शीतल देवी बनली 'वर्ल्ड पॅरा चॅम्पियन'; दुर्मिळ आजारावर मात करत कशी बनली जगज्जेती?

शीतल देवी जम्मूची आहे आणि आता ती पॅरालिंपिकची तयारी करते आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शीतल देवी जम्मूची आहे आणि आता ती पॅरालिंपिकची तयारी करते आहे.
    • Author, आयुष मजूमदार
    • Role, बीबीसी न्यूजसाठी

एखाद्या तिरंदाजाला हातच नाही आणि अशा स्थितीतही तो तिरंदाज तिरंदाजीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी सराव करतो आहे, या गोष्टीची तुम्ही कल्पना करू शकता का?

शीतल देवी ही अशीच एक अफलातून तिरंदाज आहे.

18 वर्षीय शीतल देवी आता 'वर्ल्ड पॅरा चॅम्पियन' बनली आहे. ग्वांगजूमध्ये तिनं विद्यमान विजेती असलेल्या ओझनूर क्युअरला हरवलं आहे.

कसा आहे शीतलचा प्रवास?

एका प्रशिक्षण अकॅडमीमध्ये तिरंदाज प्रशिक्षण घेत आहेत, सराव करत आहेत.

त्यामध्ये शीतल देवी इतर तिरंदाजांपेक्षा वेगळी आहे. शीतल देवी खुर्चीवर बसून धनुष्यावर बाण लावते आणि जवळपास 50 मीटर (164 फूट) अंतरावरून लक्ष्यावर नेम धरते आहे.

शीतल देवी खुर्चीवर बसून तिच्या उजव्या पायानं धनुष्य उचलते आणि तिच्या उजव्या खांद्याचा वापर करत धनुष्याची स्ट्रिंग किंवा दोरी खेचते. यानंतर जबड्याच्या ताकदीचा वापर करून ती धनुष्यातून लक्ष्याच्या दिशेनं बाण सोडते.

या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट बदललेली नाही. ती म्हणजे तिरंदाज शीतल देवी हिचा शांत, संयमी वावर.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काय आहे तो दुर्मिळ आजार?

जम्मूच्या 17 वर्षांच्या शीतलला जन्मत:च फोकोमेलिया हा दुर्मिळ आजार झाला होता.

याच कारणामुळे शीतल देवी, कोणताही हात नसलेली आणि तिरंदाजीच्या स्पर्धेत भाग घेणारी जगातील पहिली आणि एकमेव महिला तिरंदाज बनली आहे.

आशियाई पॅरा खेळांमध्ये शीतल देवीनं सुवर्णपदक जिकलं आहे. आता ती पॅरालिंपिकची तयारी करते आहे. 28 ऑगस्टपासून पॅरिसमध्ये या स्पर्धेची सुरुवात होते आहे.

शीतल देवी म्हणते, "सुवर्णपदक जिंकण्याचा माझा संकल्प आहे. मी जिंकलेलं पदक पाहून मला आणखी जास्त पदकं जिंकण्याची प्रेरणा मिळते. आता कुठे मी सुरुवात केली आहे."

शीतलला फोकोमेलिया हा एक दुर्मिळ आजार आहे.

फोटो स्रोत, Abhilasha Chaudhary

फोटो कॅप्शन, शीतलला फोकोमेलिया हा एक दुर्मिळ आजार आहे.

यावर्षीच्या पॅरालिंपिक स्पर्धेत जगभरातील जवळपास 4,000 खेळाडू, 22 खेळांमधून भाग घेतील.

1960 मध्ये पॅरालिंपिक स्पर्धेची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळापासूनच तिरंदाजीचा समावेश पॅरालिंपिक स्पर्धेत आहे.

पॅरालिंपिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांचा दबदबा सुरुवातीपासूनच आहे. हे देश पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीत वरच्या स्थानावर असतात. मात्र, भारताला 17 स्पर्धांमधून एकमेव कांस्य पदक जिंकता आलं आहे.

पॅरा-तिरंदाजांचं वर्गीकरण त्यांच्या अपंगत्वाच्या गांभीर्याच्या आधारे करण्यात आलं आहे.

याच आधारे या खेळाडूंनी शूट करण्यासाठी खेळाडू आणि टार्गेट यातील अंतरदेखील निश्चित करण्यात आलं आहे.

याच आधारे हेदेखील निश्चित केलं जातं की, तिरंदाज व्हीलचेअर आणि इतर सहाय्यक उपकरणांचा वापर करू शकतो की नाही.

