You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई-महाराष्ट्रातून आलेल्या 75 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग - योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
23 मे रोजी आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, "आतापर्यंत उत्तर प्रदेशात 23 लाख कामगार आणि मजुरांना इतर राज्यांतून आणण्यात आले. यामध्ये रेल्वे, बस आणि खासगी वाहनातून आलेली लोकही आहेत."
योगी आदित्यनाथ म्हणाले, "मुंबईहून युपीत परतलेल्या मजुरांपैकी 75 टक्के मजुरांना तर दिल्लीहून आलेल्यांपैकी 50 टक्के मजुरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच इतर राज्यांमधून आलेल्यांपैकी 20-30 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. यामुळे ही परिस्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक असून आमची टीम यावर काम करतेय."
75 हजारांहून अधिक वैद्यकीय टीम्स केवळ स्क्रीनिंगचे काम करत आहेत. वैद्यकीय स्क्रीनिंग, टेस्टिंग आणि विविध रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे आम्ही कोरोनाचा फैलाव रोखू शकलोय, असंही ते म्हणाले.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मात्र योगी यांच्या वक्तव्यावर काही प्रश्न उपस्थित केलेत. ट्वीटरवर त्यांनी सहा प्रश्न विचारले आहेत.
त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, "मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रातून आलेले 75 टक्के, दिल्लीहून आलेले 50 आणि इतर राज्यांतून आलेले 25 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हा याचा अर्थ उत्तर प्रदेशात 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे असं समजायचं का ? पण सरकारी आकड्यांनुसार कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 228 सांगितली जात आहे."
प्रियांका गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
1) बाहेरुन परतलेल्या मजुरांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे, तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झालाय हे कोणत्या आधारावर सांगितले गेले ? ही टक्केवारी कुठून आली ?
2) जर हे खरं असेल तर इतक्या कमी टेस्ट का होत आहेत ?
3) हे आकडे उत्तर प्रदेश सरकारच्या इतर आकड्यांप्रमाणेच बेजबाबदार आहेत का ?
4) मुख्यमंत्री योगी जे सांगत आहेत ते सत्य आहे तर सरकारने पारदर्शी काम करून टेस्टिंग, संसर्ग झाल्याचा डेटा आणि इतर तयारी याची माहिती जनतेला द्यावी.
5) शिवाय, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारची किती तयारी आहे, हे सुद्धा सांगावे.
उत्तर प्रदेशात 6 हजार 268 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. आतापर्यंत 161 लोकांचा मृत्यू झालाय. तर 3 हजार 538 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्याची सगळीकडेच चर्चा होतेय. त्यात प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केल्याने मोठ्या संख्येने लोकांनी त्याला प्रतिसाद देत योगींवर टीका केलीय. तर काहींनी समर्थन केलंय.
सुजीत सिंह या ट्विटर युजरने ट्वीट करून प्रश्न उपस्थित केला आहे. "योगींनी दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात कोरोनाचे अडीच लाखहून अधिक रुग्ण आहेत. पण अधिकृत आकडा जवळपास 6 हजार इतका सांगितला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आकडेवारी लपवत आहेत का?"
तर नीरज शर्मा नावाच्या युजरने महाराष्ट्रातील परिस्थितीवर ट्वीट केलंय. महाराष्ट्रात "तीन राजकीय पक्ष सत्तेत असून एक राज्य सांभाळू शकत नाहीत. पण पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहतात. यूपीची एवढी काळजी केली जातेय. तेव्हा यूपीत निवडणुका तर होणार नाहीत ना?"
राम चौधरी यांनी ट्वीट करत प्रियांका गांधींना प्रश्न विचारलाय. प्रियांका गांधीनी राजस्थान सरकारलाही असे आवाहन केले पाहिजे. काँग्रेसने "स्वत:च्या घरीही लक्ष द्यायला हवं," असा टोला त्यांनी लगावलाय.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)