You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Panchayat Season 2 वेळेआधीच आला, सोशल मीडियावर आनंदाला उधाण
पंचायत या लोकप्रिय सीरिजचा दुसरा सीझन वेळेआधीच अमेझॉन प्राईमवर आल्याने नेटकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. अनेक सोशल मीडिया युझर्सने तातडीने सीरिज बघून प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
शहरातला एक तरुण अभिषेक उत्तर प्रदेशातल्या फुलेरा गावात ग्रामसचिव म्हणून येतो. शहरातल्या वातावरणातून एकदम गावात आल्याने त्याला अनेक धक्के बसतात. गावातली लोकं, त्यांची संस्कृती, राजकारण यांच्याशी जुळवून घ्यायला त्याला वेळ लागतो.
गावातले सरपंच आणि उपसरपंच त्याला या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करतात. त्यातून होणाऱ्या गंमतीजमती या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी या सीरिजचा पहिला सीझन आला होता. यावर्षी त्याचा दुसरा सीझन 20 तारखेला येणरा होता. तो कालच आल्याने प्रेक्षकांना आनंद झाल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून लक्षात येतं.
त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूया.
विमल कुमार नावाचे युझर म्हणतात, पंचायत सीरिज पाहिल्यावर या गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत असं वाटतं. तिथे घडत असलेल्या प्रत्येक क्षणाचे तुम्ही साक्षीदार आहात असं वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींनी कलाकार विनोद निर्माण करून आपल्याला आनंदी ठेवतात.
विजय भगत नावाचे युझर म्हणतात, की लौकी वाला सीन भारी आहे. मी फार हसलो, आतापर्यंत मी दोन एपिसोड पाहिले. त्यामुळे हा सीन कोणता याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल.
पीएस झा यांच्या मते दुसरा सीझन विनोदी आणि भावनिक दोन्ही आहे. सचिव जींची बदली झाली आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
सचिव जींच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीचा प्रवेश होणार आहे हेही एका युझरच्या प्रतिक्रियेवरून दिसतं. त्या व्यक्तीची तुलना स्वदेसमधल्या गायत्री जोशी शी केली आहे.
तर करी नावाचे एक युझर म्हणतात की त्यांच्या मते शेवट फारच अनपेक्षित होता.आमदार, राजकारणी कसे असतात याचं खरं चित्रण या सीरिजमध्ये दिसतं.
तर एका युझरने या सीरिजचा पहिला सीझनही पाहिलेला नाही. त्यामुळे हा समाज मला स्वीकारेल का असा खोचक चिमटा ते घेतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)