तिरंदाजीसाठी काय आहे निकष?

डब्ल्यू वन श्रेणीमध्ये भाग घेत असलेले तिरंदाज व्हीलचेअरचा वापर करतात. या खेळाडूंच्या स्नायूंची ताकद कमी असते आणि चारपैकी किमान तीन अंग कमकुवत असतात.

याशिवाय खुल्या श्रेणीत भाग घेणाऱ्या खेळाडू शरीराचा वरचा भाग, खालचा भाग किंवा कोणत्या तरी एका बाजूला कोणतीतरी समस्या असल्यामुळे व्हीलचेअरचा वापर करत असले पाहिजेत.

किंवा संतुलनाच्या अभावामुळे ते स्टूलचा आधार घेत असले पाहिजेत. अशा स्थितीत खेळाडू स्पर्धेत रिकर्व किंवा कंपाऊंड बाणाचा वापर करतात.

सध्या शीतल देवी कंपाऊंड ओपन महिला श्रेणीमध्ये संपूर्ण जगात तिरंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे.

2023 मध्ये पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिनं रौप्यपदक जिंकलं होतं. त्याच्या आधारे ती पॅरिसच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली.

स्पर्धेत प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळे निकष आहेत.

फोटो स्रोत, Abhilasha Chaudhary

फोटो कॅप्शन, स्पर्धेत प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळे निकष आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पॅरिसमधील स्पर्धेत शीतल देवीसमोर जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू जेन कार्ला गोगेल आणि विद्यमान विश्वविजेती ओजनुर क्योर या दोघींचं आव्हान असणार आहे.

मात्र, शीतलला ओळखणारे सांगतात की तिला खेळणं आणि जिंकणं या दोन्ही गोष्टी येतात.

शीतल देवीच्या दोन राष्ट्रीय प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या अभिलाषा चौधरी म्हणाल्या, "शीतलनं तिरंदाजीची निवड केलेली नाही, तर तिरंदाजीनंच शीतलला निवडलं आहे."

शीतलचा जन्म एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला आहे. आज तिरंदाजीत जगभरात नावलौकिक कमावणाऱ्या शीतलनं वयाच्या 15 व्या वर्षांपर्यंत धनुष्य आणि बाण पाहिला नव्हता.

2022 मध्ये शीतलच्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं. त्यावेळेस तिची भेट तिचे दुसरे प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांच्याशी झाली होती. कुलदीप वेदवान यांनी शीतलला तिरंदाजी शिकवली.

कुलदीप वेदवान यांच्याशी शीतलची भेट एका परिचिताच्या शिफारशीवर जम्मूतील कटरामधील श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्ड खेळ परिसराच्या दौऱ्याच्या वेळेस झाली होती.

यानंतर लवकरच शीतल कटरा शहरात एका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाली होती. तिथे शीतलमधील क्षमता, धैर्य पाहून तिचे प्रशिक्षक प्रभावित झाले होते.

शीतलच्या प्रशिक्षणातील आव्हानं

शीतलसमोर मोठी आव्हानं होती. मात्र शीतलच्या प्रशिक्षकांचं उद्दिष्ट तिच्या पायांमधील आणि शरीराच्या वरच्या भागातील ताकदीचा अधिकाधिक वापर करण्याचं होतं. अखेर यात त्यांना यश आलं.

शीतल म्हणते की मित्रमंडळींबरोबर लिखाण करणं आणि झाडांवर चढणं यासारख्या गोष्टी करताना ती पायाचा वापर करायची. त्यातूनच तिला ही ताकद मिळाली.

अशा परिस्थितीत तिरंदाजीत करियर करण्याचा विचार करणं सोपं नव्हतं. मात्र शीतल म्हणते, "पायात खूप वेदना व्हायच्या. त्यामुळे मलादेखील वाटायचं की हे अशक्य आहे. मात्र मी प्रयत्नांनी ते साध्य केलं."

शीतलला जेव्हा निराश वाटायचं तेव्हा तिला अमेरिकन तिरंदाज मॅट स्टुट्जमॅनकडून प्रेरणा मिळायची. मॅट देखील एका विशिष्ट अनुकूल उपकरणाचा वापर करून पायांनीच शूटिंग करतो.

शीतलच्या पायांमधील ताकद वाढवून कशाप्रकारे संतुलित करता येईल जेणेकरून त्याचा तांत्रिकदृष्ट्या वापर करता येईल याची आखणी शीतलच्या प्रशिक्षकांना करायची होती.

