You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींनी 'मन की बात'मध्ये मांडलेले 15 मुद्दे
"कोरोनाचं संकट मोठं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक कोरोनाविरुद्ध लढतो आहे. परंतु अतिआत्मविश्वासाने वागू नका. हलगर्जीपणा दाखवू नका. सावधानी हटी तो दुर्घटना घटी हे वचन लक्षात ठेवा", असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला.
रविवारी पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला अक्षय तृतीया आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
मोदींना या कार्यक्रमात मांडलेले प्रमुख मुद्दे
1. भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन अर्थात लोकाभिमुख आहे.
2. शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लोक ज्या शाळेत थांबलेत तिथं रंगरंगोटी करत आहेत. हीच ती पीपल ड्रिव्हन लढाई.
3. Covidwarriors.gov.in या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारनं डॉक्टर, आशा, NCC यांना एकत्र जोडण्यात आलं आहे. तुम्हीही कोव्हिड वॉरियर बनू शकता.
4. देशातल्या सगळ्या भागात औषधीपुरवण्यासाठी 'लाईफलाईन उडान' हा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत 500 टनांहून अधिक औषधी देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्यात आली आहे.
5. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
6. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
7. आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत.
8. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आज भारताचे आभार मानत आहेत. तेव्हा मान अभिमानानं उंचावते.
9. कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात गरम पाणी पिणे, काढा पिणे असे अनेक उपाय सांगितले आहेत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
10. जगानं योगाला ज्यापद्धतीनं स्वीकारलं, त्यापद्धतीनं लवकरच जग आयुर्वेदाचा स्वीकार करेल. तरुणांनी आजच्या भाषेत आयुर्वेद जगापर्यंत पोहोचवायला हवा. आता मास्कविषयीची आपली मानसिकता बदलत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय सोडली पाहिजे.
11. आज अक्षय्य तृतीयेचा दिवस. पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं. अन्नदाता शेतकरी काम करत आहेत. नवं काही सुरू करण्याचा दिवस आहे. धरतीला अविनाशी बनवण्याचा संकल्प घेऊ शकतो. बसवेश्वर यांच्या तत्वांतून शिकण्याची संधी मिळाली. जैन परंपरेतही आजच्या दिवसाचं मोठं आहे. रमझानचा पवित्र महिना सुरू आहे.
12. अति आत्मविश्वासाने वागू नका. आपल्या घरा,कचेरी, परिसरात आतापर्यंत कोरोना आला नाही म्हणून बेसावध राहू नका. सावधानी हटी तो दुर्घटना घटी असं पूर्वज म्हणत असत. कोरोनाचा समूळ बीमोड होणं आवश्यक आहे. जराही बेपर्वाई दाखवू नका. अतिशय काळजी घ्यायला हवी. दो गज दूरी, है बहुत जरूरी
13. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन एकमेकांच्या समन्वयाने काम करत आहेत.
14. आपल्याला सेवा पुरवणाऱ्या बांधवांच्या योगदानाची किंमत आपल्याला कळते आहे. त्यातूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी होतोना दिसते आहे.
15. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या संकल्पनांना एकत्रित समजून घ्या. कोरोना संकटात जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला मिळाला आहे. स्वत:पेक्षा इतरांचं हित समजून घेणं आपली संस्कृती आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)