रशिया युक्रेन युद्धाची सहा महिन्यानंतर काय परिस्थिती आहे?

युक्रेन, महिला

फोटो स्रोत, Getty Images

रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन सहा महिने झालेत. 24 फेब्रुवारीला टीव्हीवर दिलेल्या एका संदेशात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या डोनबास भागात हल्ला करण्याची घोषणा केली. त्याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने ही कारवाई थांबवण्याचा आग्रह केला होता.

युक्रेनची राजधानी कीव्ह च्या आकाशात सायरन ऐकू येत होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सिकी यांनी इशारा दिला, "कोणी आमची जमीन, आमचं स्वातंत्र्य, आमचं आयुष्य आमच्यापासून हिरावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमचं संरक्षण करू."

हाच तो क्षण होता जेव्हा इथल्या लोकांचं आयुष्य नेहमीसाठी बदललं.

युक्रेनच्या स्वातंत्र्यदिन आहे आणि युद्ध संपायची कोणतीही चिन्हं दिसत नाही, आपण सहा ग्राफिक्सच्या माध्यमातून या युद्धाचा सहा महिन्यानंतर काय परिणाम झाला आहे ते पाहणार आहोत. रशियाने कोणत्या भागावर ताबा मिळवला ते किती लोक मारली गेली, स्थलांतरित झाली या सगळ्या बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

1. हल्ल्यापूर्वीचं युक्रेन

रशियाने हल्ला करण्यापूर्वी रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांनी डोनबास भागावर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवला होता. हा भाग युक्रेनच्या पूर्व भागात येतो.

21 फेब्रुवारीला रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या दोन फुटीर प्रांतांमध्ये स्थापन झालेल्या स्वघोषित दोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक यांना स्वतंत्रपणे मान्यता दिली. युक्रेन, नाटो आणि पाश्चिमात्य देशांनी या भूमिकेचा निषेध केला आणि त्यानंतर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य हलवण्याची परवानगी दिली.

रशिया युक्रेन

त्यावेळी रशियाने 2014 मध्येच रशियाने क्रिमिआवर ताबा मिळवला होता. बहुतांश देश या भागाला अजुनही युक्रेनचा भाग मानतात.

2. सहा महिन्यानंतर काय परिस्थिती आहे?

सहा महिन्यानंतर रशियाने आता बऱ्याच भागावर ताबा मिळवला आहे. त्यातही पूर्वेकडे त्यांचा दबदबा मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या काही दिवसात कीव्ह आणि युक्रेनच्या मोठ्या शहरांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं होतं. आता या भागाच्या बहुतांश भागातून रशियाला काढता पाय घ्यावा लागत आहे.

रशियाच्या फौजांनी लुहान्सक भागावर ताबा मिळवला आहे आमि डोन्स्टेक भागावर ते ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. खारकीव्ह शहरात कितीतरी मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते.

मे महिन्यात मारियोपोल भागातील ऐझ्वाल स्टीलवर्क्स मधून युक्रेनने त्यांचं सैन्य मागे घेतलं होतं. मोठ्या रक्तपातानंतर क्रिमिआकडे जाणाऱ्या भागावरही ताबा मिळाला आणि अझोवच्या समुद्रावर पूर्णपणे ताबा मिळाला त्यात युक्रेनच्या दक्षिण पश्मिम भागातही त्यांनी ताबा मिळवला आहे.

रशिया युक्रेन

क्रिमिआवर अजुनही रशियाचा ताबा आहे. ऑगस्टमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सिब्स्टोपोलच्या बाहेर बेलबाक एअरबेसच्या बाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. त्याचा वापर युक्रेनच्या विरुद्ध आक्रमणासाठी करण्यात आला होता.

रशियाने हल्ला केल्यावर त्यांनी सर्वप्रथम खेरसन भागावर ताबा मिळवला होता. मात्र युक्रेनने त्यांचा भाग परत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला.

3. किती लोक मारले गेले?

अशा प्रकारच्या परिस्थितीत किती लोक मारले गेले याची आकडेवारी कायमच अनिश्चित असते. Armed Conflict Location and Event Data Project (Acled) या संस्थेने जे सर्वेक्षण केलं त्यानुसार 10 ऑगस्टपर्यंत या युद्धात 13,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही अमेरिकेतील ना नफा ना तोटा तत्त्वावरची संस्था आहे आणि राजकीय हिंसाचाराच्या नोंदी ठेवते.

