You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मन की बात : नरेंद्र मोदी यांचा पाणी वाचवण्याचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर मनकी बात या कार्यक्रमाच्या 74 व्या एपिसोडचं प्रसारण आज (28 फेब्रुवारी) झालं. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी पाणी वाचवण्याचा संदेश सर्वांना दिला.
माघ महिन्यापासून भारतात उन्हाळ्याची सुरुवात होते. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे आपल्या सर्वांना पाणी जपून वापरावं लागेल. पाणी हेच जीवन आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्रतिबंधक नियमांचं पालन सर्वांनी करावं, असं मोदी यांनी म्हटलं.
माघ महिना संत रविदास यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णहोत नाही, त्यांनी दिलेला संदेश महत्त्वपूर्ण आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
पाणी वाचवा
- लोखंडाला सोन्यात रुपांतरीत करणाऱ्या पारसापेक्षाही पाण्याचं महत्त्व जास्त
- पाणी आपल्यासाठी जीवन आणि आस्था
- पाणी वाचण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
राष्ट्रीय विज्ञान दिवस
- सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा.
- आपल्याला भारताच्या वैज्ञानिकांबद्दल माहिती असणं आवश्यक
- विज्ञान म्हटलं तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्यासाऱख्या विषयांपर्यंत मर्यादित विचार केला जातो.
- आपल्याला याचा आवाका वाढवावा लागेल.
- आंध्र प्रदेशातील व्यंकट रेड्डी यांनी ड जीवनसत्त्वाचं मुबलक प्रमाण असलेल्या गव्हाचं पीक घेतलं. आपल्याला अशा प्रकारे संशोधन करावं लागेल.
- गुजरातमधील एका शेतकऱ्याने शेवग्याच्या शेंगांच्या चांगल्या दर्जाचं उत्पादन घेतलं.
- शेती क्षेत्रात विज्ञानाचा प्रयोग करावा
- संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची आवश्यकता नाही.
आत्मनिर्भर भारत
- आत्मनिर्भर भारत एक नॅशनल स्पिरीट बनावं.
- भारतात बनलेली सर्व प्रकारची लहान-मोठी उत्पादनं आपला अभिमान उंचावतात.
- आपल्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.
- बिहारमधील एक तरूण दिल्लीत LED कारखान्यात काम करत होता.
- कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतर त्यांनी काहीच महिन्यांत एलईडी बल्ब बनवण्याचा कारखाना टाकला.
- देशात अशा प्रकारची अनेक उदाहरणं सापडतील.
पर्यावरण
- आसाममध्ये धबधब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
- आसाममध्ये वनसंरक्षणाबाबत उत्तम काम सुरू.
- मंदिरांजवळच्या तलावांचा उपयोग कासवांच्या विलुप्त प्रजातींच्या संवर्धनासाठी केला जात आहे.
- पर्यावरण संवर्धनासाठी एकत्रित काम.
सैनिकी प्रशिक्षण
- ओडिशातील नायक सरांचं कार्य कौतुकास्पद
- नायक सर विद्यार्थ्यांना सैन्यात सहभागी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण देतात.
- नायक सरांचे अनेक विद्यार्थी भारतीय सैन्यात मोठ्याप्रमाणात यश मिळवतात.
- नायक सरांना स्वतः पोलीस दलात प्रवेश मिळवण्यात अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता अनेकांना मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
भाषा
- तमीळ न शिकल्याची अजूनही खंत
- तमीळ ही जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक.
- स्टेच्यू ऑफ युनिटीसमोर संस्कृत भाषेत माहिती देणारे गाईड उपलब्ध
- वाराणसीमध्ये संस्कृत भाषेत क्रिकेट समालोचन
- टीव्ही येण्यापूर्वीपासून खेळांचं समालोचन केलं जातं.
- समालोचन समृद्ध असलेल्या खेळांचा प्रचार प्रसार लवकर होतो.
- वेगवेगळ्या खेळांचं समालोचन मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक
परीक्षा
- येणारा काळ परीक्षांचा, तरूणांसाठी महत्त्वाचा.
- वॉरीयर बना, वरीयर नको.
- शांत चित्ताने परीक्षा द्या.
- यंदाच्या वर्षीही परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन करणार
- यासाठी तुमच्या प्रतिक्रिया MyGov किंवा नरेंद्र मोदी अॅपवर पाठवून द्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)