चष्म्याला 'पर्याय' असल्याचा दावा करणाऱ्या औषधाला स्थगितीचा आदेश

चष्म्याला 'पर्याय' असल्याचा दावा करणाऱ्या औषधाला स्थगितीचा आदेश

फोटो स्रोत, Getty Images

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने एका नवीन औषधाला मान्यता दिली. मात्र त्या परवानगीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)ने स्थगिती दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स. जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो असा औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनी Entod नं दावा केलाय.

पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहे?

जवळचं वाचायला वा दिसायला कठीण जाणं याला Presbyopia म्हणतात. वाढत्या वयानुसार डोळ्यांमधील लेन्स (डोळ्यातील बाहुलीच्या पाठीमागे असलेला पारदर्शक पदार्थ) कमी लवचिक आणि टणक होत जाते. यामुळे जवळच्या गोष्टींवर फोकस करायला कठीण जातं. चाळिशीनंतर हे बदल जाणवायला लागतात. यामुळेच अनेकांना चाळिशीनंतर जवळचा चष्मा म्हणजेच पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा वापरावा लागतो.

अशाच व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या आयड्रॉप्सबद्दल सध्या चर्चा आहे.

आय ड्रॉप्स

फोटो स्रोत, Getty Images

PresVu आयड्रॉप्स काय आहेत?

Entod Pharmaceuticals (एन्टोड फार्मास्युटिकल्स) नावाच्या एका भारतीय कंपनीने हे आयड्रॉप्स तयार केले आहेत. आणि आयड्रॉप्सच्या या फॉर्म्युला आणि प्रक्रियेसाठीच्या पेटंटसाठीही अर्ज केल्याचं त्यांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

हे आयड्रॉप्स काय करतात?

तर हे ड्रॉप्स डोळ्यांत घातल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्हाला जवळचं अधिक स्पष्ट दिसू शकतं.

यामध्ये पायलोकार्पिन नावाचं औषध वापरण्यात आलंय. हे औषध गेल्या अनेक वर्षांपासून Glaucoma म्हणजे काचबिंदूवरच्या उपचारासाठी वापरलं जात होतं.

हे औषध डोळ्यात घातल्यानंतर डोळ्यांतली बाहुली लहान होते, त्यामुळे डोळ्यांच्या लेन्सची Depth of Field वाढते आणि जवळचं वाचतानाही अधिक चांगलं दिसू शकतं.

Depth of Field म्हणजे नजरेचा तो टप्पा जेवढ्या भागातलं सगळं तुम्हाला सुस्पष्ट दिसतं. म्हणजे तेवढ्या भागातलं सगळं Focused असतं. हे ड्रॉप्स डोळ्यांत घातल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसणारा हा भाग वाढतो.

स्थगितीचा निर्णय

जवळचं वाचण्यासाठीच्या चष्म्याला पर्याय असा दावा करण्यात आलेल्या PresVu आयड्रॉप्सना देण्यात आलेल्या परवानगीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)ने स्थगिती दिलीय. हे आयड्रॉप्स तयार करणारी कंपनी एन्टोड फार्माने उत्पादनाचं माध्यमं आणि सोशल मीडियामध्ये अनधिकृत प्रमोशन केल्याचं नियामकांनी म्हटल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

तर आपण कोणताही अनैतिक दावा केला नसून कोणतीही चुकीची गोष्ट माध्यमांसमोर वा लोकांसमोर मांडली नसल्याचं Entod Pharma कंपनीने उत्तरात म्हटलंय. माध्यमांसमोर प्रॉडक्ट लाँच करणं ही नेहमीची गोष्ट असून भारतातल्या सगळ्या कंपन्या असं करतात, असं त्यांनी म्हटलंय. आपल्या उत्पादनाच्या परवानगीला देण्यात आलेल्या स्थगितीला (Suspension) कोर्टात कायदेशीर आव्हान देणार असल्याचं एन्टोड फार्मा कंपनीने म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

आय ड्रॉप्सच्या प्रेस कॉन्फरन्समधला फोटो

फोटो स्रोत, ENTOD Pharma

या ड्रॉप्सबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं, "हे औषध नवीन नाही. ते खूप वर्षांपासून वापरलं जातं. पायलोकार्पिन नावाचं हे औषध आहे. गेली 100 वर्षं हे औषध ग्लुकोमा किंवा काचबिंदूच्या उपचारासाठी वापरलं जातं. सध्या हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जात नाही कारण याचे साईड इफेक्टस आहेत.

