सुंता केल्यामुळे लैंगिक आयुष्य खरंच सुधारतं? सुंताबाबतच्या 4 प्रश्नांची उत्तरं

सुंता

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फेल्पी लाम्बिआस
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सुंता करण्याची प्रथा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली.

इतिहासकारांच्या मते 15,000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये ही प्रथा सुरू करण्यात आली आणि ती आजतागायत सुरू आहे. प्रत्येक तीन पुरुषांपैकी एकाची सुंता करण्यात येते.

सुंता केलेल्या पुरुषांमध्ये मुस्लिम पुरुषांची संख्या सगळ्याxत जास्त आहे. सुंता करताना लिंगाच्या वरची त्वचा काढून टाकतात. मुस्लिम आणि ज्यू लोकांमध्ये ही प्रथा पाळली जाते.

दुसरा क्रमांक अमेरिकेतल्या पुरुषांचा आहे. 2016 मध्ये जारी झालेल्या माहितीनुसार 80.5% लोकांची सुंता केली जाते. कारण त्याचे वैद्यकीयदृष्ट्या फायदा होतो असा तिथे समज आहे.

जगातील बहुतांश सुंता नवजात मुलांवर केली जाते. वैद्यकीय कारणांमुळे केली नाही तर ती पुढे कधीतरी करण्यात येते. सुंता या प्रक्रियेबद्दल पडलेले चार प्रश्न आणि त्यांची उत्तरं.

1.शिश्नाभोवती असलेल्या त्वचेचं काय महत्त्व असतं? ती कापल्यावर काय होतं?

सुंता

फोटो स्रोत, Getty Images

शिश्नाभोवती असलेल्या त्वचेमुळे शिश्नमणी किंवा सुपारी झाकली जाते. शिश्नाभोवतीची त्वचा चिकटलेली असते. मात्र काही त्वचा किंचित बाहेर आलेली असते. जर काही अडचण नसेल तर शिश्नमणी पूर्ण दिसावा इथपर्यंतची त्वचा काढून टाकायला हवी. लिंग ताठरल्यावर शिश्नमणी पूर्ण दिसायला हवा.

या त्वचेच्या आतला भाग मऊ असतो. स्त्रियांच्या योनिमार्गाच्या मुखाजवळ अशा प्रकारची त्वचा असते.

“या त्वचेचं काम शिश्नाला झाकण्याचं असतं. ती एका कव्हरसारखं काम करते" असं मूत्रशल्यविशारद अना मारिया यांनी सांगितलं.

ही त्वचा रोगप्रतिकारक शक्तीचंही काम करते असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. ही त्वचा नसेल तरी पुरुषांच्या आरोग्यात फारसा फरक पडत नाही.

शिश्नमणी हा लिंगाचा अतिशय संवेदनशील भाग असतो. जर लिंगावरची त्वचा बालपणी, पौगंडावस्थेत किंवा प्रौढावस्थेत काढली तरी शिश्नमण चा संपर्क थेट कपड्यांबरोबर किंवा हवेबरोबर येतो.

याचा कारणामुळे सुंता झाल्यानंतर कापडाबरोबर शिश्नमणी घासला गेल्यामुळे पुरुषांना सुरुवातीला अतिशय अस्वस्थ वाटतं. शिश्न ताठरल्यावर अस्वस्थ वाटतं.

काही काळानंतर शिश्नमण्यावरची त्वचा जाड होते आणि त्यावरची संवेदना हरवते.

सुंता दोन प्रकारे केली जाते. एक पारंपारिक पद्धतीने. त्यात ही त्वचा कापली जाते किंवा स्टॅपव गनचा वापर करून ही सुंता केली जाते. लोकल अनेस्थेशिया देऊन सुद्धा ही शस्त्रक्रिया करता येते. अनेकदा पूर्ण भूलही देण्यात येते. कारण हा भाग अतिशय संवेदनशील असतो

2. सुंता करण्याचं योग्य वय काय?

सुंता

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धर्माचा विचार सोडून आता आरोग्याचा विचार केला तर त्याबद्दल वेगवेगळी मत मतांतरं आहेत.

एका बाजूला अमेरिकेतल्या बहुतांश लोकांचं असं मत आहे की जन्म झाल्याबरोबरच सुंता करावी. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते “नवजात मुलांवर ही शस्त्रक्रिया केली तर त्याचे अनेक फायदे आहेत.”

असं केल्यामुळे मूत्रसंसर्ग होत नाही, शिश्नाचा कॅन्सर होत नाही आणि HIV सारखे आजार पसरत नाही.

मात्र जन्माला आल्याबरोबर ही शस्त्रक्रिया करावी यासाठी फारसे ठोस कारणं अद्यापही उपलब्ध नाही त्यामुळे ही शस्त्रक्रिया अनिवार्य करता येणार नाही.

