इस्रायलच्या राजदुतांनी नदाव लपिड यांना ठणकावलं, म्हणाले 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'

नाओर गिलोन

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन

नदाव लपिड यांना इस्रायलच्या भारतातील राजदुत नाओर गिलोन यांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. काश्मीर फाईल्सवर टीका केली म्हणून त्यांनी लपिड यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढलेत.

वाचा संपूर्ण पत्र.

नदाव लपिड

फोटो स्रोत, PIB

'मी हे पत्र मुद्दाम हिब्रूमध्ये लिहित नाहीये कारण ते भारतातल्या बंधू भगिनींनाही कळायला हवं. पत्र बरंच लांबलं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांगतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”

का ते पुढे सांगतो.

भारतात 'अतिथी देवो भव' ही संस्कृती आहे. तुम्हाला भारतीयांनी इतक्या महत्त्वाच्या पदी बसवलं, तुम्हाला आदर दिला, तुमचं आदरतिथ्य केलं. पण तुम्ही याचा भयंकर अपमान केला आहे.

त्यांनी फौदा या मालिकेच्या प्रेमापोटी या मालिकेतल्या महत्त्वाच्या पात्रांना इथे आणलं. मला असं वाटतं की याच कारणापायी त्यांनी तुम्हाला आणि मलाही इथे बोलावंलं.

Ynetnews समोर तुला तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण का द्यावं लागलं असेल हे मी समजू शकतो. पण ‘आमचा शत्रू एकच आहे आणि आमचे शेजारी चांगले नाहीत.” असं तुम्ही का म्हणालात? इस्रायल आणि भारतात बराच सारखेपणा आहे असं मी आणि मंत्र्यांनी एकमुखाने हे सांगितल्यावर तुम्ही असं कसं बोलू शकता?

आम्ही दोन देशात किती सारख्या गोष्टी आहेत याबद्दल बोललो. जेव्हा भारतातले मंत्री इस्रायलमध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले होते की इस्रायल हा तंत्रसंपन्न देश आहे. भारत आणि इस्रायलची चित्रपटसृष्टी एकत्र येऊन काहीतरी करू शकतो असंही ते म्हणाले. मी भारतीय चित्रपट पाहून मोठा झालो असंही म्हणालो.'

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'इस्रायलमधल्या अनेक कलाकृती भारतात अतिशय आवडीने पाहिल्या जातात. अशा परिस्थितीत जेव्हा मी भारतात येतो तेव्हा आपण त्याचा आदर करायला हवा.

मी काही चित्रपट क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. मात्र इथल्या घटनांचा नीट अभ्यास न करता वक्तव्य करणं हे असंवेदनशील आहे. काश्मीर ही भारताची भळभळती जखम आहे. काश्मीरच्या घटनांनी पोळलेले अनेक लोक आपल्या आसपास आहेत आणि आजही ते या घटनांची किंमत मोजत आहेत.

मी सुद्धा छळछावणीत राहिलो आहे. आता भारतीय लोक Schindler’s list या चित्रपटावर ताशेरे ओढत आहेत. मी त्यांचाही निषेध करतो. अशा भूमिकांचं समर्थनच होऊ शकत नाही. तुम्ही काश्मीरबद्दल किती संवेदनशील आहात हे इथे दिसलं.

Ynet ला तुम्ही जी मुलाखत दिली त्यात तुम्ही काश्मीर फाईल्स बदद्ल असलेल्या आक्षेपाबद्दल बोललात. त्यातून तुम्हाला इस्रायलच्या राजकारणातल्याही अनेक गोष्टी आवडत नाही असं प्रतित होतं.

माझी तुम्हाला एक सूचना आहे. तुम्ही पूर्वीपासूनच स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाता. या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा वापर करून इस्रायलमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत नाही याबाबतही भाष्य करावं. तुमचा वैताग इतर देशांच्या व्यासपीठावर काढू नका. ही तुलना करण्यासाठी तुमच्याकडे बरेच वास्तवदर्शी मुद्दे आहेत याचा मला विश्वास आहे. कारण माझ्याकडे तसे निश्चितच नाहीत.'

'तुम्ही काहीतरी परखड विधान केलंत आणि भूमिका मांडली या आवेषात इस्रायलला परत जाल. आम्ही इस्रायलचं प्रतिनिधित्व करतो आणि आम्हाला इथेच रहायचं आहे. आम्हाला लोकांनी काय मेसेज पाठवले आहेत हे एकदा जरा बघा आणि त्याचे आमच्या टीमवर काय परिणाम होईल याचा जरा विचार करा.

भारत आणि इस्रायल या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तुमच्या या वक्तव्यानंतरही ते तसेच राहतील याची मला खात्री आहे.

पण एक माणूस मला लाज वाटते. मात्र या दोन देशात असलेल्या संबंधातून यजमानांनी जे औदार्य दाखवलं आणि तुम्ही ज्या पद्धतीने या मैत्रीचे पांग फेडले ते पाहता मी त्यांची मनापासून माफी मागतो.

काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य हे कायमच कटू असतं. त्यामुळे लोकांना खोटं बोलावं लागतं.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.'

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)