नाशिक : लहान मुलीनं मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी आणि मग....

बिबट्याचा बछडा

फोटो स्रोत, Pravin Thakare/bbc

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबानं तब्बल एक आठवडा बिबट्याच्या बछड्यासोबत काढला आहे. या कुटुंबानं त्याला मांजरीचं पिलू समजून घरी ठेवलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

मालेगाव तालुक्यातील मोरझर शिवार रावसाहेब गंगाराम ठाकरे यांचं शेत आहे आणि तिथचं घरही आहे. आठवडाभरापूर्वी शेतातील घराजवळ खेळत असताना मांजरीच्या पिल्लासारखे दिसणारे एक पिल्लू घरातील लहान मुलांना दिसले.

मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलं त्याच्यासोबत खेळायला लागले.

मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले आणि मग मात्र त्यांना घाम फुटला.

या बिबट्याची आई (बिबट्याची मादी) परत न आल्यानं अखेर बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. यावेळी मात्र शेतकरी कुटुंबाला गहिवरून आलं होतं.

अशी घेतली काळजी

या पिलाची शेतकरी कुटुंबानं घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली.

त्याला दररोज दीड लिटर दूध पाजले. इतकंच नव्हे तर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेऊन जाईल, अशी देखील काळजी घेतली.

बिबट्याचा बछडा

फोटो स्रोत, Pravin Thakare/bbc

मात्र वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घ्यायला आली नाही.

'बछडाही वस्ती सोडायला तयार नव्हता'

या प्रकरणाची माहिती देताना मालेगांवचे वनाधिकारी वैभव हिरे सांगतात, "गेल्या काही दिवसांपासून बिछड्याची मादी आणि तिचे बछडे दिसत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्रशासनाला मिळत होत्या. कृष्णराव रावसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेतशिवारात एक बछडा पाच ते सात दिवसांत वावरत असल्याचं वनविभागाला माहिती दिली. आम्ही तिथं गेलो असता एक बछडा त्याच्या कुटुंबापासून भरकटत मानवी वस्तीकडे आल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं."

बिबट्याचा बछडा

फोटो स्रोत, Pravin Thakare/bbc

"तो बछडा कृष्णराव ठाकरे यांच्या घराच्या आसपास फिरत असल्याचं दिसून आलं. तेव्हा घरातील लहान मुलांचा लळा बछड्याला लागल्याचं समोर आलं. तो बछडाही त्या मानवीवस्तीपासून दूर जायला तयार नव्हता. पण, हिंस्र श्वापद मानवीवस्तीत असणं धोकादायक असून आम्ही त्याला पकडलं आणि वनविभागाच्या ताब्यात दिलं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)