पुत्रजयाः मलेशियाची नवी राजधानी पुत्रजयाचं नाव कशावरुन पडलं? पाहा 9 फोटो-

पुत्राजया

फोटो स्रोत, Lina Moiseienko/Alamy

फोटो कॅप्शन, पुत्रजयामध्ये पशू-पक्ष्यांच्या 200 प्रजाती आहेत.

पुत्रजया हे शहर मलेशियाची राजधानी क्वालालंपूरजवळ आहे. मलेशियाचे नेते महाथिर मोहम्मद यांच्या कल्पनेतून या शहराची निर्मिती झाली आहे.

1) सुंदर शहर-

मलेशियाचे एक प्रभावशाली नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. मलेशियाला स्वातंत्र्य मिळून 64 वर्षे झाली आहेत. त्यातील 24 वर्षे महाथिर पंतप्रधानपदी राहिलेत. अर्थात त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त म्हणूनही ओळखला जातो. त्यांच्या आक्रमक विकास योजनांमुळे मलेशियाला 90च्या दशकात आशियात सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था म्हणून प्रगती करता आली.

मलेशिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाथिर मोहम्मद

2) पुत्र+जया-

या शहराचं नाव मलेशियाचे पहिले पंतप्रधान टुंकू अब्दुल रहमान पुत्र अल-हाज यांच्या नावावरुन घेण्यात आलं आहे. यातील पुत्र म्हणजे मुलगा आणि जया म्हणजे विजयी अशा संस्कृत शब्दांचा अर्थ आहे. विजयी माणसांचं शहर म्हणून पुत्रजया असा त्या नावामागे विचार आहे.

पुत्राजया

फोटो स्रोत, Ronan O Connell

फोटो कॅप्शन, पुत्राजयाला महाथिर मोहम्मद यांच्या कार्यकाळात वसवण्यात आलं होतं.

3. दुसरी राजधानी-

पुत्रजयाला महाथिर मोहम्मद यांच्या सर्वांत साहसी योजनांपैकी एक मानलं जातं. या शहराला मलेशियाची दुसरी राजधानीही म्हटलं जातं.

मलेशियाची नवी राजधानी पुत्रजयाचं नाव कशावरुन पडलं? पाहा फोटो-

फोटो स्रोत, Getty Images

4. रबराची झाडं तोडून वसवलं शहर-

1990 पासून पुत्रजया हे मलेशिया सरकारचं नवं प्रशासकीय केंद्र झालं. क्वालालंपूर विमानतळापासून 25 किमी दूर दक्षिणेस रबराच्या झाडांचं जंगल कापून हे शहर वसवलं गेलं.

पुत्राजया

फोटो स्रोत, Lina Moiseienko/Alamy

फोटो कॅप्शन, पुत्रजयामध्ये पशू-पक्ष्यांच्या 200 प्रजाती आहेत.

5) प्रशासकीय केंद्र-

आज मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असली तरी पुत्रजया हे प्रशासतीय आणि आणि न्यायिक केंद्र पुत्रजया आहे. इथं अनेक सरकारी कार्यालयं आहेत. लाखो पर्यटक या शहराला भेट देतात.

मलेशियाची नवी राजधानी पुत्रजयाचं नाव कशावरुन पडलं? पाहा फोटो-

फोटो स्रोत, Getty Images

6) उत्तम इमारती-

पुत्रजयाचा केंद्रभाग इस्लामी वास्तुकलेनुसार बनवला आहे. आयर्न मॉस्क आणि काचेचा वाप करुन तयार केलेल्या वास्तू लक्ष वेधून घेतात.

आयर्न मॉस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयर्न मॉस्क

7) मनोरंजन केंद्र-

पुत्रजयामध्ये जगातील एकमेव गुलाबी पतरा मशीदीसह आशियातील सर्वात स्वच्छ शॉपिंग सेंटरही आहे. या शहरात मनोरंजनासाठी 37 टक्के हिस्सा राखून ठेवण्यात आला आहे.

पुत्राजया

फोटो स्रोत, szefei/Getty Images

फोटो कॅप्शन, पुत्रजयामध्ये फुलं-फळं उगवण्यासाठी भरपूर जागा आहे.

8) पुत्रजयाची लोकसंख्या-

सुरुवातीला हे शहर 3.5 लाख रहिवासी आणि 5 लाख पर्यटकांसाठी बनवण्यात आलं होतं. मात्र क्वालालंपूरच्या तुलनेत या शहराची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा मंद गतीने वाढत आहे. या शहराची आजची लोकसंख्या 1.2 लाख आहे.

मलेशियाची नवी राजधानी पुत्रजयाचं नाव कशावरुन पडलं? पाहा फोटो-

फोटो स्रोत, Getty Images

9) तलावात शहराचं केंद्र-

पुत्रजया शहराचं केंद्र पुत्रजया तलावामध्ये आहे. त्याला 38 किमीची वॉटरफ्रंट आहे. त्यात बागा, जॉगिंग ट्रॅक्स आणि सायकल ट्रॅक्स आहेत.

मलेशियाची नवी राजधानी पुत्रजयाचं नाव कशावरुन पडलं? पाहा फोटो-

फोटो स्रोत, Getty Images

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)