विधानसभा निकाल LIVE : मध्य प्रदेशात कमल नाथ यांचा सत्तास्थापनेसाठी दावा

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने निर्णायक यश मिळाल्यानंतर मध्य प्रदेशमध्येही अटीतटीचा सामना काँग्रेसच्या बाजूने कलला. तब्बल 18 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. बहुजन समाज पार्टीला दोन, समाजवादी पार्टीला एक आणि चार जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या आहेत.

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. आनंदीबेन पटेल यांच्याच हाती नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली होती.

याशिवाय, तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता राखली आहे तर मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसवर विजय मिळवला आहे.

या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका म्हणजे काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल असल्याचं म्हटलं जातं.

राहुल गांधी यांनी भाजपला पराभूत करू पण विरोधकांप्रमाणे भारताला 'भाजप-मुक्त' करण्याचा आमचा विचार नाही, असं ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांचं कौतुक करत भाजपला लक्ष्य केलं आहे.

या पाच राज्यांच्या निवडणुकीतील ठळक घडामोडी अशा:

ताजी आकडेवारी

दुपारी 1 वाजता : कमल नाथ आनंदीबेन पटेल यांची भेट

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा केला. ज्योतिरादित्य सिंदिया हेही यावेळी त्यांच्यासोबत होते.

बुधवार सकाळी 10.50 : हाती-पंजा एक साथ

नुकत्याच आलेल्या निकालावरून दिसून येतं की, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील सामान्य जनता भाजपच्या पूर्णपणे विरोधात आहेत. भाजपची लोकविरोधी धोरणं या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यामुळे मग लोकांनी पर्याय म्हणून काँग्रेसला निवडून देणं पसंत केलं.

"आमचा काँग्रेसच्या अनेक धोरणांना विरोध आहे, काही मुद्दे पटत नाहीत, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशात काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत," असं मायावती ANI शी बोलताना म्हणाल्या.

बुधवार सकाळी 07.00 : मध्य प्रदेशात रस्सीखेच

मध्य प्रदेशात बुधवारी सकाळपर्यंत मतमोजणीचे अंतिम आकडे यायचे होते. अखेर काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. बहुजन समाज पार्टीला दोन, समाजवादी पार्टीला एक आणि चार जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या आहेत.

रात्री 11.10 : मध्य प्रदेशात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा करणार

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून सत्तास्थापनेसाठी दावा करण्यासाठी वेळ मागितली.

रात्री 10.08 : तेलंगणामध्ये TRSचा मोठा विजय

तेलंगणामध्ये TRSनं 88 जागा मिळवत सत्ता राखली आहे. तर काँग्रेसला 19 जागा जिंकता आल्या आहेत. भाजपला इथं 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर TDPनं 2 जागा जिंकल्या आहेत.

रात्री 10.03: छत्तीसगडमध्ये भाजपची मोठी पिछेहाट, काँग्रेसचा विजय

काँग्रेसने 46 जागा जिंकत 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 6 जागा जिंकल्या असून 10 जागांवर आघाडी घेतली आहे. बसपने 1 जागा मिळवली असून 1 जागेवर आघाडी घेतली आहे. जेसीसीने 4 जागा जिंकल्या आहेत.

रात्री 10.00 - मोदींनी केलं काँग्रेसचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. "यश आणि अपयश जीवनाचा अविभाज्य भाग आहे, देशाच्या विकासासाठी अधिकाधिक कष्ट करण्याचा आमची मनीषा अधिक बळकट करते," असं ते म्हणाले.

रात्री 9.52 : राजस्थानमध्ये काँग्रेसची निर्णायक आघाडी

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने 95 जागा जिंकल्या आहेत, तर 4 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73 जागांवर यश मिळवलं आहे. बहुजन समाज पक्षाने 6 जागांवर यश मिळवलं आहे. तर भारतीय ट्रायबल पार्टी (2), राष्ट्रीय लोक दल (1), राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (3), माकप (2) या पक्षांचे उमेदवार विधानसभेत पोहचले आहेत. तर 12 जागांवर अपक्षांनी यश मिळवलं असून 1 जागेवर अपक्ष आघाडीवर आहे.

