या 65 लोकांनी टुथपेस्टमधून अंमली पदार्थांची तस्करी केली

ड्रग्ज, टूथपेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टूथपेस्टचा असा वापर तुम्ही पाहिलाय का?

50 किलोंच्या ड्रग्ज तस्करी केल्याप्रकरणी व्हिएतनाम पोलिसांनी 65 जणांना ताब्यात घेतलं आहे. टूथपेस्टच्या ट्यूबमध्ये लपवून ड्रग्जची तस्करी केली जात होती.

मागच्या महिन्यात व्हिएतनाम एअरलाइन्स मध्ये काम करणाऱ्या चार केबिन क्रूला अटक करण्यात आली होती. पॅरिस ते हो ची मिन्ह सिटी प्रवास करणाऱ्या फ्लाईटमधील चार फ्लाइट अटेंडंट्सकडील कॅरी-ऑन बॅगमध्ये अशा ट्यूब सापडल्या होत्या.

पोलिस चौकशीत त्यांनी सांगितलं की, त्यांना 60 किलो टूथपेस्टची वाहतूक करायची आहे असं सांगण्यात आलं होतं. मात्र यात एक्स्टसी, केटामाइन आणि कोकेन आहे याची कल्पना नव्हती.

व्हिएतनाममध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदे अत्यंत कठोर आहेत. मात्र इतकं असूनही व्हिएतनाम हे ड्रग ट्रॅफिकिंगचं मुख्य केंद्र आहे.

फ्लाइट अटेंडंट्सकडे असणाऱ्या 327 टूथपेस्ट ट्यूब्सपैकी अर्ध्या ट्युबमध्ये ड्रग्ज होते. पोलिसांनी सांगितले की, या ट्यूब्समध्ये ड्रग्ज असल्याची माहिती या महिलांना नव्हती. त्यामुळे त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत.

याच मार्गाने अमली पदार्थांची वाहतूक होत असून वाहतुकीची ही जवळपास सहावी खेप असल्याचं पोलिस तपासात उघड झालंय. त्यामुळे पोलिसांनी या आठवड्यात 65 संशयितांना अटक केली आहे.

असं म्हटलं जातंय की, या फ्लाइट अटेंडंट्सना कामावर ठेवलंय त्यापैकीच कोणीतरी या ट्यूब घेऊन जाण्यास सांगितलं असावं.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमली पदार्थांची खरेदी, विक्री, वाहतूक आणि साठवणूक यासह विविध आरोप असलेल्या 65 संशयितांची चौकशी केली जात आहे.

पोलिसांना संशय आहे की, फ्रान्समध्ये शिकत असलेल्या आणि राहणाऱ्या व्हिएतनामी नागरिकांचा वापर करून देशात ड्रग्ज आणले जात आहेत.

एकदा हे ड्रग्ज व्हिएतनामी विमानतळावर पोहोचले की, देशांतर्गत डिलिव्हरी सर्व्हिसद्वारे हे पार्सल सायगॉनच्या सीमेवर असलेल्या डोंग नाय प्रांतात पोहचवले जातात.

त्यानंतर हे ड्रग्ज देशातील विविध भागात विक्रीसाठी नेले जातात.

पोलिस अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे, मागील तीन महिन्यात हवाई मार्गांद्वारे वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं प्रमाण हे मागील पाच वर्षांत झालेल्या ड्रग्जच्या तस्करीपेक्षा जास्त आहे.

हो ची मिन्ह सिटी हा ड्रग्ज तस्करांसाठी अगदी जवळचा ट्रांझिट पॉइंट आहे. कारण या सिटीच्या शेजारीच कंबोडिया आहे.

व्हिएतनाममध्ये एखाद्या व्यक्तीकडे 600 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन किंवा 2.5 किलोपेक्षा जास्त मेथॅम्फेटामाइन सापडले तर किंवा त्याने तस्करी केली असेल तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होते. अंमली पदार्थांचं प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन किंवा विक्री केल्यावरही मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)