“हा निर्णय पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचा असतो,” असं AAP चे बालरोगतज्ज्ञ इला शेपिरो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

मात्र रॉयल डच मेडिकल असोसिएशन यासंबंधी एक वेगळं मत नोंदवलं आहे. त्यांच्या मते लहान मुलांची सुंता करू नये कारण, “शरीराच्या स्वच्छतेसाठी सुंता करण्याची अजिबात गरज नाही आणि त्यामुळे वैद्यकीय कारणांशिवाय सुंता करू नये.”

“उलट सुंता केल्यामुळे वैद्यकीय आणि मानसिक गुंतागुंत वाढते. रक्तस्राव, संसर्ग, मूत्रनळी आकुंचन पावणं, पॅनिक अटॅक अशा अनेक समस्या उद्धवतात,” असं या संस्थेचं मत आहे.

सुंता करण्यासाठी phimosis, paraphimosis आणि balanits ही तीन कारणं आहेत.

जेव्हा त्वचा लिंगाच्या टोकापर्यंत जाते आणि शिश्नमणी बाहेर येईपर्यंत ती मागेच जात नाही. लहान वयात हे लक्षात आलं तर क्रीमच्या सहाय्याने ही समस्या सोडवता येते.

Paraphimosis या स्थितीत त्वचा एकदम पुढे जाते आणि मागेच सरकत नाही.

Balanits या स्थितीत ग्लान्स पेनिस हा भाग सुजतो. स्वच्छता न ठेवल्याने ही स्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी रोज अंघोळ करताना त्वचा मागे करून साबणाने स्वच्छ धुवायला हवी. अन्यथा त्यातून पांढऱ्या रंगाचा स्राव बाहेर येतो. ही स्थिती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर निर्माण होऊ शकते.

3.सुंता केल्याने त्यांच्या लैंगिक आयुष्यावर किंवा संवेदनांवर काही परिणाम होतो का?

शापिरो यांच्यामते या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण सुंता करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लैंगिक आरोग्यावर काय परिणाम झाला याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे याचं कोणतंही ठोस उत्तर नाही.

सुंता झाल्यानंतर शिश्न नवीन रुपाशी जुळवून घतो, पण शिश्नाचा बराचसा भाग बाहेर येतो त्यामुळे अस्वस्थ वाटू शकतो असं ऑट्रन म्हणतात.

शिश्नमणी सुंता करण्याच्या आधी त्वचेच्या आत सुरक्षित असतो. सुंता झाल्यानंतर त्याचा हवेशी थेट संपर्क येतो.

“शिश्न कोरडं पडायला लागतं. त्वचा जाड व्हायला लागते आणि संवेदना बदलतात,” असं शापिरो सांगतात. जेव्हा त्वचा काढली जाते तेव्हा तिथे असलेल्या मज्जातंतूचं जाळं ही निघून जातं.

काही रुग्ण डॉक्टरकडे येतात. वरच्या त्वचेशिवाय शिश्न आणखी चांगलं दिसेल असं त्यांना वाटतं म्हणून त्यांना ही सर्जरी करायची असते.

अशा प्रकारच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. मात्र याआधी काही गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. शिश्न मोठं दिसत नाही, लांब होत नाही. तसंच सेक्सच्या वेळी जास्त ताकदसुद्धा येत नाही. वीर्यस्खलन सुद्धा आधीसारखंच होतं.

सुंता केल्यानंतर चार ते पाच तास लैंगिक संबंध न ठेवण्याचा इशारा दिला जातो.

4. सुंता केल्यामुळे HIV सारखे आजार टाळता येतील का?

सुंता

फोटो स्रोत, Getty Images

सुंता करण्याचं समर्थन करणारे लोक म्हणतात की सुंता केल्यावर HIV सारखे आजार होत नाही.

संयुक्त राष्ट्रांनीसुद्धा पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात सुंता करण्याचे मोठे उपक्रम आयोजित केले होते.

ज्या देशांमध्ये HIV चां संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो त्या देशात विरुद्धलिंगी व्यक्तींमध्ये HIV च्या संसर्गाचं प्रमाण कमी होतं.

“HIV आणि सुंता यांचा नक्की काय संबंध आहे हे अद्याप समजलेलं नाही कारण अमेरिकेत HIV चं प्रमाण जास्त आहे आणि तिथेच सुंता करण्याचं प्रमाण जास्त आहे. नेदरलँड्समध्ये हे प्रमाण व्यस्त आहे. तिथे सुंता करण्याचं आणि HIV चं प्रमाण कमी आहे,” असं मेडिकल असोसिएशन ऑफ युरोपियन कंट्रीचं म्हणणं आहे.

समलिंगी व्यक्ती सेक्स करत असतील तर HIV पासून सुरक्षा कमी मिळेल.

सिफिलीस गन्होरिया, हर्पिस या लैंगिक संबंधातून पसरलेले आजार हे सुंता केल्यामुळे पसरत नाही असा कोणताही पुरावा नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)