"PresVu या औषधामध्ये पायलोकार्पस इंडिकस नावाच्या वनस्पतीपासून हे औषध तयार करण्यात आलेलं आहे. या औषधाचं पर्सेंटेज कमी करून 1.25% करण्यात आलं आहे. त्याचबरोबर याचा pH हा 3.5 पासून 5.5 पर्यंत केला आहे. याला बफर बेस दिला आहे ज्यामुळे डोळ्यात टाकल्यानंतर या औषधाचा pH हा डोळ्याच्या pH इतका होईल. त्यामुळे औषधाचं इरिटेशन डोळ्यात होणार नाही," डॉ. लहाने सांगतात.

लाल रेष
लाल रेष

ड्रॉप्स घातल्यानंतर पुढचे काही तास या औषधाचा परिणाम कायम राहतो आणि दूरच्या दिसण्यावर किंवा त्या चष्म्यावर या औषधाचा परिणाम होत नाही.

औषधाच्या वापराचे काही धोके आहेत का ?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोणतंही औषध विकसित करत असताना, त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात येतात. यामध्ये औषधाच्या परिणामकारकतेसोबतच त्याचे दुष्परिणामही तपासले जातात. या औषधाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्स भारतात आणि भारताबाहेरही घेण्यात आल्या आणि या उत्पादनाला अमेरिकेतही परवानगी मिळाली असल्याचं Entod Pharmasucticles चे सीईओ निखिल मसुरकर यांनी एका पोस्टमध्ये म्हटलंय.

मग या औषधाच्या वापराचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात का?

डॉ. लहाने सांगतात, "हे औषध काचबिंदूमध्ये वापरलं जात होतं. त्याचे साईड इफेक्ट्स असल्याने हे औषध वापरणं कमी किंवा बंद झालं आहे. त्याचं पर्सेंटेज तेव्हा 2% होतं. ते 1.25% वर आणल्याने याचे साईड इफेक्टस किती होतील हे सांगणं आज शक्य नाही. पुढे ते लक्षात येईल. पण पायलोकार्पिनचे साईड इफेक्टस आहेत. पहिला साईड इफेक्ट म्हणजे आपल्या डोळ्यांचा स्पाझम (स्नायूंची हालचाल झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना) होतो.

"आपली बाहुली जी लहान-मोठी होते, त्याचा स्पाझम होतो. त्याच बरोबर खाज येते. डोळ्यांत इरिटेशन होतं. यामुळे डोळा लाल होतो. आपलं डोकं दुखायला लागतं. फार काळ असं वापरल्याने डोळ्याला फटिग होतो. त्याला स्पाझम म्हणतात. ज्यांना चष्म्याचे मोठे नंबर आहेत, म्हणजे Myopia अशांच्या डोळ्यामागचा पडदा - रेटिना सुटू शकतो. आणि डिटॅच झाल्यानंतर नजर जाऊ शकते. त्यामुळे जरी हे औषध आपल्याला वरकरणी चांगलं वाटत असलं, तरी याचे धोके खूप आहेत आणि हे धोके असल्याने जेव्हा जेव्हा हे वापरायचंय, हे तात्पुरत्या स्वरूपाचं वाचण्यासाठीचं औषध असल्याने त्याची काळजी घेऊनच ते वापरलं पाहिजे," असं डॉ. लहाने सांगतात.

चष्म्यासाठी हा कायमस्वरूपी पर्याय आहे का?

