रशिया-युक्रेनः व्लादिमीर पुतीन यांनी ताजमहाल पाहिला तेव्हा... पाहा 10 दुर्मिळ फोटो

व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन

1. जपानमध्ये ज्युडो खेळताना

5 सप्टेंबर 2000 रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टोक्योला भेट दिली तेव्हा त्यांनी नात्सुमी गोमी नावाच्या 10 वर्षे वयाच्या मुलीविरोधात ज्युडो कुस्ती खेळली.

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टोक्यो भेटीत ज्युडोचा प्रयोग

2. रशियाचे शहाजहान

4 ऑक्टोबर 2000 रोजी व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवर आले होते. त्यावेळी पुतीन यांनी त्यांची पत्नी ल्युडमिलासह आग्र्याच्या ताजमहालाला भेट दिली.

रशियाचे शहाजहान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कैसा लगा ताज? मैडम...

3. पुतीनरहस्य भारतीयांना सांगताना

2000 साली भारतात व्लादिमीर पुतीन यांनी भाषण केलं होतं. पुढच्या 20 वर्षांमध्ये जगात काय घडामोडी होणार आहेत याचा अंदाज त्यावेळेस कोणाला आला असेल काय?

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत भेट 2000

4. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

अमेरिकेला झुंजवण्यात अख्खी हयात घालवलेल्या, शीतयुद्धात 'महत्त्वाची' भूमिका बजावणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी पुतीन यांना कोणता बरा गुरुमंत्र दिला असेल?

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतीन यांची क्युबा भेट 14 डिसेंबर 2000

5. आता क्रेमलिनची चिंता तुम्ही करू नका...

बोरिस येल्तसिन यांच्याकडून व्लादिमीर पुतीन यांनी रशियाची सूत्रं स्वीकारली.1953 साली निधन झालेले सोव्हिएत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर रशियाचं राष्ट्राध्यक्षपद सर्वाधिक काळ सांभाळणारे नेते पुतीन आहेत.

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मे 2000

6. नृत्य

सेंट पिटर्सबर्ग येथे शिकत असताना वर्गमैत्रिण एलेनाबरोबर नृत्य करणारे व्लादिमीर पुतीन

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1970

7. 10 डाऊनिंगवर...

2000 साली पुतीन यांनी इंग्लंडचे तेव्हाचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे जाऊन भेट घेतली होती.

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 17 एप्रिल 2000

8. किचन नाइटमेअर

मी माझी सिक्रेट रेसिपी कोणालाच सांगत नाही, असं तर पुतीन म्हणत नसावेत ना?

प्रसिद्ध शेफ गॉर्डन रॅम्से यांनी पुतीन यांच्या इंग्लंड भेटीतील मेजवानीचे जेवण तयार केले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध शेफ गॉर्डन रॅम्से यांनी पुतीन यांच्या इंग्लंड भेटीतील मेजवानीचे जेवण तयार केले होते.

9. महासत्तांचे प्रमुख

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्लादिमीर पुतीन यांचे मॉस्को भेटीतले छायाचित्र

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जून 2000

10. 'शेजार'धर्म

व्लादिमीर पुतीन यांचे कोरियातील भेटीचे छायाचित्र. त्यांच्याबरोबर किम जोंग इल (दु) दिसत आहेत.

पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 20 जुलै 2000, प्योंगयांग
ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)