अमर सिंह यांचं सिंगापूरमध्ये निधन

अमर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते.

त्यांना उपचारासाठी सिंगापूर इथल्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचादारम्यान त्यांचं निधन झालं आहे.

2013 मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. त्यावेळी त्यांनी ट्वीटवर एक व्हीडिओ शेयर करत म्हटलं होतं की, टायगर अभी जिंदा है.

ट्वीटर

फोटो स्रोत, Twitter

विशेष म्हणजे अमर सिंह यांच्या मृत्यूपूर्वी केवळ दोन तास आधी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्वीट करून टिळकांना अभिवादन करण्यात आलं होतं.

मुलायम सिंह यांचे विश्वासू

अमर सिंह यांचा जन्म 27 जानेवारी 1956 ला अलीगढमध्ये झाला होता. त्यांनी कोलकात्यामधल्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली होती.

1996 साली ते पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

मुलायम सिंह- अमर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

अमर सिंह हे एकेकाळी समाजवादी पक्षातलं मोठं नाव होतं. ते मुलायम सिंह यादव यांच्या अतिशय विश्वासातले समजले जायचे.

समाजवादी पक्षामध्ये बॉलिवूडमधील तारे-तारकांना आणण्यासाठी तसंच पक्षाला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी अमर सिंह ओळखले जातात.

मात्र अमर सिंह यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात काँग्रेसमधून केली होती. ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य होते आणि कलकत्ता जिल्हा काँग्रेसशीही संबंधित होते.

आपल्या राजकीय आयुष्यात वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलेल्या अमर सिंह हे इंडियन एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालकही होते. त्याशिवाय त्यांनी नॅशनल टेक्सटाइल्स कॉर्पोरेशनचं संचालकपदही सांभाळलं होतं.

अमर सिंह यांना श्रद्धांजली

राज्यसभा खासदार आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीट करून अमर सिंह यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनीही ट्वीटरवरून अमर सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

चिराग पासवान यांनी अमर सिंह यांना श्रद्धांजली अपर्ण करताना म्हटलं आहे की, त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)