ही 4 लक्षणं दिसली तर तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जायला हवं

eyes

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. डबनार मते वर्षातून एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायला हवं.

“काही केसेसमध्ये तुम्ही दोन वर्षांतून एकदा जाऊ शकता. पण वर्षातून एकदा जायलाच हवं,” असं डनबार यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं.

डोळ्याचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे माहिती असुनसुद्धा आपण डोळ्याचं आरोग्य गृहित धरलं जातं. कारण एक तर आपल्याला चांगलं दिसत असतं किंवा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन चष्म्याचा नंबर काढून तसाच ठेवलेला असतो.

डोळे

फोटो स्रोत, Getty Images

“ज्यांची दृष्टी चांगली असते ते तर कायमच हे गृहित धरतात. चाळिशी, पन्नाशीतही कधीही डोळे न तपासलेले लोकही आपल्या आसपास आहेत,” असं डॉ. डनबार सांगतात.

डोळे हा अतिशय गुंतागुतीचा अवयव आहे. त्यामुळे त्यात होणारे बदल सहजासहजी दिसत नाही. उदा. दोन डोळ्यांच्या दृष्टीमधील फरक, किंवा साधारण दृष्टीमधला फरक.

“जर तुम्ही नीट तपासणी केली नाही तर तुम्हाला चांगलं दिसणार नाही,” असं ते म्हणाले.

डनबार यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे कधी जायला हवं याची चार लक्षणं सांगितली आहेत

1. गाडी चालवताना त्रास

डनबार यांच्यामते, “जर तुम्ही ट्रॅफिकचं चिन्ह पाहण्याचा प्रयत्न करत असाल आणि काही दिसत नसेल तर ती धोक्याची घंटा आहे असं समजून घ्या.”

कॅमेरासारखा तुमच्या डोळ्याला सुद्धा फोकसची नितांत गरज असते.

डोळे

फोटो स्रोत, Getty Images

तुम्हाला जवळचं दिसत नसेल तर उजेड सगळा तुमच्या रेटिनाच्या समोर येतो. त्यामुळे लांबचं दिसत नाही.

अशा अवस्थेत गाडी चालवणं अतिशय धोक्याचं असू शकतं.

चष्म्यमुळे उजेड योग्य ठिकाणी विभागला जातो तसंच योग्य प्रमाणात प्रकाश तुमच्या डोळ्यांवर येतो.

त्याशिवाय Anti reflective Lens तंत्रज्ञानामुळे उजेडाची तीव्रता कमी होते त्यामुळे स्पष्ट दिसण्यास मदत होते.

2. जवळचं दिसत नाही

जर तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर, किंवा पुस्तक वाचताना चष्मा लावूनही त्रास होत असेल तर तुमचा नंबर बदलला असेल याची खात्री बाळगा.

डोळे

फोटो स्रोत, Getty Images

जसं वय होतं तसं डोळ्यातील लेन्सची लवचिकता कमी होते. त्यामुळे गोष्टींवर फोकस करताना त्रास होतो.

डनबार सांगतात की डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं मात्र प्रकाशाच्या परावर्तनाला त्रास होतो. एखाद्या गोष्टीची प्रतिमा रेटिनावर फोकस नसेल तर ती वस्तू धुरकट दिसू शकते.

चष्म्यामुळे परावर्तानाची समस्या सुटते आणि डोळ्यांना येणारा थकवा कमी होतो.

3. दृष्टी कमीजास्त होणं

डोळे

फोटो स्रोत, Getty Images

जर दिवसभरात तुमची दृष्टी कमी जास्त होत असेल तर तुम्हाला चष्मा बदलण्याची गरज आहे हे समजून घ्या.

डोळ्यांच्या स्नायूंना थकवा आल्यामुळे असं होत असल्याचं डॉ.डनबार सांगतात.

तुम्ही एकाच वस्तूवर बराच वेळ लक्ष केंद्रित करून बसले असाल किंवा स्क्रीन बघत बसला असाल तर डोळ्यांना थकवा येतो आणि फोकस कमी होतो.

“जर तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असाल, एखादा पिक्चर पहात असाल किंवा पुस्तक वाचत असाल तर तुमचा डोळे उघडझाप करण्याचा वेग कमी होतो. अगदी अर्ध्यावर येतो,” डनबार सांगतात.

तुम्ही डोळ्यावर जास्त ताण आणलात तर ते आणखी बिकट होऊ शकतं. तुम्हाला असं काही होत असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे लगेच जा.

4. एका किंवा दोन्ही डोळ्यातील दृष्टीत दोष येणं.

डोळे

फोटो स्रोत, Getty Images

एका किंवा दोन्ही डोळ्याच्या दृष्टीत फरक पडत असेल तर काहीतरी गंभीर सुरू आहे हे समजून जा.

डॉ.डनबार यांच्या मते, “जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर चष्मा बदला इतकं हे साधं आहे. कधीकधी हे अगदी गंभीर असू शकतं.”

उदाहरणार्थ, काही काळासाठी दृष्टी जाणं हे मोतीबिंदूचं लक्षण असू शकतं, असं ते सांगतात. यामुळे दृष्टिदोष निर्माण होतो, रात्रीची दृष्टी मंदावते. फोकस करायला त्रास होतो.

“सध्या असलेल्या तंत्रज्ञानामुळे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया आता फक्त 15 मिनिटात आटोपते,” असं तज्ज्ञ सांगतात.

काही गंभीर केसेसमध्ये डोळ्यांच्या बरोबरीन डायबेटिस किंवा उच्च रक्तदाबासारखे विकारही ओळखण्यात मदत होते. कारण त्यामुळे डोळ्यांच्या धमन्यांमध्ये फरक पडतो.”

या सर्व कारणामुळे लोकांनी त्यांचे डोळे वेळेवर तपासणं अत्यंत आवश्यक आहे, असं ते पुढे म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)