जगात 'या' चार ठिकाणचे नागरिक जगतात सर्वाधिक, वाचा त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य..

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

ल्युसिल रँडन यांनी त्यांच्या वयाच्या 118 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असा विक्रम त्यांच्या नावावर होता.

फ्रेंच नन असलेल्या ल्युसिल यांना सिस्टर आंद्रे म्हणून ओळखलं जायचं. त्यांनी दोन्ही महायुद्धे पाहिली होती. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या क्षणाच्या त्या साक्षीदार होत्या. आणि त्यांनी डिजिटल युगही पाहिलं.

त्यांचं वयोमान पाहता त्यांची गोष्टच काही वेगळी दिसते. त्या अशा जगाचा भाग होत्या जिथं माणसं सरासरी 73.4 इतक्या वर्षांचं आयुष्य जगतात.

मात्र अलीकडच्या काही वर्षात लोकांचं आयुर्मान वाढत चाललंय. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, या शतकाच्या मध्यापर्यंत माणसाचं सरासरी वय 77 वर्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

लोकांचे आयुर्मान वाढत आहे. जन्मदर कमी होतोय त्यामुळे वृद्धांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे.

जगात आज पाच वर्षांखालील मुलांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची आहे. पण जगातील सर्वच देशांमध्ये सारखीच परिस्थिती नाहीये.

मोनॅको या देशातील लोकांचं सरासरी वय 87 वर्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला आफ्रिकेतील गरीब देश असलेल्या रिपब्लिक ऑफ चाड या देशातील जनतेचं सरासरी वय केवळ 53 वर्षे आहे.

सरासरी वयाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर मोनॅकोनंतर चीन प्रशासित हाँगकाँगचा नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर मकाऊ आणि चौथ्या क्रमांकावर जपान आहे. जपानमधील लोकांचं सरासरी वय सर्वात जास्त आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्सच्या रिपोर्टनुसार, सरासरी वय जास्त असणाऱ्या देशांच्या यादीत लिकटनस्टाइन, स्वित्झर्लंड, सिंगापूर, इटली, दक्षिण कोरिया आणि स्पेन आदी देश आहेत.

कोव्हिड साथरोग आणि महायुद्ध या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर मागच्या दोनशे वर्षापासून माणसाचं सरासरी आयुष्य सातत्याने वाढत आहे. व्हॅक्सिन, एंटीबायोटिक्स आणि चांगल्या प्रतीच्या औषधांसोबतच स्वच्छता, अन्न आणि राहणीमानामुळे सरासरी वय वाढत आहे.

योग्य निर्णय, चांगले परिणाम..

ज्येष्ठ नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वृद्ध महिला
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वृद्धत्व येण्यात अनुवांशिकता महत्वाची ठरत असते. पण यात इतरही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. जसं की, एखादी व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये राहते आहे, एक माणूस म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत.

दीर्घायुष्यी होण्यासाठी फक्त उत्तम आरोग्य व्यवस्था आणि उत्तम आहारच पुरेसा नाहीये. यात तुमचे निर्णय देखील महत्त्वाचे ठरतात. या निर्णयांना तज्ज्ञ 'स्मार्ट डिसिजन' म्हणतात. विशेषत: संतुलित आहार, पुरेशी झोप, तणावावर नियंत्रण आणि व्यायामाशी संबंधित निर्णय महत्वाचे असतात.

जे देश सरासरी वयाच्या बाबतीत पुढं आहेत त्यांच्यात दोन साम्य आहेत. पहिलं म्हणजे उच्च उत्पन्न आणि दुसरं म्हणजे त्या देशांचा आकार.

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अंदाज विभागाचे प्रमुख पॅट्रिक गेरलँड सांगतात की, या यादीत मोनॅको आणि लिकटनस्टाइन सारखे लहान देश पुढे आहेत. त्यांच्या लोकसंख्येमध्ये इतर देशांप्रमाणे विविधता दिसत नाही.

ते पुढे सांगतात की, "हे देश वेगळे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांची लोकसंख्या वेगळी आहे. इतर देशांमध्ये ज्या प्रकारे विविध प्रकारच्या लोकसंख्येचं मिश्रण पाहायला मिळतं तसं या देशांमध्ये पाहायला मिळत नाही."

बीबीसीशी बोलताना पॅट्रिक सांगतात, "या लोकांचं राहणीमान उच्चप्रतीचं असतं. आरोग्य सुविधा आणि शिक्षणाच्या सुविधा चांगल्या असतात."

वेगवेगळ्या देशांमध्‍ये मोठा फरक दिसून येतोच, मात्र कधीकधी एकाच देशामध्ये हा मोठा फरक पाहायला मिळतो. यामागे मोठ्या प्रमाणावर असलेली असमानता हे एक मुख्य कारण आहे. यामुळे विविध सामाजिक गटांच्या सरासरी वयातील फरक वाढतो.

ते म्हणतात, "युरोपातील अनेक देशांमध्ये ऐंशीपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचं प्रमाण मोठं आहे. तिथे सरासरी वय जास्त आहे."

वृद्धापकाळासाठीचा 'ब्लू झोन'..

ज्येष्ठ नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्ल्यू झोन

लोकसंख्येचा एक अतिशय लहान भाग म्हणजे ब्लू झोन. यात दुसऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांचा समावेश होतो.

काही दशकांपूर्वी जनसांख्यिकीशास्त्रज्ञ मिशेल पुलान आणि जेरोन्टोलॉजिस्ट जानी पेस यांनी जगातील सर्वात वृद्ध लोक कोठे राहतात याची शोधमोहीम हाती घेतली.

ज्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आढळले त्या त्या ठिकाणांवर त्यांनी निळ्या मार्करने मार्क केलं.

