You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शशी कपूर यांच्यासोबत शशी थरूरांनाही वाहिली आदरांजली
हिंदी सिनेसृष्टीतला सगळ्यांत देखणा अभिनेता, असं वर्णन अनेकांनी शशी कपूर यांना आदरांजली वाहताना केलं आहे. काही निवडक कलावंत आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया.
रेणुका शहाणे लिहितात, शशी कपूर यांचं जाणं चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. 'खिलते है गुल यहा' या गाण्याचीही त्यांनी आठवण यावेळी करून दिली आहे.
सगळ्यांत देखणा, दिलदार आणि प्रेम करावा असा नट. त्यांच्या जाण्यानं अगणित चाहते शोक सागरात बुडाले आहेत, असं शोभा डे यांनी ट्वीट केलं आहे.
चित्रपट आणि रंगमंचावरील त्यांचं काम अद्वितीय आहे. त्यांचं काम कायम स्मरणात राहील, असं लिहून करण जोहर यांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कुणाल विजयकर यांनी शशी कपूर यांना आजरांजली वाहतांना त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली आहे.
अभिनेत्री नीना कुलकर्णी लिहितात, शशी कपूर यांच्या मनमोहक हास्यानं कित्येक मनांना भुरळ घातली होती, त्यातलं एक माझंही होतं.
ते स्वत: कायम हसत राहिले आणि चित्रपटात ते कायम प्रफुल्लित दिसले. जे इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवतात ते स्वत: चांगलं आयुष्य जगतात, असं हर्षा भोगले यांनी ट्वीट केलं आहे.
चेहऱ्यावर कायम हास्य असलेले शशी कपूर आणि त्यांच्या गालावर पडणाऱ्या खळ्या! लाखो भारतीय महिला त्यांच्यावर अक्षरश: मरत होत्या, असं पत्रकार बरखा दत्त यांनी लिहीलं आहे.
त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्र ट्विट करावं लागलं.
झालं असं की, पहिलं नाव सारखं असल्यामुळे शशी थरुर यांच्या कार्यालयात दुखवट्याचे फोन यायला लागले.
मग थरुर यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. "माझ्या कार्यालयात दु:ख व्यक्त करणारे फोन येत आहेत. अतिशयोक्ती करत नाही पण, जरा घाई होतेय." असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)