बायकोकडे भिशीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या नवऱ्याचा खून, मग आत्महत्येचा बनाव

- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
बायकोकडे पैशांची मागणी करणाऱ्या नवऱ्याला बायकोनेच जीवे मारले आणि नंतर आत्महत्येचा बनाव देखील केला पण पोलिसांनी या गोष्टीचा छडा लवकरच लावला.
या घटनेप्रकरणी सिन्नर पोलिसांनी एका 38 वर्षीय महिलेला अटक केली आहे. महिलेने गुरुवारी आपल्या 42 वर्षीय पतीची हत्या केली होती.
पतीचा गळा आवळून खून करणाऱ्या 38 वर्षीय महिलेला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने गुरुवारी रात्री आपल्या 42 वर्षीय पतीचा खून केला होता, मात्र तिने पोलिसांत पतीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.
घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीने खून केल्याची कबुली दिली. त्यात तिला अटक केल्याची माहिती पोलिसांना दिली.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार सिन्नरमधल्या मुसळगाव इथे सीताराम गायकर हे पत्नी वनिता गायकर हिच्याबरोबर राहात होता.
त्यांना दोन मुले आहेत, सीताराम हा शाळेत वॉचमन होता, शाळेतील इमारतीच्या माळ्यावर हे कुटुंब रहात होते .
सीताराम ह्याला दारूचे व्यसन होते तर पत्नी वनिता घरकाम व इतर कामे करायची, पती सीताराम गायकरने पत्नी वनिताकडे भिशी भरण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली होती.
वनिता हिने पैसे नाही असे म्हणत नकार दिला तर पतीने बँकेतील मुदत ठेव मोडण्यासाठी आग्रह केला.
वनिता आणि मद्यधुंद अवस्थेतील सीताराम यांच्यात वादही झाला. रागाच्या भरात वनिताने घरातील फेटाच्या कापडाने गळा आवळत पाती सीतरामचा जीव घेतला.
हे कुटुंब एकटेच शाळेच्या परिसरात रहात होते, वस्तीपासून दूर असल्याने आजूबाजूला कुणालाही काहीच कळले नाही ,
तर दोन्ही मुले जवळच असलेल्या ही मावशीच्या गावी गेली होती.

एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रावसाहेब त्रिभुवन यांनी सांगितले की, "जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की खोलीच्या छताचे शिखर आणि कथित फाशीसाठी वापरलेली दोरी जुळत नाही."
"गळयावरचे व्रण पण वेगळे होते, तेव्हा त्यांना तिच्या पतीच्या हत्येमागे तीच असल्याचा संशय आला."
पोलिसांनी सांगितले की, "महिला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाही आणि तिने तिच्या पतीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वनिता गायकरला खूनाच्या आरोपाखाली अटक केली आहे."
आम्ही महिलेवर 302 चा गुन्हा दाखला केला असून आरोपी महिलेला 24 मे पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. आम्ही सखोल तपास करत आहोत , घटनेतील इतर मुद्दे तपासान्ती स्पष्ट होतील. असेही पोलिस उपनिरीक्षक त्रिभुवन यांनी संगितले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








