मणिपूर : लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, कर्नलच्या कुटुंबासह 7 जण ठार

फोटो स्रोत, Reuters
मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये एक कर्नल, त्यांची पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलासह आसाम रायफल्सचे चार जवान ठार झाले.
या हल्ल्यातील मृतांमध्ये 46 असम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांचा समावेश होता.
हा हल्ला दिहेंग परिसरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर झाला असून, त्यात इतर चार जवानही जखमी झाले असल्यांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. "शहिदांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही," अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
"मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला हल्ला भ्याड हल्ला आहे. या हल्ल्यात देशानं पाच जवान गमावले आहेत. त्यात कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा समावेश आहे."
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी, राज्यातील पोलिस आणि निमलष्करी दल कट्टरतावाद्यांचा शोध घेत असल्याचं सांगितलं आहे.
देशाचं रक्षण करण्यास सरकार असमर्थ-राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला केला.
"मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार देशाचं संरक्षण करण्यास असमर्थ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शहिदांना श्रद्धांजली आणि कुटुंबीयांप्रती माझ्या शोक संवेदना. देश तुमचं बलिदान कधीही विसरणार नाही," असं राहुल गांधींनी लिहिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीया घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. हा भ्याड हल्ला असून देशाला न्यायाची प्रतीक्षा आहे, असं ममता म्हणाल्या.
"आपण एक सीओ आणि त्यांच्या कुटुंबांसह पाच शूर सैनिक गमावले आहेत, याचं मला प्रचंड दुःख आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहे. संपूर्ण देश न्यायाची प्रतीक्षा करत आहे," असं ट्विट त्यांनी केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)