गिरीकुमार पाटीलः युक्रेनमध्ये अडकल्यावर म्हणतात, 'मी माझ्या बिबट्या-जग्वारबरोबरच येईन नाही तर नाही'

गिरी कुमार पाटील

फोटो स्रोत, Girikumar Patil

एका आठवड्यापेक्षा जास्त काळ एक भारतीय डॉक्टर त्यांच्या युक्रेनमधील घराच्या तळघरात त्याच्या पाळीव बिबट्या आणि जग्वारसह लपून बसले आहेत.

गिरीकुमार पाटील यांनी 20 महिन्यांपूर्वी किव्ह प्राणीसंग्रहालयातून ह्या दोन प्राण्यांना विकत आणलं होतं.

'बिबट्या आणि जग्वारला सोबत घेतल्याशिवाय घर सोडणार नाही,' असे ते सांगतात.

ते सहा वर्षांहून अधिक काळ रावरोडोनेत्स्कमध्ये राहत आहे. हे पूर्व युक्रेनमधील दोनबास प्रदेशातील एक लहान शहर आहे.

युक्रेन आणि रशिया मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, अविवाहित डॉ. गिरीकुमार सकाळी तळघरातून बाहेर पडतात. कर्फ्यू उठवल्यावरच त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी अन्न विकत घ्यावं लागतंय.

नर जग्वार 20 महिन्यांचा आहे तर बिबट्याचे पिल्लू सहा महिन्यांचे असून मादी आहे.

ते स्पष्ट करतात की जग्वार हा नर बिबट्या आणि मादी जग्वारचा एक दुर्मिळ प्रकारचा संकर आहे.

गिरीकुमार यांनी सांगितलंय की त्यांनी आतापर्यंत जवळपासच्या गावातून 23 किलो मेंढ्याचं मांस, टर्की आणि कोंबड्या विकत घेतल्या आहेत. आणि त्यासाठी सामान्य किमतीपेक्षा चौपट किंमत मोजावी लागलीये.

40 वर्षीय गिरीकुमार म्हणतात, "माझे पाळीव प्राणी तळघरात माझ्यासोबत रात्र घालवत आहेत. आमच्या आजूबाजूला खूप गोंधळ चालू आहे. अशा परिस्थितीत हे प्राणी घाबरले आहेत. त्यांच्या जेवणावर अशा प्रकारच्या गोंधळाचा परिणाम झालाय, आणि त्यांचं जेवणसुद्धा कमी झालंय. अशा परिस्थितीत मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही."

"संघर्षाला सामोरे जाण्याचा हा माझा दुसरा अनुभव आहे. पण ह्या वेळची लढाई भयानक स्वरूपाची आहे असे ते म्हणतात.

गिरीकुमार म्हणाले की ते पूर्वी लुहान्स्कमध्ये राहत होते जिथे रशियाच्या पाठिंब्याने बंडखोर युद्धबंदी करार असूनही 2014 पासून युक्रेनियन सैन्याविरुद्ध लढत आहेत.

त्यांनी सांगितलं की, त्यांच घर आणि त्यांनी उघडलेलं भारतीय रेस्टॉरंट या भागातील लढाईदरम्यान नष्ट झालंय.

त्यानंतर ते शंभर किलोमीटर दूर असलेल्या सेवेरोडोन्त्स्क येथे गेले. तेथे त्यांनी एक नवीन जागा विकत घेतली, वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि तसेच छंद असल्याने नवीन पाळीव प्राणीसुद्धा विकत घेतले.

ते म्हणतात, "मी आता एका युद्धात अडकलोय. यावेळी मी खरोखर काळजीत आहे. माझे पालक फोन करून मला घरी परतण्यास सांगत आहेत, पण मी माझ्या पाळीव प्राण्यांना सोडू शकत नाही.

मूळचे आंध्र प्रदेशातील गिरीकुमार यांनी सांगितलय की, कीव्ह प्राणीसंग्रहालयाच्या 20 महिन्यांपूर्वी त्यांनी हे प्राणी खरेदी करण्यासाठी 35 हजार डॉलर्स खर्च केले होते.

गिरीकुमार पाटील

फोटो स्रोत, Girikumar patil

प्राणीसंग्रहालय प्रशासन लोकांना प्राणी विकत घेण्याची परवानगी देते जर प्राण्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल तर तिथले प्राणीसंग्रहालय प्रशासन लोकांना प्राणी विकत घेण्याची परवानगी देते, असं पाटील यांनी सांगितलं.

गिरीकुमार यांनी प्राणिसंग्रहालयाने दिलेले प्राण्यांचे जन्म प्रमाणपत्रही बीबीसीला दाखवले.

गिरीकुमार पाटील यांनी सांगितले की, 2007 मध्ये ते वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनला गेले होते.

पाटील सांगतात की, ते 2007 मध्ये वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनला आले होते. 2014 पासून त्यांनी ऑर्थोपेडिक म्हणून सराव सुरू केला. आता ते सेवेरोडोनेत्स्क येथील सरकारी रुग्णालयात काम करतात.

युद्ध सुरू झाल्यापासून हे रुग्णालय बंद आहे. ते म्हणतात, ते खासगी सरावही करतात. पाटील सेवेरोडोनेत्स्क येथे सहा खोल्यांच्या दुमजली घरात राहतात. त्यांच्या घरात जनावरांसाठी शेडही आहे.

ते म्हणतात की त्याची बहुतेक कमाई त्यांच्या पाळीव प्राण्यांना जाते. त्याच्याकडे तीन कुत्री आहेत. ते यूट्युब चॅनलद्वारे अधिकाधिक पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये ते त्यांच्या दोन मोठ्या मांजरींचे व्हिडिओ टाकतात. पाटील यांचे युट्युब चॅनलवर 85,000 सबस्क्रायबर्स आहेत.

पाटील म्हणतात, "मी दक्षिण भारतीय चित्रपटांतील स्टार चिरंजीवीला एका चित्रपटात बिबट्यासोबत पाहिले होते. तेव्हापासून मला मोठ्या मांजरींचे आकर्षण आहे. पाटील हे नेहमी कुत्रे, मांजर, पक्षी घरात ठेवतात. हायस्कूल आणि कॉलेजनंतर पाटील यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केला होता.

युक्रेनमध्येही पाटील यांनी स्थानिक चित्रपट आणि मालिकांमध्ये विदेशी भूमिका साकारल्या आहेत. पाटील यांच्या घरापासून रशियन सीमा 80 किमी अंतरावर आहे परंतु रशियन सैन्याच्या उपस्थितीमुळे तेथे पोहोचणे कठीण झालंय. युद्धामुळे वीज आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असली तरी पाटील हे सोशल मीडियावर सातत्याने व्हिडिओ पोस्ट करतायेत.

पाटील म्हणतात, "येथे मी एकमेव भारतीय आहे. मी रात्री एकटाच असतो. माझे बहुतांश शेजारी जवळच्या गावात गेले आहेत. मी कुठेही जात नाहीये.''

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)