यात त्यांनी बरबाजा या भागावर निळ्या मार्करने जास्त मार्क बनवले होते. बरबाजा इटलीतील सार्डिनिया बेटावर आहे. या भागाला त्यांनी 'ब्लू झोन' असं नाव दिलं. तेव्हापासून ज्या ठिकाणचे लोक चांगल्या दर्जाचं आयुष्य जगतात त्यांना ब्लू झोनमध्ये स्थान मिळत गेलं.

या अभ्यासाच्या आधारे पत्रकार डॅन ब्यूटनर यांनी तज्ञांची एक टीम नेमली जेणेकरून अशाच इतर समुदायांची माहिती गोळा करता येईल.

त्यांना आढळलं की, सार्डिनिया व्यतिरिक्त आणखी चार ठिकाणी ब्लू झोन आहेत. यात जपानमधील ओकिनावा बेट, कोस्टा रिकामधील निकोया, ग्रीसमधील इकारिया बेट आणि कॅलिफोर्नियामधील लोमा लिंडा अॅडव्हेंटिस्ट कम्युनिटीचा समावेश आहे.

दीर्घायुष्यासाठी अनुवांशिक घटक वरदान आहेत यात शंका नाही.

डॉक्टर्स आणि विविध विषयांतील शास्त्रज्ञांच्या गटांनी ब्लू झोनवर परिणाम करणारे इतर घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी जगाच्या विविध भागांना भेटी दिल्या.

2008 मध्ये ब्युटनरने 'द ब्लू झोन: लेसन्स फॉर लिव्हिंग लाँगर फ्रॉम द पीपल हू हॅव द लाँगेस्ट' हे पुस्तक प्रकाशित केलं.

तेव्हापासून त्यांनी हा विचार पुढे नेण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं.

पण प्रत्येकजणच त्यांच्या मताशी सहमत नव्हता. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं मत होतं की त्यांनी दीर्घकालीन वैज्ञानिक अभ्यासाऐवजी निरीक्षणावर आधारित मत तयार केलं आहे.

ब्लू झोन काय आहे?

ज्येष्ठ नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्येष्ठ नागरिक

ब्युटनर आणि त्यांच्या टीमला या समुदायांच्या अभ्यासात काही समानता आढळली. या आधारावर त्यांनी त्या समाजातील लोकांचं आयुष्य जगातील इतर लोकांच्या तुलनेत कसं जास्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या आयुष्यात एक उद्देश होता. त्या उद्देशांसाठी ते रोज सकाळी लवकर उठतात.

ते कौटुंबिक बंध मजबूत ठेवतात.

ते नॉर्मल रूटीन पेक्षा वेगळ्या गोष्टी करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते सामाजिक सवयींचा भाग असलेल्या कार्यक्रमात सहभागी होतात. उदाहरणार्थ लोमा लिंडाची प्रार्थना करतात. ओकिनावामध्ये महिलांसाठी टी पार्टी आयोजित केली जाते.

ते पोटभर जेवत नाहीत. पोटाच्या क्षमतेच्या फक्त 80 टक्के जेवण जेवतात.

ते संतुलित आहार घेतात. यात भाज्या आणि फळांचं मुबलक प्रमाण असतं.

तो मर्यादित प्रमाणात दारूचं सेवन करतात.

तो दररोज चालतात, शारीरिक हालचाली करतात.

त्यांच्यात समाजात भावनिक बंध मजबूत असतात. ते सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या सवयींना प्रोत्साहन देतात.

ते अशा समूहाचा भाग आहेत जिथे श्रद्धा किंवा धर्माचा प्रचार केला जातो.

याव्यतिरिक्त चांगलं वातावरण, चांगला स्वभाव, सकस आहार आणि मोठ्या शहरांपासून दूर राहणं हा सुध्दा त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे.

मात्र ब्लू झोनचा भाग होण्यासाठी, तुमचा जन्मही याच ठिकाणी व्हायला हवा, शिवाय तुम्ही त्या समुदायाचे सक्रिय सदस्य असलं पाहिजे.

त्यामुळे ज्या लोकांना निरोगी आणि चांगलं आयुष्य हवं आहे त्यांच्यासाठी या पद्धती उपयुक्त ठरू शकतात.

एकटं राहणं टाळा..

तज्ज्ञांचं मत आहे की, आर्थिक स्थिती आणि गुणसूत्रात आढळणाऱ्या गोष्टींव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याकडे कमी प्रमाणात लक्ष देण्यात आलंय. जसं की जीवनाचा उद्देश आणि इतर लोकांशी संपर्क या गोष्टी घेता येतील.

या गोष्टी आपल्याला साध्या वाटतात पण ज्यांना दीर्घायुष्य हवंय त्यांच्यासाठी हे मोठं आव्हान आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगचे सायंटिफिक डायरेक्टर लुइगी फरुची सांगतात की, निरोगी वृध्द लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतात. ते घराबाहेर थोडा वेळ घालवतात. त्यांचे मित्र आणि नातेवाईकांशी असलेले संबंध दृढ असतात.

जनुके आणि जीवनशैलीचा माणसाच्या दीर्घायुष्यावर प्रभाव पडतो यावर तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत.

काही संशोधकांच्या मते, गुणसूत्रांची भूमिका 25 टक्के असते. याशिवाय माणूस कुठे राहतो, काय खातो, किती व्यायाम करतो, त्याची सपोर्ट सिस्टीम म्हणजेच मित्र आणि कुटुंबासोबत संबंध कसे आहेत यावर काही गोष्टी अवलंबून असतात.

दीर्घ आणि निरोगी जीवनासाठी अनुवांशिक घटकांची भूमिका नेमकी किती आहे याविषयी वैज्ञानिक समुदायात आजही वादविवाद सुरूच आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)