रशिया युक्रेन

मात्र तज्ज्ञांच्या मते हा आकडा अतिशय कमी सांगितला आहे. युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांच्या मते हा आकडा हजारोंच्या घरात आहे. मात्र त्यांच्या दाव्याची पुष्टी केली जाऊ शकत नाही आणि स्वतंत्रपणे पडताळणी करता येऊ शकणार नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या मते या संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या देशांनी दिलेल्या आकडेवारीवर विश्वास ठेवता येणार नाही.

4. किती लोक पळून गेले?

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 1.2 कोटी लोक पळून गेले आहेत असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे. 50 लाख लोक शेजारच्या देशात गेले आहेत. तसंच 70 लाख लोक युक्रेनमध्येच विस्थापित झाले आहेत.

मात्र अनेक विस्थापित लोक त्यांच्या मायदेशी परतले आहेत. विशेषत: कीव्ह सारख्या शहरात.

आक्रमणाच्या सुरुवातीपासून 17 ऑगस्टपर्यंत युक्रेनमधून 64 लाख लोक पळून गेले आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या विस्थापित संस्थेतर्फे सांगितलं आहे.

रशिया युक्रेन

युक्रेनचे काही लोक लुहान्सक आमि डोन्स्टेक भागातून रशियाला पळून गेले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की त्यांच्या सैन्याने 1,40,000 लोकांचा मारियोपोलमधून बचाव केला आणि त्यांनी कोणीही रशियाला जाऊ नये असं आवाहन केलं. काही स्वयंसेवी संस्थांनी सांगितलं की त्यांनी हजारो युक्रेनियन लोकांना रशिया सोडण्यासाठी मदत केली.

अनेक विस्थापित युक्रेन सोडून पोलंड किंवा जर्मनीला गेले आहेत.

5. किती नुकसान झालं?

सहा महिन्यानंतर युद्धामुळे युक्रेनचं झालेलं नुकसान स्पष्टपणे दिसतं. तिथे सगळीकडे बिल्डिंगचे अवशेष दिसतात. या संपूर्ण युद्धात 8 जूनपर्यंत 39 बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे. हा अंदाज कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने वर्तवला आहे.

रशिया युक्रेन

या संस्थेच्या अहवालानुसार युद्धाच्या दरम्यान 104 बिलियन डॉलरचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता आहे.

6. अन्नधान्यावर झालेला परिणाम

या युद्धामुळे मोठं अन्नसंकट निर्माण झालं आहे. अनेक देश युक्रेनवर गव्हाच्या निर्यातीसाठी अवलंबून असतात. मात्र रशिया हा मार्ग फेब्रुवारीपासून अडवून ठेवत आहे.

सहा महिन्यानंतर युक्रेनला निर्यात पुन्हा सुरळीत करायला परवानगी दिली आहे. या करारानुसार निर्यातीचा माल असलेल्या बोटींवर हल्ला करणार नाही असं आश्वासन रशियाने दिलं आहे तर कार्गो बोटींना योग्य मार्ग दाखवणार असल्याचं युक्रेन ने म्हटलं आहे.

युक्रेनजवळ असलेल्या काळ्या समुद्रातून गहू निघाला. मात्र अनेकांना अशी भीती वाटते की त्यांना परत येण्यासाठी विम्याचं कवच नाही.

रशिया युक्रेन

संयुक्त राष्ट्र आणि तुर्कीने हा करार करण्यास मदत केली. या युद्धातील हा एकमेव राजनैतिक करार आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अँटिनो गटरेस या करारामध्ये वैयक्तिकरीत्या सहभागी झाले होते. हा करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करावं असं ते म्हणाले.

टर्कीचे राष्ट्राध्यक्ष एरडोगेन म्हणाले की या करारामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात शांततेच्या चर्चा होऊ शकतात. मात्र रशिया युक्रेनच्या बाहेर गेल्यावरच शांततेची चर्चा होऊ शकते असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेल्निस्की म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)