रात्री 9.50 : मध्य प्रदेशात अटीतटीची लढत

काँग्रेसने 88 जागा जिंकल्या असून 28 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 78 जागांवर यश मिळवलं असून 29 जागांवर आघाडी घेतली आहे. बसपने 1 जागा जिंकली असून 1 जागेवर आघाडी घेतील आहे. समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. 3 जागांवर अपक्षांनी विजय मिळवले आहेत तर 1 जागेवर आघाडी घेतली आहे.

रात्री 8.00 : मोदींवर जनता नाराज - राहुला गांधी

विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष केले. ते म्हणाले, "तरुण लोकांच्या भवितव्यासाठी काय करण्यात येईल हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. रोजगाराचं जे आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं ते अपूर्ण आहे. तीच गोष्ट शेतीबाबतीत आहे. आम्ही तीन राज्यांत नवी दिशा आणि भवितव्यासाठी काम करू. मोदींनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली नाही त्यामुळे ते हरले आणि ही कामं पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. काँग्रेस कार्यकर्ते, छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचा हा विजय आहे. ही मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करू."

ते म्हणाले, "भाजपवर लोक नाराज आहेत. त्यांनी जी कामे केली त्याबाबतीत लोकांमध्ये नाराजी आहे. लोकांमध्ये नोटाबंदीवर नाराजी होती. रोजगाराबाबत नाराजी होती तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दुर्लक्ष झालं त्यामुळे ते हरले."

"भाजपला पराभूत करू पण भाजपमुक्त भारत करणार नाही, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांची विचारधारा समान आहे, असं ते म्हणाले. ईव्हीएम संदर्भात जगभरात शंका आहेत, असं ते म्हणाले. आर्थिक आघाडीवर मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत," असं ते म्हणाले.

सायंकाळी 6.45 : मध्य प्रदेशात अटीतटीची लढत

सायंकाळी 5.40 : मिझोरममध्ये काँग्रेसला झटका; मिझो नॅशनल फ्रंटचा मोठा विजय

मिझोरममध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. सत्ताधारी काँग्रेसला फक्त 5 तर भारतीय जनता पक्षाला फक्त 1 जागा मिळाली आहे. मिझो नॅशनल फ्रंटने 26 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली आहे. मिझोरममध्ये अपक्ष आणि इतरांना 8 जागा मिळाल्या आहेत.

सायंकाळी 5.20 : मोदी आणि शहांना चपराक - राज ठाकरे

विधान सभा निवडणुकांचे निकाल म्हणजे मोदी, शहांना ही मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, "येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची हा नांदी आहे. देशातील जनता भाजपला मतदान करणार नाही, देशाला राम मंदिराची नाही तर राम राज्याची गरज आहे."

सायंकाळी 5.00 - निर्भय मतदारांचं अभिनंदन - उद्धव

या निकालांवर प्रतिक्रिया देतान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, "पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता मतदरांनी जे धाडस दाखवले त्याचं मी अभिनंदन करतो. निवडणुकीत हार जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्या मतदरांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसवाटप, गुंडागर्दी आणि त्यापेक्षा या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे नको त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखवलेली ही दिशा आहे. त्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो."

दुपारी 3.53 : राजस्थानमध्ये काँग्रेसची आघाडी; भाजपची पिछेहाट

राजस्थानमध्ये काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला आहे, तर 78 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपने 15 जागांवर विजय मिळवला आहे, तर 57 जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानामध्ये सत्तास्थापनेसाठी 100 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे आताची मतांची टक्केवारी 39.1 टक्के इतकी आहे तर भाजपची मतांची टक्केवारी 38.6 टक्के इतकी आहे.

