'द कश्मीर फाइल्स' वर ‘असभ्य आणि प्रोपेगंडा' अशी टीका करणारे नदाव लपिड कोण आहेत?

फोटो स्रोत, PIB
गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी चेअरमन नदाव लपिड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट बंडल आणि प्रोपगंडा तयार करणारा आहे असं म्हटलं आणि एक मोठा वाद निर्माण झाला.
सोमवारी 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. त्यात विजेत्या ठरलेल्या चित्रपटांची घोषणा करण्याच्या आधी नदाव लपिड यांना मंचावर बोलावण्यात आलं.
ते म्हणाले, “काल आम्ही सुरुवातीला डेब्यू कॉम्पिटिशन मध्ये सात चित्रपट आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या प्रवर्गात 15 चित्रपट पाहिले. त्यातील 14 चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे होते. त्यांच्यावर आमची चांगली चर्चा झाली. 15 वा चित्रपट काश्मीर फाईल्स होता. तो पाहून आम्ही विचलित आणि हैराण झालो. हा प्रोपगंडा पसरवणारा अश्लील चित्रपट वाटला. तो महोत्सवात अयोग्य होता.”
“या मंचावर मी माझ्या भावना सहज व्यक्त करू शकतो याचा मला आनंद आहे. कारण या महोत्सवात अशा प्रकारच्या गंभीर चर्चांना प्रोत्साहन दिलं जातं. कलेसाठी आणि प्रत्यक्ष आयुष्यासाठी ते गरजेचं आहे.”
भाषण सुरू करण्याच्या आधी लपिड म्हणाले की मी खरंतर लिखित स्वरुपात भाषण देत नाही.
मात्र यावेळी त्यांनी लिहिलेलं भाषण वाचतलं कारण काही मुद्दे त्यांना अधोरेखित करायचे होते
या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.
समारोपाला उपस्थिती लावण्याधी झालेल्या एका मुलाखतीत ठाकूर म्हणाले, “मला चांगले चित्रपट पाहायला आवडतात आणि उत्तमोत्तम चित्रपट तयार व्हावेत असा माझा प्रयत्न असतो.” या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
यावर या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत, “सत्य ही सर्वांत धोकादायक गोष्ट आहे, ते लोकांना खोटं बोलण्याससुद्धा भाग पाडू शकतं.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भाजपनं यशस्वीपणे ‘भारत’ ब्रँडचं जगभरात नुकसान केलं आहे, अशी टीका टीआरएसचे नेते वाय. सतीश रेड्डी यांनी ट्विटरवरून केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

फोटो स्रोत, @AnupamPKher
नदाव लपिड कोण आहेत?
नदाव लपिड इस्रायली चित्रपट निर्माते आहेत आणि यंदाच्या इफ्फी ज्युरीचं चेअरमन करण्यात आलं होतं.
1975 मध्ये इस्रायलच्या तेल अवीव शहरात जन्म झालेल्या लपिड यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे.
सैन्यात काही काळ सेवा केल्यानंतर ते काही काळ पॅरिसमध्ये होते.
त्यानंतर लपिड इस्रायलला परतले आणि जेरुसलेमच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पदवी घेतली.
गोल्डन बीयर आणि कान ज्युरी पुरस्कार मिळवण्याऱ्या लपिड यांचे अनेक चित्रपट चर्चेत असतात. त्यात पोलिसमॅन, किंडरगार्डन टीचर या चित्रपटांचा समावेश आहे.
नदाव लपिड यांना इस्रायलच्या भारतातील राजदुत नाओर गिलोन यांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे.
काश्मीर फाईल्सवर टीका केली म्हणून त्यांनी लपिड यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढलेत.
'मी हे पत्र मुद्दाम हिब्रूमध्ये लिहित नाहीये कारण ते भारतातल्या बंधू भगिनींनाही कळायला हवं. पत्र बरंच लांबलं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांगतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”
त्यांनी पत्रात पुढे नेमकं काय म्हटलंय हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लपिड यांच्या भाषणावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
ज्योत जीत नावाच्या एका ट्विटर युजरने म्हटलंय, नदाव लपिड यांची टिपण्णी हा पीडितांचा अपमान आहे. यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
विवेक अग्निहोत्री हे काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यात अनुपम खेर यांची मुख्य भूमिका आहे. मिथून चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. काश्मीर फाईल्स हा चित्रपट नेहमीच चर्चेत राहिला. अनेक समीक्षकांनी हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचं म्हटलं होतं.
हा चित्रपट काश्मीरमध्ये कथितरित्या झालेल्या काश्मीर पंडितांच्या पलायन आणि हत्येवर आधारित आहे.
हा चित्रपट 11 मार्चला रिलीज झाला होता. अनेक चित्रपटगृहात तो हाऊसफुल होता. चार राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित केला होता. हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आणि गुजरात या राज्यात भाजपचं सरकार आहे.
यावर्षी सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होतो.
चित्रपट रिलीज झाल्यानेतर विवेक अग्निहोत्रीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर एक फोटो व्हायरल झाला होता.
अभिषेक अग्रवालने नरेंद्र मोदींबरोबर एक फोटो शेअर केला होता. विवेक अग्निहोत्री यांनी हा फोटो रिट्विट केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)