उत्तराखंड: ऋषभ पंत चेन्नई टेस्टचं मानधन हिमस्खलन पीडितांना देणार

फोटो स्रोत, Ryan Pierse
क्रिकेटपटू ऋषभ पंतने उत्तराखंडमध्ये रविवारी (7 फेब्रुवारी) झालेल्या हिमस्खलन दुर्घटनेतील पीडितांसाठी चेन्नई टेस्टचं मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऋषभ उत्तराखंडमधल्या रुरकीचा आहे.
"उत्तराखंडमधील दुर्घटनेने मी अतिशय व्यथित झालो आहे. या अपघातात जीव गमावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो. या दुर्घटनेतील पीडितांकरता चेन्नई टेस्टचं मानधन देण्याचा निर्णय मी घेतला आहे.
लोकांनाही माझं हेच आवाहन असेल. या अपघातात जखमी झालेल्यांना यातून सावरण्यासाठी बळ मिळावं. मदतकार्याद्वारे अडकलेल्यांची सुटका व्हावी यासाठी प्रार्थना," असं ऋषभ पंतने म्हटलं आहे.
दरम्यान, ब्रिस्बेन टेस्टमध्ये 97 रन्सची खेळी करणाऱ्या ऋषभला आयसीसीने 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्काराने गौरवलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचा दुसरा डाव 36 रन्समध्येच आटोपला होता. नीचांकी स्कोअरची नोंद झाल्याने टीका होणं साहजिक होतं. केवळ 40 मिनिटात टीम इंडियाचा घात झाला होता. मात्र त्याने खचून न जाता टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांनी बिनधास्त खेळ केला. या युवा शिलेदारांमध्ये ऋषभ पंतची भूमिका महत्त्वाची होती.
ऋषभ पंतने सिडनी टेस्टमध्ये 97 रन्स करताना ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर जे आक्रमण केलं ते विलक्षण होतं. ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त रन्सचं लक्ष्य समोर असतानाही ऋषभने नाबाद 89 रन्सची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. ऋषभला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
ऋषभने आतापर्यंत 16 टेस्ट, 16 वनडे आणि 28 ट्वेन्टी-20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ऋषभ दिल्लीसाठी खेळतो.
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळणाऱ्या ऋषभच्या नावावर दोन शतकंही आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टेस्टमध्ये शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रमही ऋषभच्या नावावर आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