दुपारी 3.45 : 'छत्तीसगडमधील विजय जनतेचा'

छत्तीसगडमध्ये निवडणूक जनतेने हाती घेतली, त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षाही मोठा विजय मिळाला आहे, आम्ही जनतेसाठी लढलो. राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे काँग्रेसचे नेते भूपेश बाघेल यांनी दिली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मोठ्या विजयाकडे वाटचल सुरू आहे.

दुपारी 3.10 : हा मोदींच्या कार्यशैलीचा पराभव - अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे मोदींचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर टीका केली. ते म्हणाले, "मोदींच्या कार्यशैलीचा हा पराभव आहे. हुकुमशाहीवर लोकशाहीचा, तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा हा विजय आहे. हा लोकशक्तीचा, सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग आहे. नोटबंदीच्या तुघलकी निर्णयापुढे जनतेने आपला कौल दिला आहे. महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा मर्यादित काळासाठी सत्तेत आहे. जो ट्रेंड तिथे बघायला मिळेल तोच महाराष्ट्रात बघायला मिळेल," असं ते म्हणाले.

दुपारी 3.07 - तेलंगणामध्ये TRSची निर्णायक विजयाकडे वाटचाल

दुपारी 3.04 - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची विजयी घौडदौड

दुपारी 2.56 - राजस्थान काँग्रेसची विजयाकडे वाटचाल

दुपारी 2.53 - मध्य प्रदेशमध्ये काय होणार?

दुपारी 2.18 - छत्तीसगड- मध्यप्रदेशात पराभव होईल हे माहिती होतं- संजय काकडे

"छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आम्ही पराभूत होऊ हे माहिती मला माहिती होतं. पण मध्य प्रदेशाचे कल धक्कादायक आहेत. २०१४ साली मोदींनी हाती घेतलेला विकासाचा मुद्दा आम्ही विसरलो असं मला वाटतं. राम मंदिर, पुतळा, नामांतर अशा विषयांवर लक्ष केंद्रीत झालं आहे," असं काकडे म्हणाले आहेत.

दुपारी 2.17 - के. चंद्रशेखरराव जिंकले

टीआरएसचे अध्यक्ष केसीआर राव गजवेल मतदारसंघातून ५० हजार मतांनी विजयी झाले आहेत.

दुपारी 2.04 - झालरापाटणमधून वसुंधराराजे जिंकल्या

दुपारी 1.50 - मिझोरममध्ये एमएनएफचा जल्लोष

मिझो नॅशनल फ्रंटच्या ऐजवाल कार्यालयाबाहेर जल्लोष. एमएनएफने ४० पैकी १४ जागा जिंकल्या असून ९ जागांवर पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

दुपारी 1.40 - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची आघाडी कायम

दुपारी 1.34 - राहुल गांधी सोनिया गांधींच्या भेटीला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी १० जनपथवर पोहोचले आहेत.

दुपारी 1.31 - EVMमध्ये छेडछाडीचा आरोप

तेलंगणामध्ये मतदान यंत्रांची छेडछाड केल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. तशी तक्रार तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी रजत कुमार यांच्याकडे केली आहे. मात्र तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदार के. कविता यांनी हे आरोप फेटाळले आहे. पराभूत होणारा पक्ष नेहमीच मतदान यंत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत असतो. सोमवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदान यंत्रांमध्ये छेडछाड शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. लोकांनी टीआरएसला सत्ता स्थापनेचा आदेश दिला आहे आणि काँग्रेस त्याला खोटं ठरवत आहे, असं त्या म्हणाल्या.