चष्म्यासाठी हा कायमस्वरूपी पर्याय आहे का? याबद्दल बोलताना डॉ. लहाने म्हणाले, "चष्म्यासाठी हे कायमस्वरूपी अजिबात उत्तर नाही. हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये औषध टाकल्यानंतर त्या सहा तासांमध्ये जवळचा चष्म्याचा नंबर लावण्याची गरज पडत नाही. हे औषध सारखं टाकत राहिल्याने चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी जात नाही.

"हे औषध चष्म्याचा नंबर जाण्यासाठी नाही. या औषधाचे साईड इफेक्ट असतात. म्हणून हे औषध मार्केटमध्ये घेऊन डोळ्यांत टाकणं योग्य होणार नाही. आपला डोळा हे औषध टाकण्यासाठी योग्य आहे का नाही हे आपण आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून त्याच्यानंतरच हे वापरलं पाहिजे," असं डॉ. लहाने सांगतात.

औषधाबद्दलचे दावे - प्रतिदावे

दरम्यान, या औषधासाठीची परवानगी DCGI कडून मिळवताना Entod ने केलेले दावे हे अनैतिक आणि खोटे असल्याचा आक्षेप घेण्यात आल्याची बातमी ANIने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलीय.

PresVu ड्रॉप्स हा ' अचूक नसलेला आणि तात्पुरता उपाय' म्हणजेच 'Imperfect and temporary Solution' असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलंय.

दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलच्या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चारू मिथाल यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "गेली 75 वर्षं पायलोकार्पिन आय ड्रॉप्सचा वापर ग्लुकोमाच्या उपचारांसाठी केला जातोय. यामुळे तुमच्या डोळ्यांची बाहुली लहान होते आणि पिनहोल कॅमेरा इफेक्टमुळे तुम्हाला वाचायला मदत होते. वाचताना येणाऱ्या अडचणींवरचा हा अचूक नसलेला आणि तात्पुरता उपाय आहे. चष्मा हाच यावरचा अचूक पर्याय आहे."

PresVu ड्रॉप्स हा ' अचूक नसलेला आणि तात्पुरता उपाय' म्हणजेच 'Imperfect and temporary Solution' असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलंय.

दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलच्या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चारू मिथाल यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "गेली 75 वर्षं पायलोकार्पिन आय ड्रॉप्सचा वापर ग्लुकोमाच्या उपचारांसाठी केला जातोय. यामुळे तुमच्या डोळ्यांची बाहुली लहान होते आणि पिनहोल कॅमेरा इफेक्टमुळे तुम्हाला वाचायला मदत होते. वाचताना येणाऱ्या अडचणींवरचा हा अचूक नसलेला आणि तात्पुरता उपाय आहे. चष्मा हाच यावरचा अचूक पर्याय आहे."

तर आपण कोणताही अनैतिक वा खोटा दावा केला नसल्याचं Entod Pharmasuticals चे CEO निखिल मसुरकर यांनी म्हटलंय. मीडियाला सांगण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी या पूर्णपणे मोठ्या व्यक्तींमधील प्रेसबायोपिया वरील उपचारांसाठी मिळालेली मान्यतेची सूचना आणि आम्ही केलेल्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्सचा डेटा यांवर आधारित आहेत."

निखिल मसुरकर

फोटो स्रोत, ENTOD Pharma

फोटो कॅप्शन, Entod फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल मसुरकर

आता परवानगी मिळालेली हे आयड्रॉप्स हे अशा प्रकारचं एकमेव औषध आहे का?

तर भारतातलं हे पहिलं औषध आहे. पण Vuity, Visus Therapeutics, Eyenovia या आंतरराष्ट्रीय कंपन्याही असेच आयड्रॉप्स तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. तर Orasis Pharmaceuticals कंपनीला ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांच्या ड्रॉप्ससाठी FDA ची परवानगी मिळाली.

PresVu ड्रॉप्स थेट विकत घेता येणार नाहीत. फक्त नेत्ररोग तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शननेच या ड्रॉप्सची खरेदी ऑक्टोबरपासून करता येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)