाच एक निषेधार्ह प्रयत्न 'मधुबन में राधिका नाचे' या व्हीडिओद्वारे केला आहे. सनी लियोनी, शारीब आणि तोशी यांना मी इशारा देत आहे. जर त्यांनी तीन दिवसांत गाणं बदलून माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करू," असं नरोत्तम मिश्रा म्हणाले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नरोत्तम मिश्रा यांच्याशिवाय मथुरामधील पुजाऱ्यांनीही व्हीडिओ आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. तसंच हा व्हीडिओ हटवला नाही तर ते कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं होतं.

सनी लियोनीनं या गाण्याद्वारे बृजभूमीच्या प्रतिष्ठेला अपमानास्पदरित्या धुळीत मिळवलं आहे, असं अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी म्हटलं आहे.

या इशाऱ्यानंतर कंपनीनं लगेचच प्रतिक्रिया देत व्हीडिओ बदलला जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मंत्र्यांच्या इशाऱ्याचा उल्लेख न करता मिळालेल्या प्रतिक्रियांमुळं हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. त्यानुसार व्हीडिओ हटवत हे बदल करण्यात आले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)