You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : निवडणुकीचा डिजिटल कार्यक्रम ‘राष्ट्र महाराष्ट्र’, जिथे तुम्ही विचाराल नेत्यांना थेट प्रश्न
निवडणूक म्हटलं की दोन गोष्टी प्रकर्षाने आठवतात. एक म्हणजे सभांमधली भाषणं आणि दुसरं म्हणजे पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती. त्या वाचक आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही केवळ शांतपणे पाहात किंवा वाचत असता.
पण हे आता बदलणार आहे.
आता नेत्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारणार आहात... तुमच्या मोबाईल फोनवरून. आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे बीबीसी मराठी.
आज दिवसभर मुंबईत राष्ट्र महाराष्ट्र या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातले सहा प्रमुख पक्षांचे 6 प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.
हा कार्यक्रम तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर, ट्विटर पेरिस्कोपवर आणि जिओ टीव्हीवर पाहू शकता. याबरोबरच सर्व ताजे अपडेट्स आमच्या इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.
हा कार्यक्रम सकाळी साडे 10 वाजता सुरू होणार असून संध्याकाळी 6 पर्यंत चालणार आहेत. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.
पाहा या कार्यक्रमाचं पहिलं सत्र - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण @ #राष्ट्रमहाराष्ट्र इथे - 'आता चौकीदार ऐकल्यावर लोकांना 'चौकीदार चोर है' आणि रफालच आठवेल'
आणि या कार्यक्रमाचं दुसरं सत्र - शिवसेना खासदार संजय राऊत @ #राष्ट्रमहाराष्ट्र इथे - युतीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं: संजय राऊत
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतयांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
बीबीसी मराठी
बीबीसी मराठीच्या वेबसाईट आणि सोशल चॅनल्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ही बीबीसी मराठीची पहिली हेडलाईन होती.
बीबीसी मराठीने गेल्या एक-दीड वर्षांत मराठी पत्रकारितेत अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या.
• पूर्णतः डिजिटल असलेलं हे मराठीतलं पहिलंच व्यासपीठ.
• बातम्या सांगण्याच्या पद्धतीत नवनवीन प्रयोग केले. 360 डिग्री व्हीडिओ आणि VR (Virtual Reality) व्हीडिओ मराठीत पहिल्यांदाच केले.
• जागतिक बातम्या मराठीत नियमितपणे देणारं पहिलं व्यासपीठ.
• महिला, दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावेत यासाठी बीबीसी मराठी नेहमी पुढाकार घेतला.
• प्रत्येक परिस्थिती बीबीसी मराठीने निष्पक्ष बातम्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तुमच्या कौतुकाची थापही मिळवली.
• बीबीसी मराठीच्या अनेक बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात थेट चांगला बदल घडला.
• बीबीसी मराठीने सदैव किचकट विषय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला.
• भारतातले आघाडीचे विचारवंत प्रा. सुहास पळशीकर आणि इतर अनेक मान्यवरांचं लिखाण तरुणांपर्यंत आणलं.
• सर्वांत महत्त्वाचं म्हणजे Jio TV अॅपवर भारतातलं पहिलं डिजिटल व्हीडिओ स्ट्रीम सुरू केलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)