नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधातल्या लसीचा दुसरा डोस घेतला. आज सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी लस घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मार्चला पहिला डोस घेतला होता. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.

जेव्हा पंतप्रधानांनी पहिला डोस घेतला होता तेव्हा ते म्हणाले होते, "आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी."

आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देश कोव्हिडमुक्त करूया असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लस देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात साधारणत: 1.5 कोटी लोकांना ही लस देण्यात आली. सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकारी तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारण्यात आली आहे. लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. कोणाला लस मिळू शकते यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.

1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. 45 वर्षांपुढील नागरिकांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. आज सकाळी ( 1 मार्च) पासून नोंदणीला सुरुवात झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)