बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.

पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.तर मंडळी काळजी नको.

आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

ट्विटर, अ‍ॅमेझॉनमधून कर्मचाऱ्यांना काढून का टाकलं जात आहे?

ट्विटर, मेटा कंपनीकडून जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता अ‍ॅमेझॉन कंपनीच्या 10,000 कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे.

ऑनलाईन विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ही नोकर कपात केली, तर कंपनीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कपात असेल.

ऋषी सुनक नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, pmo twitter

नरेंद्र मोदी-ऋषी सुनक भेटीनंतर ब्रिटनने दिली 3000 व्हिसांना मंजुरी

इंडोनेशियात सुरू असलेल्या G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची कमान हाती घेतल्यानंतर त्यांची भारताच्या पंतप्रधानांसोबतची ही पहिलीच भेट आहे.

या भेटीचा फोटो पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

या फोटोमध्ये मोदी आणि सुनक गप्पा मारताना दिसत आहेत. या फोटोने सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसून येतं.

मोदी-सुनक यांच्या भेटीनंतर काही वेळातच ब्रिटनमध्ये कामास इच्छुक असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लिंकवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी..

गोवर

फोटो स्रोत, Getty Images

गोवर-रुबेला: लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक, काय काळजी घ्याल?

मुंबईत गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये लहान मुलांमध्ये गोवर पसरल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

मुंबईत आतापर्यंत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला सून सध्या गोवरचे 109 रुग्ण आहेत. तर 617 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य पथक निर्माण झालं असून त्यांच्याकडून विविध रुग्णालयांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाहणी सुरू आहे.

गोवर रुग्णसंख्या अचानक का वाढत आहे? सध्याची काय परिस्थिती आहे?

दिव्या अय्यर

फोटो स्रोत, COURTESY: DIVYA S IYER

महिला IAS अधिकाऱ्याने मुलाला कडेवर घेऊन केलं भाषण, त्यावरून वाद का?

केरळमधील एका महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या तीन वर्षीय मुलाला कडेवर घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण केलं.

या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात प्रचंड व्हायरल झाला.दिव्या एस. अय्यर असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव.

दिव्या यांची ही कृती योग्य की अयोग्य या मुद्द्यावरून आता सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अय्यर यांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेतलेलं आहे. त्या बोलत असताना मुलाने आपल्या आईच्या गळ्याभोवती आपले हात बांधलेले आहेत.

मध्येच मल्हार आपल्या आईचे गाल ओढतानाही व्हीडिओमध्ये दिसतं. दिव्या अय्यर अशाच प्रकारे तब्बल 10 मिनिटे भाषण करतात. मात्र यावरून वाद का झाला? वाचा सविस्तर लेख

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

रोहित शर्माला T-20च्या कर्णधारपदावरून हटवण्याची वेळ आली आहे?

तुमच्यावर कॅमेरा आहे आणि तुम्ही रडताय असं दृश्य दुर्मिळ असतं.

मात्र टी-20 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची अशीच परिस्थिती झाली होती.

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये त्याची अवीट छाप सोडली आहे. त्याच्या नावावर वनडेमध्ये सर्वांत जास्त डबल सेंच्युरीज आहेत.

त्याला हिटमॅन म्हणून ओळखलं जातं आणि तो आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

त्याचं अशा पद्धतीने भावूक होण्याने भारतीय क्रिकेटचे कोट्यवधी चाहते हळहळले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)