You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC च्या पूर्वपरीक्षेसाठी केंद्र बदलण्याची सवलत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र काही दिवसांपूर्वीच UPSC नं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे.
परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर बुधवारी (1 जुलै) UPSC नं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीचं केंद्रही बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
युपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ज्या केंद्राची निवड केली ते बदलायचं असल्यास 7 ते 13 जुलै 2020 किंवा 20 ते 24 जुलै 2020 या काळात केंद्र बदलता येईल.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बदल करून दिला जाणार आहे. एखाद्या केंद्राची क्षमता संपल्यास ते उमेदवारांना उपलब्ध होणार नाही.
अर्जही मागे घेता येणार
बुधवारी (1 जुलै) प्रसारित केलेल्या निवेदनात अर्ज मागे घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. एक ते 8 ऑगस्ट या काळात परीक्षेचा अर्ज मागे घेण्याची मुभा आयोगाने दिली आहे.
परीक्षेच्या इतर अटी आणि नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक
राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 ला होणार आहे. PSI STI आणि ASO या अराजपात्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला तर अभियांत्रिकी सेवेची पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होणार आहे.
या कोणत्याही परीक्षांच्या मुख्य परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता परीक्षेच्या आयोजनाचा आढावा वेळोवेळी घेण्यात येईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी MPSC ची वेबसाईट सतत पाहात रहावी असं आवाहन आयोगाने केलं आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी 5 एप्रिलला नियोजित होती. त्यानंतर ती 26 एप्रिलला करण्यात आली आणि त्यानंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी युपीएससीनेही पूर्वपरीक्षेची तारीख बदलून 31 ऑक्टोबर केली आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)