फोटो स्रोत, Abhilasha Chaudhary

फोटो कॅप्शन, शीतलच्या पायांमधील ताकद वाढवून कशाप्रकारे संतुलित करता येईल जेणेकरून त्याचा तांत्रिकदृष्ट्या वापर करता येईल याची आखणी शीतलच्या प्रशिक्षकांना करायची होती.

मात्र, शीतलच्या कुटुंबाला या प्रकारच्या उपकरणाच्या खर्चाचा भार उचलणं शक्य नव्हतं. त्यामुळे शीतलचे प्रशिक्षक वेदवान यांनी शीतलसाठी धनुष्य बनवण्याचा संकल्प केला.

त्यांनी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या साधनांचा वापर केला. स्थानिक दुकानांमध्ये मिळणाऱ्या वस्तूंच्या मदतीनं त्यांनी आवश्यकतेनुसार धनुष्यात बदल करत त्याचा वापर केला.

शीतलच्या किटमध्ये बॅग बेल्टमध्ये वापरला जाणाऱ्या वस्तूनं बनलेला शरीराच्या वरच्या भागाचा पट्टा आणि एक छोटं उपकरण यांचा समावेश आहे. हे उपकरण शीतल तोंडात धरते आणि बाण सोडण्यासाठी त्याची मदत घेते.

शीतलच्या प्रशिक्षक चौधरी म्हणाल्या, "शीतलच्या पायातील ताकद वाढवत, संतुलित करत तांत्रिकदृष्ट्या याचा वापर कसा करावा याची आम्हाला तयारी करायची होती. शीतलचे पाय मजबूत आहेत. मात्र, आम्हाला हे पाहायचं होतं की शीतल शूटिंगसाठी तिच्या पाठीचा वापर कशाप्रकारे करेल."

आत्मविश्वास वाढत गेला आणि...

यासाठी तिघांनी प्रशिक्षणाचं एक विशिष्ट वेळापत्रक तयार केलं होतं. त्यानुसार शीतलला धनुष्याऐवजी रबर बँड किंवा थेराबँडचा वापर करून फक्त पाच मीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या लक्ष्यावर नेम धरण्याचा सराव करायचा असायचा.

शीतलचा आत्मविश्वास वाढत गेला आणि परिणामी सुरुवातीच्या फक्त चार महिन्यांमध्येच शीतल 50 मीटर अंतरावरील लक्ष्यभेद करताना योग्यरितीनं धनुष्याचा वापर करू लागली.

कंपाऊंड ओपन श्रेणीतील स्पर्धेतील एक मानक असल्यामुळे ते महत्त्वाचं आहे.

दोन वर्षांच्या आतच 2023 मध्ये आशियाई पॅरा खेळांमध्ये शीतलनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये लागोपाठ सहा आणि दहा हिट करण्यासाठी छोट्या अंतरावर बाण सोडण्याचा सराव केला आणि सुवर्णपदक जिंकलं.

इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की एखाद्या खेळाडूला सर्वाधिक 10 वेळा लक्ष्य बोर्डावर बुल्सआय हिट करता येतं.

दोन वर्षांआधी प्रशिक्षणासाठी आलेली शीतल एकदाही घरी गेलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दोन वर्षांआधी प्रशिक्षणासाठी आलेली शीतल एकदाही घरी गेलेली नाही.

शीतल म्हणते, "इतकंच काय, जेव्हा मी नवव्यांदा शूट करत असते तेव्हा मी फक्त इतकाच विचार करते की पुढच्या शॉटवर मी त्याचं रुपांतर 10 मध्ये कसं करू शकेन."

हे सर्व फक्त कठोर परिश्रमातूनच साध्य झालेलं नाही. त्यासाठी शीतलना अनेक गोष्टींचा त्यागदेखील करावा लागला आहे.

शीतल म्हणते की दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षणसाठी कटराला आल्यापासून ती एकदाही तिच्या घरी गेलेली नाही.

आता पॅरालिंपिक संपल्यानंतर लगेच पदकासह मायदेशी परतण्याची तिची इच्छा आहे.

म्हणजेच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शीतलनं दृढनिश्चय केलेला आहे.

शीतल म्हणते, "मला वाटतं की कोणत्याही गोष्टीला कोणतीही सीमा नाही. हे फक्त एखाद्या गोष्टीबाबत पुरेशी इच्छा बाळगण्याबद्दल आणि जितकं शक्य असेल तितकं कठीण काम करण्याबाबत आहे. मी जर हे करू शकते तर दुसरं कोणीही हे करू शकतं."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.