दुपारी 1.19 - मध्य प्रदेशात अटीतटीचा सामना सुरूच

दुपारी 1.12 - भाजपाविरोधी पक्षांच्या संपर्कात- सचिन पायलट

"आमच्या पक्षाचे जे लोक जिंकून आले आहेत तसंच इतरही गटांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या मी संपर्कात आहे. कारण हा जनादेश भाजपाच्याविरोधात आहे. भाजपाच्या अहंकाराच्या राजकारणाचा पराभव झाला आहे. अजूनही १६५ वरून शंभराच्या आता जागा आल्यानंतरही भाजपा सरकार स्थापनेसाठी हातपाय मारण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या निवडणुकीचा विचार करता आमच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचम दिसून येईल. आम्ही २१ जागांपासून सुरुवात केली आणि आता इतक्या मोठ्या संख्येने निवडून आलो आहोत. आमचे राजस्थानमधील सरकार काँग्रेसचे नाही तर लोकांचे सरकार असेल," असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

दुपारी 12.54 - कट टू कट फाईट

दुपारी 12.44 - हा तर लोकांचा राग- संजय राऊत

"हा काँग्रेसचा विजय आहे असे मी म्हणणार नाही. तर हा लोकांनी व्यक्त केलेला राग आहे. आत्मपरिक्षणाची गरज आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दुपारी 12.30 - भाजपला लोकांनी नाकारलं- अशोक गेहलोत

"राजस्थानमध्ये लोकांनी भाजपाला नाकारलं आहे. तरुणांना रोजगार, शेतकरी, इंधन दरवाढ असे मुद्दे राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी घेतले. केंद्र सरकारमुळे अच्छे दिन आलेच नाहीत, स्वीस बँकेतील काळ्या पैशातील एकही रुपया आला नाही. काँग्रेसमुक्तची भाषा करणारेच मुक्त होतील अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काँग्रेसला जनादेश मिळाला असून आमचा पक्ष पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करेल," असं गेहलोत म्हणाले आहेत.

दुपारी 12.25 - बीबीसी मराठीच्या पत्रकारांचे विश्लेषण

दुपारी 12.22 - 'जनादेश बदलत आहे'

जनादेश बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्व जबाबदारीनिशी आम्ही लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु- ज्योतिरादित्य सिंदिया

दुपारी 12.11 - मध्य प्रदेशात भाजप आघाडीवर

दुपारी 12 - TRSने आभार मानले

तेलंगणा राज्यनिर्मिती आणि त्या राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी केसीआर यांनी केलेले काम तेलंगणच्या लोकांनी पाहिले आहे. तेलंगणाचे लोक त्यांच्याबरोबर उभे राहातील आणि तेलंगणचा विकास आणखी उच्च पातळीवर जाण्यासाठी हातात हात घेऊन काम करतील असा मला विश्वास वाटतो, असं के. कविता यांनी म्हटलंय. त्या टीआरएसच्या खासदार आहेत.

सकाळी 11.58 - मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर

सकाळी 11.47 - हा विजय म्हणजे राहुल गांधींना मिळालेली भेट- सचिन पायलट

"राहुल गांधी बरोबर एक वर्षापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यामुळे हा विजय म्हणजे त्यांच्यासाठी भेटच आहे. काँग्रेस तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करेल," असं राजस्थानचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

सकाळी 11.41 - जे पेरलं ते उगवलं - शिवसेना

"जे पेरलं ते उगवलं, काँग्रेसमुक्त भाजप करायला निघाले होते. पण आता भाजपमुक्त भारतच्या दिशेनं पावलं पडतायत का, हे बघायला हवं. राजस्थानमध्ये सत्ता जाईल हे दिसत होतं. मध्य प्रदेशात अटीतटीची लढाई वाटत होती, तेही हरले. पण छत्तीसगडमध्ये जी चपराक बसली आहे ती निर्णायक आहे. पैशाचा जो वापर काँग्रेसच्या अनेक पिढ्यांना जमला नाही, तो वापर भाजपनं ज्या पद्धतीनं केला तो अधिक भयंकर आहे. शिवसेनेनं यापूर्वीच एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. पण पुढची भूमिका उद्धव ठाकरे जाहीर करतील," असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं आहे.

