युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा आजवरचा प्रवास फक्त 10 फोटोंमध्ये

वोलोदिमीर झेलेन्स्की

फोटो स्रोत, FACEBOOK/Володимир Зеленський

1. विनोदी अभिनेता म्हणून करियरला सुरुवात

वोलोदिमीर झेलेन्स्की हे सर्वप्रथम टीव्ही सीरिजमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून झळकले. त्यावेळी त्यांनी एका प्रसिद्ध कॉमडी सिरीजमध्ये विनोदी अभिनेता म्हणून काम करताना ते पात्र साकारलं होतं.

वोलोदिमीर झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

2. नाट्यमय वळण

नंतर त्यांच्या आयुष्यानं नाट्यमय वळण घेतलं आणि एप्रिल 2019 मध्ये ते प्रत्यक्षात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. सध्या रशियाचा हल्ला झेलत अलेल्या जवळपास साडे चार कोटी नागरिकांचं ते नेतृत्व करत आहेत.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, FACEBOOK/Володимир Зеленський

3. सर्व्हंट ऑफ द पीपल

'सर्व्हंट ऑफ द पीपल' या सिरीजमध्ये त्यांनी एका विनम्र इतिहास शिक्षकाची भूमिका बजावली होती. पण भ्रष्टाचाराच्या विरोधातील त्यांचा शिव्या असलेला एक व्हीडिओ व्हायरल होतो आणि ते थेट राष्ट्राध्यक्ष बनतात, असं त्यात दाखवण्यात आलं होतं. ही एक काल्पनिक कथा होती. युक्रेनच्या नागरिकांना राजकारणापासून झालेला भ्रमनिरास यातून दर्शवण्यात आला होता.

वोलोदिमीर यांनी प्रचारात राजकारणातली घाण स्वच्छ करण्याचं आणि पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं होतं. 'सर्व्हंट ऑफ द पीपल' हेच नाव त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलं.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

4. आई-बाबा

क्रिवी रिह या मध्य भागातील शहरामध्ये ज्यू आई वडिलांच्या पोटी वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा जन्म झाला. कीव्ह नॅशनल युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेत त्यांनी पदवी मिळवली. पण त्यानंतर ते कॉमेडी क्षेत्राकडे आकर्षित झाले.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, FACEBOOK/Володимир Зеленський

5. कॉमेडी-अभिनय

तरुण असताना ते नियमितपणे रशियन टीव्हीवरील कॉमेडी शोमध्ये सहभागी होत होते. 2003 मध्ये त्यांनी त्याच्या कॉमेडी टीमच्या नावाने म्हणजे क्वार्टल 95 नावाने टीव्ही प्रोडक्शन कंपनीची सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही मिळालं.

2010 च्या मध्यापर्यंत टीव्ही शो आणि लव्ह इन द बिग सिटी (2009) तसंच रेझेव्हस्की व्हर्सेस नेपोलियन (2012) अशा चित्रपटांद्वारे कारकिर्दीवरच त्यांचं मुख्य लक्ष केंद्रीत होतं.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, FACEBOOK/Bruce Alan Greene

6. राष्ट्राध्यक्षपद

युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी 20 मे 2019 रोजी शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा पराभव केला. पोरोशेन्को यांनी झेलेन्सकी नवखे असल्याची टीका केली होती. तर मतदारांना तेच त्याचं वैशिष्ट्य वाटलं. त्यांना एकतर्फी 73.2% टक्के मतांनी विजय मिळाला.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

7. वाद संपवण्याचा प्रयत्न

पूर्व युक्रेनमधला वाद संपुष्टात आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आतापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त जणांचा जीव घेणारा हा वाद सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

8. नेटो

सुरुवातीला त्यांनी तडजोडीचा प्रयत्न केला. रशियाबरोबर चर्चा करण्यात आली, कैद्यांची देवाण-घेवाण आणि काही भागांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं प्रयत्न झाले. मिन्स्क करार म्हणून ते सर्वांना माहिती आहे. पण त्याचं कधीही पालन करण्यात आलं नाही.

झेलेन्स्की यांनी युरोपीयन संघात आणि नाटोच्या लष्करी आघाडीत समावेशासाठी जोर लावला. त्यामुळं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन नाराज झाले.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, FACEBOOK/Володимир Зеленський

9. एकता दिवसाला सुरुवात

पाश्चिमात्य देशांकडून वारंवार रशियाच्या हल्ल्याचे इशारे मिळत असताना त्यांनी अत्यंत संयम बाळगला. गेल्या आठ वर्षांपासून युद्धाचंच वातावरण अनुभवलं असून त्यात काही नवं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

16 फेब्रुवारीला राष्ट्रीय एकता दिवस जाहीर करत त्यांनी युक्रेनच्या नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, FACEBOOK/Володимир Зеленський

10. पँडोरा पेपर्समध्ये नाव

ऑक्टोबर 2021 मध्ये पँडोरा पेपर्समध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. जगातील बड्या आणि शक्तीशाली लोकांच्या बेहिशेबी संपत्तीची माहिती त्यात उघड करण्यात आली होती.

झेलेन्स्की आणि त्यांचे निकटवर्तीय हे काही बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून लाभार्थी असल्याची माहिती याद्वारे समोर आली होती.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे हे दुर्मिळ 10 फोटो पाहिलेत का?

फोटो स्रोत, Getty Images

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)