'जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती' ट्रम्प यांच्या बाजूने आहे, पण मस्क यांना काय हवंय?

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क
    • Author, नाडा टॉफिक, फोलोसम आणि पेन्सिलव्हेनियाहून आणि बर्न्ड देबस्मन ज्युनिअर
    • Role, बीबीसी न्यूज

झँडर मुंडीच्या ऑफिसमध्ये नेहमीसारखा दिवस सुरू होता. तेव्हा त्याला बातमी कळली की, तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश इलॉन मस्क अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया राज्यातील फोलोसोम नावाच्या एका गावात बोलत आहे.

"जगातला इतका श्रीमंत व्यक्ती गावात कधी आला होता," मुंडीने हा प्रश्न स्वतःलाच विचारला.

फोलसोम गावाची लोकसंख्या 9,000 आहे. तिथले नागरिक राजकारणाबद्दल खुलेपणाने चर्चा करत नाही. राजकारणाचं अस्तित्व ही तिथे फारसं दिसत नाही.

21 वर्षाचा मुंडी, जवळच एका अपार्टमेंटमध्ये ब्रोकरचे काम करतो. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत काहीच निर्णय नव्हता घेतला अशी अशी कबुली तो देतो.

मात्र, गर्दी पाहून त्यालाही उत्साह आला आणि मस्क काय बोलतात याबद्दल त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तो त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी जातो.

जेव्हा शाळेतून तो घरी यायला निघतो तेव्हा त्याचा कल कमला हॅरिसपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अधिक असल्याची जाणीव त्याला होते.

“जर एखाद्याने तुम्हाला सांगितलं की, या निवडणुकीमुळे पुढच्या चार वर्षात तुमच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कोण होईल हे तर कळेलच पण त्याच बरोबर जग कसं होईल हे सुद्धा कळेल, तर मला वाटतं की ही खूपच मोठी गोष्ट आहे," तो बीबीसीशी बोलत होता. "हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे."

मस्क यांनी याआधी आपण फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याची आणि राजकारण आपण फक्त दुरून पाहत असल्याची प्रतिमा निर्माण केली होती. आता मात्र ते पूर्णपणे ट्रम्प यांच्या बाजूने झुकले आहेत.

अमेरिकेतील लोकांसमोर अगदी धडधडीतपणे 53 वर्षीय मस्क यांनी आपला वेळ खर्चून ट्रम्प यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. देशातील व्यापारी वर्गासाठी हे दुर्मिळ आहे. कारण साधारणपणे हा वर्ग पडद्यामागून सूत्रं हलवण्याचं काम करत असतो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पारंपरिक सीईओ लोकांपेक्षा मस्क यांनी हा वेगळा मार्ग चोखाळला आहे. कारण, सीईओ लोक हँम्पटन्स येथील आलिशान घरांमध्ये महागड्या जेवणावळी, निधी उभारणीसाठी जे लोक पैसे देऊ शकतात अशा लोकांना शाही मेजवानी देण्यासाठी ओळखले जातात.

त्यामुळे मस्क यांची नेमकी काय उद्दिष्टं आहेत, असा प्रश्न विश्लेषकांना पडला आहे.

सीईओ लोकांची जी भूमिका असते ती सार्वजिनकरीत्या उघड नसते असं एरिक गॉर्डन म्हणतात. मिशिगन विद्यापीठातील रॉस स्कूल ऑफ बिझनेसमध्ये उद्योजकता विभागाचे ते प्रमुख आहेत. ते म्हणतात, “मस्क अतिशय खुलेपणाने हे करत आहेत आणि स्वत:ला वादाचा केंद्रबिंदू बनवत आहेत.”

ट्रम्प यांना पाठिंबा देणारी पॉलिटिकल ॲक्शन कमिटी असलेल्या अमेरिका पीएसीने आतापर्यंत 119 मिलियन डॉलर या निवडणुकीत खर्च केले आहेत, अशी माहिती ओपन सिक्रेट या संस्थेने दिली आहे.

त्याचप्रमाणे मस्क यांनी स्वत:ही या निवडणुकीत निधी ओतला आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत सर्वात आघाडीचे देणगीदार आहेत आणि स्विंग स्टेटमध्ये (असं राज्य जिथे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांना सारखाच पाठिंबा असतो) प्रचारासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असंही बोललं जात आहे.

