ढेकणांनी खाल्ला माणूस? कोठडीतील मृत्यूवरुन घरच्यांचा आरोप

फोटो स्रोत, SPL
- Author, ब्रेंडन ड्रॅनन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टन
तुरुंगात एका माणसाचा किडे आणि ढेकणांनी खाऊन मृत्यू झालाचा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अमेरिकेत अटलांटा तुरुंगातल्या एका कोठडीत एका कैद्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना हा आरोप केला आहे.
लाशॉन थॉम्पसनला दुवर्तनाप्रकरणी तुरुंगवास झाला होता. न्यायाधीशांनी त्याला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं घोषित केलं होतं.
त्यानंतर लाशॉनला फुलटॉन काऊंटी तुरुंगातल्या मनोरुग्णांसाठीच्या विभागात ठेवण्यात आलं होतं.
थॉम्पसनच्या कुटुंबीयांचे वकील मायकेल डी हार्पर यांनी त्याच्या मृतदेहाचे फोटो दाखवले.
यामध्ये लाशॉनच्या शरीरावर लाखो किडे आणि ढेकूण असल्याचं दिसत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
याप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केल्याचं हार्पर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तूर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हार्पर यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. थॉम्पसनचा मृत्यू तुरुंगातल्या एका अतिशय घाणेरड्या स्थितीतील कोठडीत झाला. त्यांना किडे आणि ढेकणांनी जिवंतपणी खाऊन संपवलं. ज्या तुरुंगात थॉम्पसनला ठेवण्यात आलं ती जागा जनावरांनादेखील ठेवण्याची नाही. अशा पद्धतीने मृत्यू होणं योग्य नाही.

फोटो स्रोत, THE HARPER LAW FIRM
अमेरिकेतील न्यूज वेबसाईट युएसए टुडेने दिलेल्या बातमीनुसार फुलटॉन काऊंटी तुरुंगाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात थॉम्पसनला अटक केल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच 19 सप्टेंबरला ते कोठडीत बेशुद्धावस्थेत आढळले.
स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरा ठरला. त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
अमेरिकेतील बीबीसीची पार्टनर संस्था सीबीएस न्यूजने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, मायकेल हार्पर यांनी आरोप केला की तुरुंग अधिकाऱ्यांना तसंच डॉक्टरांना थॉम्पसन यांची प्रकृती ढासळत आहे हे माहिती होतं. त्यांना थॉम्पसन यांना मदत केली नाही किंवा त्यांना वाचवलंही नाही.
डॉक्टरांच्या अहवालात म्हटलं आहे की, थॉम्पसनच्या यांच्या कोठडीत ढेकणांची समस्या अतिशय गंभीर आहे. मात्र यामुळे त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा अन्य काही दुखापत आढळल्याचा उल्लेख डॉक्टरांच्या अहवालात नव्हता.
मृत्यूचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ न शकल्याचं अहवालात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ढेकूण जीवघेणे ठरू शकतात का?
मायकेल हार्पर यांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये थॉम्पसन यांच्या चेहऱ्यावर तसंच छातीवर हजारो ढेकूण दिसत आहेत.
काही फोटोंमधून थॉम्पसन यांना ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीची अवस्थाही स्पष्ट होते आहे.
ढेकणांचे अभ्यासक आणि केंटकी विद्यापीठातील कीटकविज्ञान शास्त्रज्ञ मायकेल पॉटर यांनी सांगितलं की, "तुरुंगातल्या कोठडीची स्थिती दाखवणारे फोटो अतिशय भयावह स्वरुपाचे आहेत.
मी गेली वर्ष 20 वर्ष ढेकणांचा अभ्यास करत आहे. मी जे फोटो पाहिले ते खरे असतील तर अशा स्वरुपाचं प्रकरण मी याआधी कधीच पाहिलेलं नाही".
त्यांनी सांगितलं, "ढेकणांनी केलेला दंश जीवघेणा नसतो. पण प्रदीर्घ काळ ढेकूण त्रास देत असतील तर शरीरात रक्ताची कमतरता जाणवू शकते. यावर उपचार झाले नाहीत तर जीवघेणं होऊ शकतं".
मायकेल पॉटर पुढे सांगतात, "ढेकूण आपलं रक्त पितात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ढेकूण असतील तर त्यांनी किती रक्त प्यायलं असेल याचा अंदाज येऊ शकतो. यामुळे माणसाला अलर्जिक रिअक्शन येऊ शकते.
शरीराची स्वत:ची रोगप्रतिकारक क्षमता असते. संक्रमणापासून शरीराचा बचाव करण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचं रसायन स्रवलं जातं.
ये रसायन शरीरातून अधिक प्रमाणात बाहेर पडलं तर रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. माणसाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. या स्थितीला अनाफायलेटिक शॉक असं म्हटलं जातं. हा प्रकार जीवघेणा ठरु शकतो".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
प्रकरणाचा पोलीस तपास सुरू
फुलटॉन काऊंटी शेरीफच्या कार्यालयाने यासंदर्भात एक वक्तव्य जारी केलं आहे. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची स्थिती खराब आहे हे उघडच आहे. ही यंत्रणा ढासळत चालली आहे. अशा परिस्थितीत कैद्यांना स्वच्छ, व्यवस्थित आणि आरोग्यदायी वातावरण देणं कठीण आहे.
फुलटॉन काऊंटी तुरुंगाचं व्यवस्थापन शेरीफ यांचं कार्यालयच करतं. थॉम्पसन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय यासंदर्भात सविस्तर चौकशी सुरू झाली आहे.
फुलटॉन काऊंटी तुरुंगात ढेकूण, किडे आणि जंतूंपासून कैद्यांचा बचाव करण्यासाठी 5 लाख डॉलरची तरतूद करण्यात येत आहे असं या वक्तव्यात म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
तुरुंगातील परिस्थितीवर देखरेख करण्यासाठी प्रोटोकॉलही बदलण्यात आले.
कैद्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचीही पडताळणी करण्यात येत आहे. त्यातून हे स्पष्ट होऊ शकेल की याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येऊ शकेल का याची चाचपणी करण्यात येत आहे.
शेरीफ कार्यालयाने हेही म्हटलं आहे की, "कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन एका मोठ्या तुरुंगाची आवश्यकता आहे. कैद्यांनी अधिक चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठीही काम होणं गरजेचं आहे. कोठड्यांमध्ये स्वच्छता पाळली जाणं गरजेचं आहे".
फुलटॉन काऊंटी तुरुंगात कैद्यांची संख्या खूप असल्याचं याआधीही बोललं गेलं आहे. कैद्यांना मूलभूत सोयीसुविधाही मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. इथल्या सोयीसुविधांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.
गेल्या वर्षी सदर्न सेंटर फॉर ह्यूमन राईट्सने 'अनकंटेड आऊटब्रेक्स ऑफ लाईक्स, स्केबीज लीव पीपल अट फुलटॉन जेल डेंजरसली मालनरिश्ज्ड' या नावाने अहवाल प्रसिद्ध केला होता. फुलटॉन तुरुंगात त्वचेच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर संसर्ग असा या अहवालाचा आशय होता.
या तुरुंगासमोर अनेक आव्हानं आहेत. भविष्यात ढेकूण, कीडे यांची वाढ रोखणं आणि तुरुंगात स्वच्छता राखणं अशा सूचना अहवालकर्त्यांनी दिल्या होत्या
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








