You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहिणारे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात बडोदा इथं हे साहित्य संमेलन होणार आहे. सनदी अधिकारी आणि लेखक असा त्यांच्या कार्याचा मोठा परीघ आहे.
देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांच्यात ही निवडणुकी झाली. त्यात देशमुख यांना 427 आणि शोभणे यांना 357 मते मिळाली.
मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरूम गावचे देशमुख सध्या पुण्यात असतात.
शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची कोल्हापुरातील जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी सोनोग्राफी मशीन्सना सायलेंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा उपक्रम कोल्हापुरात राबवला होता. याशिवाय कोल्हापुरात Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994 (PCPNDT) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
त्यांच्या या उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती.
कोल्हापुरात चित्रपट आणि ग्रंथ महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलं होतं. गोरेगाव फिल्मसिटीचे संचालकपद म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
सध्या ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार आहेत.
काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ग. ह. खरे पुरस्कार, ग. ल. ठोकळ पुरस्कार, माडगूळकर पुरस्कार, मराठवाडा साहित्य पुरस्कार.
दुसरे शासकीय कर्मचारी साहित्य संमेलन, पुणे (2010), तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, नागपूर (2011), 38वे मराठवाडा साहित्य संमेलन, नांदेड (2015) आणि लोकजागर साहित्य संमेलन, सांगली (2015) या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
1995ला परभणी इथं झालेल्या 68व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.
देशमुख यांची साहित्य संपदा
- कादंबरी - सलोमी (2 लघु कादंबऱ्या), होते कुरूप वेडे, अंधेर नगरी, ऑक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद, हरवलेले बालपण.
- कथासंग्रह - कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!, नंबर वन, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्निपथ, मृगतृष्णा.
- नाटक, बालनाटक - अखेरची रात्र, दूरदर्शन हाजीर हो...!
- ललितेर साहित्य - प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, अविस्मरणीय कोल्हापूर, मधुबाला ते गांधी
- संपादित साहित्या - लक्षदीप : लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य, (संपादक : डॉ. रणधीर शिंदे)अन्वयार्थ : लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा, (संपादक : डॉ. रणधीर शिंदे)मराठवाडा मुक्तीसंग्राम (सहलेखक वि. ल. धारूरकर)
- इंग्रजी साहित्य - 1. The Real Hero and Other StoriesAdministration : Good to GreatnessCharismatic Kolhapur.
- स्फूट साहित्य - नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखमाला), बी पॉझिटिव्ह (लेखमाला)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)