स्टीव्ह डेव्हिस हे मस्क यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी मस्क यांच्या स्पेस एक्स, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि बोरिंग कंपनीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना आता ट्रम्प यांना निवडून देण्याच्या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलं आहे.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

मस्क यांनी निवडणुकीत घेतलेला वैयक्तिक सहभाग मुंडी याने लगेच ओळखला.

“हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतका वेळ आणि पैसा कोणीतरी ओततंय म्हणजेच त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं,” तो म्हणतो.

पेन्सिल्वेनियाचे खासदार जॉन फेटरमॅन आणि काही डेमोक्रॅट्स यांनी मस्क यांच्या रुपाने असलेला धोका लवकरात लवकर ओळखण्याची विनंती पक्षाला केली आहे.

ज्या लोकांना मस्क हे अतिशय बुद्धिमान वाटतात आणि ज्या लोकांपर्यंत डेमोक्रॅट्सना पोहोचणं आतापर्यंत अवघड आहे अशा लोकांन मस्क यांचं प्रचंड आकर्षण आहे, असं फेटरमन यांना वाटतं.

13 जुलैला पेन्सिल्वेनिया येथे ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर पहिल्यांदा मस्क यांनी ट्रम्प यांना खुलेपणाने पाठिंबा दिला. त्यानंतर कोणत्याही प्रचारसभेत मस्क असतातच. अमेरिकेतील लोकशाही फक्त ट्रम्पच वाचवू शकतात असा इशारा ते सर्व सभांमध्ये देत असतात.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मस्क यांनी पेन्सिल्वेनियाचा भाग पिंजून काढला आहे. हॅरिस आणि ट्रम्प या दोघांसाठीही हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे.

अमेरिका पीएसी ही संस्था आता कोणत्याही एका मतदाराला रोज एक मिलियन डॉलर ही रक्कम देत आहे. मतदार कोणत्या पक्षाचा आहे याचा त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त त्याने मतदानासाठी नोंदणी केलेली असायला हवी आणि याचिकेवर सही करायला हवी.

या आठवड्याच्या शेवटी पिट्सबर्ग आणि हॅरिसबर्ग येथे टाऊन हॉल (सार्वजनिक सभा) सारखे कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमात विजेत्यांना मस्क यांनी मोठ्या रकमेचे धनादेश दिले. तेव्हा गर्दीत असणारे लोक 'इलॉन, इलॉन...' म्हणत त्यांच्या नावाचा जयघोष करत होती. या घोषणांना प्रतिसाद देताना मस्क म्हणाले की, या घोषणांमुळे त्यांच्या मनात उत्साह निर्माण होतो.

सोमवारी (21 ऑक्टोबर) फिलाडेल्फियामध्ये झालेल्या एका रॅलीत अलेक्झांड्रिया ओकाशिओ कॉरेट्झ म्हणाल्या की, इथे लोकांना पैसे कमावण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात. पण तुम्ही मस्क यांच्यासमोर नाचलात तर तुमच्यावर पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

“आमच्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची निवडणूक असताना लोकांवर असे पैसे उधळणं मस्क यांना फार चांगलं वाटतं. या अब्जाधीशांना असंच काहीतरी करायला आवडतं,” त्या पुढे म्हणाल्या. काही निरीक्षकांनी मात्र मस्क यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्यामुळे त्यांच्या व्यापाराला फायदा होतो असं ते सूचित करतात.

इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करणाऱ्या 'चार्जवे' या कंपनीचे सीईओ मॅट टेस्क त्यांच्यापैकी एक आहेत.

त्यांच्या मते, मस्क यांनी जी राजकीय उडी घेतली आहे ती इलेक्ट्रिक गाड्यांच्या उद्योगात अनेकांसाठी कठीण होती. मात्र इतकी वर्षं राजकारणात सक्रिय राहिल्यावर जे काही आता होतंय ते फारसं आश्चर्यकारक नाही.

“मला वाटतं मस्क यांची उद्दिष्टं त्यांच्या व्यापारावर, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर, नियमनावर केंद्रित आहेत. त्याबद्दल अनेकदा बोलले आहेत,” ते म्हणतात. तसंच ते सांगतात की कॅलिफोर्नियामध्ये कोव्हिड काळात लावलेल्या निर्बंधांना त्यांनी तीव्र विरोध केला होता.