सकाळी 11.36 - मिझोरमचे मुख्यमंत्री पराभूत

मिझोरमचे मुख्यमंत्री लाल थान्वाला यांचा चांफाय दक्षिण मतदारसंघातून पराभव झाला आहे.

सकाळी 11.27 - लोकसभेत वाजपेयींना श्रद्धांजली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कामकाजास सुरुवात होताच लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. अटलबिहारी वाजपेयी भारतातील आगामी सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तीमत्त्व ठरतील असं महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवताना म्हटलं. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सकाळी 11.22 - छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडे निर्णायक आघाडी

सकाळी 11.21 - राजस्थानमध्ये काँग्रेस आघाडीवर

सकाळी 11.18 - मध्य प्रदेशात अटीतटीची लढत सुरुच

सकाळी 11.17 - राजस्थानात काँग्रेस सत्ता स्थापन करेल - गेहलोत

सकाळी 11.11 - काँग्रेस मुख्यालयात जल्लोष

सकाळी 11.04 - काँग्रेसला बहुमताचा विश्वास

"हे सर्व कल आहेत, मात्र आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल याचा मला विश्वास आहे," मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी म्हटलं आहे.

सकाळी 10.56 - तेलंगणात TRS कार्यकर्त्यांचा जल्लोष

तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील कार्यालयाच्या समोर जल्लोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

सकाळी 10.52 - छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर

सकाळी 10.50 -राजस्थानात काँग्रेस आघाडीवर

सकाळी 10.50 - मिझोरममध्ये मिठाई वाटप

मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने आघाडी घेतल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटण्यास सुरुवात केली आहे.

सकाळी 10.49 - मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर

सकाळी 10.41 - अधिवेशनाचा उपयोग जनहितासाठी व्हावा- मोदी

"संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी. वाद, विवाद, संवाद झालाच पाहिजे. या अधिवेशनात निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम होईल. सर्व पक्षीय सदस्य या सत्राचा पक्षहिताऐवजी जनहितासाठी वापर करतील अशी मला आशा आहे," अशा भावना पंतप्रधानांनी संसदेचे हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीस व्यक्त केल्या आहेत.

सकाळी - 11.31 - मध्यप्रदेशात काँग्रेसकडे आघाडी

सकाळी - 10.21 - सपा-बसपा ठरू शकतात किंगमेकर

मध्य प्रदेशात बसपा 7 जागांवर आणि सपा 4 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे ऐनवेळी सत्ता स्थापनेत हे दोन्ही पक्ष किंगमेकर ठरू शकतात.

सकाळी 10.13 - भाजपला विजयाची आशा

"हे अगदी सुरुवातीचे कल आहेत. आम्ही चांगले यश मिळवू शकू अशी आम्हाला आशा आहे," असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सकाळी 10.12 - TRSची निर्णायक आघाडी

सकाळी 10.10 - मिझोराममध्ये MNF आघाडीवर

सकाळी 10.3 - राजस्थानात काँग्रेस आघाडीवर

सकाळी 10.3 - मिझोराममध्ये भाजप 1 जागेवर आघाडीवर

मतमोजणीतील सुरुवातीच्या कलानुसार मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट दोन जागांवर तर भाजपा १ जागेवर आघाडीवर

सकाळी 10 - वसुंधराराजे आघाडीवर

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे झालारपाटण मतदारसंघातून 4055 मतांनी आघाडीवर आहेत. तर सरदारपुरामधून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत 5112 मतांनी आघाडीवर आहेत.

सकाळी 9.59 - अकबरुद्दीन औवेसी विजयी

हैदराबाद- एमआयएम उमेदवार अकबरुद्दीन औवेसी चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून विजयी

सकाळी 9.57 - अजित जोगी तिसऱ्या क्रमांकावर

छत्तीसगडमध्ये मारवाही मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अजित जोगी तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. या जागी भाजप सध्या पहिल्या क्रमाकांवर तर काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांवर.

