कॉमनवेल्थ गेम्सः भारताचा महिला हॉकी संघ सेमी फायनलमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये भारताचा महिला हॉकी संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.
भारताने कॅनडाच्या संघाला 3-2 असे पराभूत केले. भारताचे आता 9 गुण झाले असून आता भारताचा संघ दुसऱ्या क्रमाकांवर आहे. भारताने तीन सामने जिंकले आणि इंग्लंडकडून एका सामन्यात पराभव स्वीकारला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने कांस्यपदक मिळवले आहे. 109 किलो वजनी गटात त्याला हे यश मिळाले आहे.
त्य़ाने एकूण 355 किलो वजन उचलले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
महिलांच्या लॉल बॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्यानंतर भारताला काही वेळातच पुरुषांच्या टेबल टेनिससंघाला सुवर्णपदक मिळाले आहे.
भारताने अंतिम सामन्यात सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशी भारताच्या सुशीला देवीने ज्युडोमध्ये 48 किलोग्राम वजनी गटात रौप्य पदक जिंकलं आहे.
अंतिम सामन्यात सुशीलाची लढत दक्षिण आफ्रिकेच्या मिशेला व्हाइटबोईविरुद्ध होईल.

फोटो स्रोत, SAI MEDIA
सुशीलाने याआधी 2014 साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
60 किलो वजनी गटात विजय यादवने कांस्य पदक जिंकलं.
या दोन पदकांसह भारताच्या खात्यात आता एकूण आठ पदकं झाली आहेत. भारतानं वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे.
अचिंत शेउलीचं सुवर्णपदक
दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये अचिंत शेऊलीनं भारतासाठी तिसरं सुवर्णपदक जिंकलं.

फोटो स्रोत, Getty Images
अचिंत शेउली यांनी रविवारी (31 जुलै) पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये 73 किलो वर्गात सुवर्णपदक पटकावलं अचिंतने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचललं, तर क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो वजन उचलण्यात यश मिळवलं. त्याने एकूण मिळून 313 किलो वजन उचललं.
अचिंत पाठोपाठ मलेशियाच्या हिदायत मोहम्मद 303 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं. कॅनडाच्या शाद दारसिग्नीने 298 किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली.
पदक जिंकल्यानंतर अचिंतने म्हटलं की, मी खूप खूश आहे. अनेक अडचणींवर मात करत मी हे पदक जिंकलं आहे. हे पदक मी माझा भाऊ आणि प्रशिक्षकांना समर्पित करतो.
अचिंत शेउलीच्या विजयानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण सहा पदकं जमा झाली आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे.
जेरेमी लालरिनुंगांचं सुवर्णपदक
कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुंगा याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

फोटो स्रोत, ANI
शनिवारी (30 जुलै) मीराबाई चानूने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
शेवटच्या फेरीत जेरेमीने एकूण 300 किलो वजन उचलले. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे पाचवे पदक ठरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वैयपावाने 293 किलो वजन उचलले. नायजेरियाच्या एडिडिओंग ओमोफियाने 290 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.
भारताच्या बिंदियाराणी देवी हिनं बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील महिलांच्या 55 किलो वजनी गटात 202 किलोचं वजन उचलून बिंदियाराणी देवीनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.

फोटो स्रोत, Getty Images
बिंदियाराणीने स्नॅचमध्ये 86 किलो वजन उचललं होतं, तर क्लीन अँड जर्कमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम नोंदवत 116 किलोचं वजन उचललं.
या फेरीत नायजेरियाच्या अधिजत ओलारिनोयने बिंदियाराणीपेक्षा केवळ एक किलो जास्त वजन उचललं आणि सुवर्ण पदकाची कमाई केली.
बिंदियाराणी देवी मणिपूरमधील शेतकरी कुटुंबातील आहे. पदक जिंकल्यानंतर बिंदियाराणी म्हणाली, "मी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होते. रौप्य पदकासोबतच विक्रम नोंदवल्यानं मी खूप आनंदी आहे."
"मी 2008 पासून 2012 पर्यंत ताइक्वांडो खेळत होती. मात्र, उंचीच्या समस्येमुळे वेटलिफ्टिंगकडे वळली. लोकांनी सांगितलं की, माझी उंची वेटलिफ्टिंगसाठी चांगली आहे," असंही बिंदियाराणी म्हणाली.
आतापर्यंत भारताला 6 पदकं
भारतानं 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत सहा पदकं खात्यात जमा केली आहेत.
पहिलं पदक महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरकरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात मिळवलं. संकेतनं 248 किलोचं वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली.

फोटो स्रोत, NISITH PRAMANIK
त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्येच गुरुराज पुजारीने 61 किलो वजनी गटात 269 किलोंचं वजन उचलून कांस्य पदकाची कमाई केली.
मीराबाई चानूनं मिळवलं पहिलं सुवर्ण पदक
भारताची प्रसिद्ध वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं एकूण 201 किलो वजन उचलून महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

फोटो स्रोत, CLIVE BRUNSKILL
यावेळी चानू सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळताना दिसली. ती क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलताना दिसली. या प्रकारात तिने विक्रम केला आहे.
तिने पहिल्याच प्रयत्नात 84 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)