स्पेसएक्स

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. गॉर्डनसुद्धा या मुद्द्याशी सहमती दर्शवतात. नियामकांनी आपल्यावर बंधनं घातली आहेत, असं मस्क यांना वाटतं. त्यांना असं वाटतं की सरकारने हस्तक्षेप केल्याने ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसारखे उपक्रम मागे पडलेत.

“त्यांना एक आघाडीचा योद्धा व्हायचं आहे. त्यांना अतिशय आक्रमक उद्योजक व्हायचंय, जो रोज नवे मार्ग चोखाळतो आहे. त्याला नियमांनी काही फरक पडत नाही. कारण नियम हे तंत्रज्ञानाच्या 5, 10, 20 वर्षं मागेच असतात,” असं प्रा. गॉर्डन म्हणतात.

‘मस्क यांना वेगळ्याच मार्गाने जायचं आहे, त्यांना मंगळावर जायचं आहे,” ते पुढे म्हणतात.

जर ट्रम्प नोव्हेंबर महिन्यात निवडणूक जिंकले तर अमेरिकेच्या प्रशासनात ‘दर कपाती’ची जबाबदारी मस्क यांच्यावर देणार असल्याचं मस्क यांनी सूचित केलं. त्यांनी अगदी थेट हेच केलं नाही ती मस्क यांचं ट्रम्प नक्कीच ऐकतील. हे सगळं प्रचारादरम्यान मस्क यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य होईल असं निरीक्षकांना वाटतं. तसंच प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असेल असं त्यांना वाटतं.

मस्क यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते प्रशासनातील ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियंसी’ हा विभाग सांभाळायला तयार आहेत. नियमनामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचा गळा घोटला गेला तेव्हा या नियमनांवरच काम करायला त्यांना आवडेल.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क

मात्र, डेमोक्रॅट्स लोकांच्या मते यामुळे अतिशय गुंतागुंतीचा संघर्ष निर्माण होईल कारण स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांसाठी मस्क यांनी आधीच लाखोंची कंत्राटं घेतली आहेत.

“हे अतिशय बेकायदेशीर आणि अनैतिक आहे,” असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूजॉम यांच्या माजी आर्थिक आणि व्यापारी सल्लागार लेनी मेंडोंका म्हणतात.

त्यांच्या मते, सरकारमध्ये आणि नियमनांमध्ये हस्तक्षेप केला आहे किंवा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचं ऐकायला हवं पण याच मुद्यांशी निगडीत असलेल्या अधिकाराच्या पदांवर ते नकोत.

मस्क यांनी जे पैशांचे वाटप केलं आहे ते कायद्यात बसतं का? यावर अमेरिकेच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे सल्लागार लॉरेन्स नोबेल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

नोबल यांना वाटतं की अशा प्रकारच्या प्रचाराची अमेरिकेतल्या लोकांना काळजी वाटायला हवी. कारण कामाच्या जागी सुरक्षित वातावरण ग्राहक संरक्षणाचा अमेरिकेतले लोक कायमच पुरस्कार करतात.

“कंपन्यांना मोकळं सोडलं तर त्या काय करतात हे आपल्याला माहिती आहे. ते नफा, समभागधारकांचं मूल्य आणि सीईओचा पगार यांना सुरक्षेपेक्षा जास्त प्राधान्य देतात. व्यापाराच्या नावाखाली सुरक्षेची लक्तरं वेशीवर टांगतात. एखादी व्यक्ती असा व्यापार करत असेल, आणि सरकार ज्यांच्याकडे सुरक्षेची मुख्य जबाबदारी आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीने पाहत असेल तर हे धोकादायक आहे,” ते बीबीसीशी बोलत होते.

मस्क हे स्वत:ला बंडखोर आणि बदल घडवणारा असं मानतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्यांचे सरकारबरोबर संबंध फायदेशीर राहतील यात शंका नाही.

पण त्यांचा ब्रँड, त्यांची प्रतिमेची गाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बांधली गेली आहे. याची मस्क यांनाही पूर्ण कल्पना आहे हे त्यांच्या कृतीवरून दिसतंच.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)