You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुका कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (9 ऑक्टोबर) मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगड, तेलंगाणा, मिझोरम या राज्यातील निवडणुकीची घोषणा केली.
छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला निवडणुका होतील.
मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला मतदान होईल.
मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणुका होतील.
राजस्थान मध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होणार होतं, पण आता ही तारीख आता बदलली असून 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी एकत्रितपणे 3 डिसेंबरला होईल.
देशाच्या एकूण 1/6 भागात मतदान होणार आहे. एकूण 679 मतदारसंघात मतदान होणार आहे. तर एकूण मतदारांची संख्या 16 कोटी आहे.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 60.2 लाख आहे.
याबरोबरच निवडणूक आयोगांच्या विविध उपक्रमांची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.
तेलंगाणा, राजस्थान आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी 2024 मध्ये संपणार आहे. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबरला संपणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)