You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबईः 100 कोरोनाग्रस्त मातांचं बाळंतपण या रुग्णालयानं कसं केलं?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी भारत प्रतिनिधी
भारतात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण आर्थिक राजधानी मुंबई शहरात आहेत. मुंबईत आता गरोदर मातांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. अशातच मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये 100 हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती झाली आहे.
लोकमान्य टिळक महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांत 115 पैकी 3 नवजात बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रसुतीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली. पण काही दिवसांनंतर टेस्ट केल्यानंतर ते बरे झाले आहेत. अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन हॉस्पिटलमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मातांची प्रसुती सी सेक्शनद्वारा झाली तर उर्वरित मातांची नैसर्गिक प्रसुती झाली. जन्म झालेल्या बाळांमध्ये 56 मुलगे तर 59 मुली आहेत. यापैकी 22 गरोदर मातांना इतर हॉस्पिटलमधून उपचारासाठी इथे पाठवण्यात आले होते. या गर्भवतींना कोरोनाची बाधा नेमकी कशामुळे होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. घरी, हॉस्पिटलमध्ये की इतर कुठून याचा शोध घेता येत नाही.
कोरोनाची लागण झालेल्या गरोदर मातांसाठी विशेष वॉर्ड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 65 डॉक्टर्स आणि 12 नर्सची टीम यासाठी काम करत आहे. सध्या 40 बेड्सचा हा वॉर्ड आहे ज्यामध्ये आणखी 34 बेड्स वाढवले जाणार आहेत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
गरोदर मातांच्या प्रसुतीसाठी तीन ऑपरेशन थिएटर आहेत. ज्यामध्ये डॉक्टर्स,नर्स आणि भूल देणारे डॉक्टर्स सुरक्षा किट वापरुन प्रसुती करत आहेत.
"अधिकतर कोरोनाबाधित गरोदर मातांना कोणतीही लक्षणं नाहीत ही आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. काही महिलांना ताप आणि श्वास घेण्याच्या तक्रारी आहेत. आम्ही त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठवत आहोत." गायनॅकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांनी सांगितले.
"गरोदर महिलांमध्ये प्रचंड भीती आहे. आम्ही मेलो तरी चालेल पण आमच्या बाळाला वाचवा अशी विनंती त्या सारखी आम्हाला करत असतात." बाळाला जन्म दिल्यानंतर मातांना कोव्हिड -19 वॉर्डमध्ये आठवडाभर उपचारासाठी दाखल केल जाते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या माध्यमातून उपचार केले जातात. त्यानंतर 10 दिवस क्वारंटाइन केंद्रात पाठवले जाते. नवजात बाळाला वेगळे न ठेवता आईला मास्क वापरुन दूध पाजण्याची परवानगी दिली जाते.
चीनमधिल वुहान येथे फेब्रुवारी महिन्यात नवजात बाळाला जन्माच्या 30 तासांनंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर शिकागो येथे मार्च महिन्यात कोरोनामुळे बाळाचा मृत्यू झाला. अमेरिकेत कोरोनामुळे 1 वर्षाखालील बाळाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. तर अमेरिकेतील कनेक्टिकट येथे सहा आठवड्याच्या बाळाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. वेल्समध्ये या महिन्याच्या सुरुवातीलाच अगदी तीन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. त्याची आई कोरोना बाधित होती.
बाळाशी आईचा थेट संपर्क होण्याआधी गर्भायशात किंवा प्रसूतीवेळी बाळाला कोरोनाची लागण होणं दुर्मीळ असल्याचं डॉ. अडम रॅटनर सांगतात. ते न्यूयॉर्क स्कूल ऑफ मेडिसिनच्या पेडिएट्रिक इनफ्किशियस डिसीज विभागाचे संचालक आहेत. याबाबत सध्यातरी काही ठोस सांगता येणार नाही. "ही परिस्थिती सातत्याने बदलत असून याविषयी नविन गोष्टी समोर येतील." असंही त्यांनी सांगितलं.
डॉ. रॅटनर यांच्यानुसार, नविन डेटा सांगतो की गरोदर महिलेच्या प्लॅसेंटल टिश्यूत कोरोना व्हायरस आढळू शकतो. कोरोना बाधित गरदोर मातेच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं असल्यचं डॉक्टर सांगतात. "पण अशा रुग्णांमध्ये थेट बाधा होण्याव्यतिरिक्त काही कारणं असू शकतात."
नवजात बाळाच्या शरिरात 'अँटीबॉडी प्रतिक्रिया' होत असल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये गर्भाशयात किंवा प्रसूतीवेळी इनफेक्शन झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आल्याचं डॉ. रॅटनर सांगतात.
"हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून अशा प्रश्नांची सतत दखल घ्यायला हवी. जरी बाळाला गर्भाशयातून कोरोनाची बाधा होत नसली तरी कोरोना बाधित गरोदर मातेकडून नवजात बालकाचा जन्म याविषयाकडे लक्ष द्यायला हवे." असं डॉ. रॅटनर सांगतात.
डॉ. रॅटनर यांच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित मातांच्या पोटी जन्मलेल्या बाळांसाठी ते मदत करत आहेत. "आम्ही कोरोना बाधित आईला बाळाला दूध पाजण्याची परवानगी दिली आहे. बाळाला कोरोना व्हायरसची लागण होणार नाही यासाठी आम्ही विशेष काळजी घेत आहोत."
डॉ. रॅटनर यांनी सांगितलं. "लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा झाली तरी ते यातून बाहेर पडतात असं माझं निरीक्षण आहे." त्यांनी सांगितलं.
मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या काही काळात बाळाला जन्म देणाऱ्या एकूण मातांपैकी 20 टक्क्यांहून काही अंशी अधिक गरोदर मातांना कोरोनाची लागण झाली आहे.
"आम्हाला एका प्रकरणाचे प्रचंड दु:ख वाटले. ज्यामध्ये 28 वर्षांच्या आईचा निरोगी बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. त्यांचे यकृत निकामी झाले होते." डॉ. नायक यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)