सकाळी. 9.55 - मध्य प्रदेशात त्रिशंकु स्थिती सारखी अवस्था

सकाळी 9.41 वाजता - तेलंगणामध्ये TRS ची निर्णायक आघाडी

सकाळी 9.34 - तेलंगणामध्ये TRS ची आघाडी

सकाळी 9.34 - शेअर बाजार कासळला

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचा परिणाम शेअर बाजारावरही बघायला मिळालाय.

शेअर बाजार तब्बल 500 अंकांनी कोसळलाय. सोमवारी रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि आज काँग्रेसनं निवडणुकीच्या राजकारणात घेतलेली आघाडी याचा परिणाम बाजारावर दिसतोय.

सकाळी 9.30 - छत्तीसगड काँग्रेस आघाडीवर

सकाळी 9.29 - मध्य प्रदेशात अटीतटीची लढत सुरूच

सकाळी 9.27 - मध्यप्रदेशात भाजपाचेच सरकार- कैलाश विजयवर्गीय

"मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आम्ही नक्कीच सरकार स्थापन करु. राजस्थानमधून येणाऱ्या सुरुवातीच्या कलानुसार तेथेही भाजपा सरकार स्थापन करु असा आम्हाला विश्वास वाटतो," असं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातले ते भाजपचे मोठे नेते आहेत.

सकाळी 9.24 - मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर

सकाळी 9.15 - तेलंगणात TRS आघाडीवर

सकाळी 9.14 - मध्यप्रदेशात काँग्रेसच सरकार स्थापन करेल- दिग्विजय सिंह, काँग्रेस

"आतापर्यंत केवळ पोस्टानं पाठवलेली मतं मोजण्यात आली आहेत. दुपारी १२ नंतरच प्रतिक्रिया देता येईल. मध्य प्रदेशात सरकार काँग्रेस स्थापन करेल असा मला विश्वास वाटतो. छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही आमच्यासाठी पोषक स्थिती आहे," असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

सकाळी 9.12 - छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर

सकाळी - 9.10 वाजता - मध्य प्रदेशात 2 जागांचा फरक

सकाळी - 9.09 वाजता - अटीतटीची लढत

सकाळी 9 - टीआरएसचा विजय होईल - के. कविता

"तेलंगणचे लोक टीआरएसच्या बाजूने आहेत. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केले असून आम्हाला मिळालेल्या संधीचा वापर केला आहे. त्यामुळे मतदार आम्हाला पुन्हा एकदा सत्तेत परत आणतील. तेही स्वबळावर. त्याबाबत आम्हाला अत्यंत विश्वास वाटतो," असं के. कविता यांनी म्हटलं आहे. त्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या कन्या आहेत.

सकाळी 8.00 वाजता - मतमोजणीला सुरुवात

पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काय आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधली सद्यपरिस्थिती? वाचा इथे

सकाळी 7.10 वाजता - स्ट्राँग रूम सज्ज

पाच राज्यांसाठी अतिशय भक्कम आणि अभेद्य अशी सुरक्षा यंत्रणा कामी लावली आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

सकाळी 7.00 वाजता - तेलंगणात काँग्रेस मुख्यालय सजले

हैदराबादमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेरी दृश्यं. झेंड्या-पताकांनी इथे सजावट करण्यात आली आहे.

2014मध्ये आंध्र प्रदेशपासून विभाजन होऊन वेगळं राज्य झालेल्या तेलंगणाची ही दुसरीच विधानसभा निवडणूक आहे.

119 जागांच्या या विधानसभेत सध्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीकडे 90 जागा आहेत तर काँग्रेसकडे 13 जागा आहेत. असदउद्दीन ओवेसी यांच्या AIMIM पक्षाकडे सात, भाजपकडे पाच आणि तेलुगू देसम पार्टीकडे 03 जागा आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)