इलॉन मस्क यांचा चंद्रावर शहर वसवण्याचा प्लॅन; पण खरंच हे शक्य आहे का?

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 5 मिनिटे

इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच आपली एक योजना सार्वजनिकरित्या जाहीर केली. ते येत्या 10 वर्षांत थेट चंद्रावर 'सेल्फ ग्रोइंग सिटी' (एक स्वयंपूर्ण शहर) वसवणार आहेत.

एक्स, टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत या योजनेबद्दल माहिती दिली. ही पोस्ट चार कोटींहून अधिक वेळा पाहिली गेली.

त्यांनी सांगितलं की, स्पेसएक्सने मंगळावर शहर वसवण्याऐवजी चंद्रावर शहर वसवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

मस्क यांनी आपला विचार का बदलला? चंद्रावरच्या या 'सेल्फ ग्रोइंग सिटी' बद्दल आपल्याला नेमकी कोणती माहिती मिळत आहे?

मंगळाऐवजी चंद्र का?

या शहराबद्दल कोणतीही ब्लू प्रिंट्स तसंच कोणतीही विस्तृत योजना सादर करण्यात आली नाहीये.

सध्या तरी ही केवळ मस्कची एक कल्पना आहे, जी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.

त्यांना चंद्रावर एक कायमस्वरुपी वसाहत स्थापन करायची आहे, जी तिथेच उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हळूहळू स्वतःचा विस्तार करू शकते.

आपल्या पोस्टमध्ये मस्कने लिहिलं की, ही कल्पना 10 वर्षांपेक्षा कमी काळात प्रत्यक्षात येऊ शकते. दुसरीकडे मंगळावर यासाठी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ लागू शकतो.

मस्क सांगतात की, मंगळावर जाणं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सूर्यमालेतले सर्व ग्रह सरळ रेषेत येतात. हे 26 महिन्यातून एकदाच होतं आणि या मंगळ प्रवासाला सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो.

दुसरीकडे चंद्रावर आपण दर दहा दिवसांनी एक लाँच करू शकतो आणि ही ट्रिप दोन दिवसांची असू शकते, असं मस्क यांचं म्हणणं आहे.

"आपण मंगळावरच्या शहराच्या तुलनेत चंद्रावरच्या शहराचं काम अधिक वेगाने पूर्ण करू शकतो."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्पेसएक्सचं मिशन मार्स किंवा मंगळ मोहीम बऱ्याच काळापासून सुरू आहे. यात मंगळावर शहर उभं करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

त्यांनी म्हटलं होतं की, "गेल्या पाच-सात वर्षांत याची सुरूवात करू शकतो. पण सगळ्यांत महत्त्वाची प्राथमिकता ही आपल्या संस्कृतीचं भवितव्य सुरक्षित करणं आहे आणि चंद्रावर ते तसं राहण्याची शक्यता अधिक आहे."

मस्क यांचे फॅन्स आणि फॉलोअर्स चंद्रावरच्या या शहराचे स्केच बनवून, हे शहर कसं दिसू शकतं हे शेअर करत आहेत. काही जणांनी यासाठी मस्क यांच्याच एआय टूल ग्रोकचा वापर केला.

मस्क यांची विधानं या महिन्याच्या सुरूवातीला वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताशी मिळतीजुळती आहेत. या वृत्तामध्ये म्हटल्याप्रमाणे स्पेसएक्सने गुंतवणूकदारांना सांगितलं की, ते चंद्रावरील मोहिमेला प्राधान्य देतील आणि नंतर मंगळावर जाण्याचा प्रयत्न करतील.

बऱ्याच काळापासून मस्क स्पेसएक्सकडून मंगळावर यात्रा नेण्याचा विचार करत होते, पण आता त्यांच्या धोरणात बदल झालेला दिसतोय. अगदी गेल्या वर्षापर्यंत ते सांगत होते की, कंपनी 2026 संपेपर्यंत ते एक मानवरहित मंगल मिशन लाँच करण्याची योजना आखत आहेत.

मस्कने गेल्या वर्षी जानेवारीत एक्सवरच्या एका पोस्टला उत्तर देताना म्हटलं की, "नाही. आपण थेट मंगळावर जाणार आहोत. चंद्र लक्ष भरकटवणारा आहे."

इलेक्ट्रिक वाहनं आणि सेल्फ ड्राइव्हिंग तंत्रासारख्या प्रकल्पांसाठी महत्त्वाकांक्षी कालमर्यादा निश्चित करण्याचा मस्क यांचा इतिहास आहे. आणि यातले अनेक प्रकल्प वेळेवर पूर्ण झाले नाहीयेत.

हे कसं केलं जाऊ शकतं?

यूकेमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ सरे इथे स्पेस ॲप्लिकेशन्स, एक्सप्लोरेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन या विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुंगवू लिम स्पेसएक्सच्या चंद्रावर वसाहत बनवण्याची योजना ही सायन्स फिक्शन नसून महत्त्वाकांक्षी असल्याचं म्हणतात.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "मूळ कल्पना अशा औद्योगिक प्रक्रियांवर आधारित आहे ज्या आपण पृथ्वीवर आधीपासून वापरतो. उदाहरणार्थ- चंद्रावरच्या मातीचा वापर करून ऑक्सिजन, पाणी आणि बांधकाम साहित्य तयार करणे. सैद्धांतिकदृष्ट्या हे शक्य आहे."

मात्र, या सगळ्या व्यवस्था चंद्रावरच्या कठोर वातावरणात विश्वासार्हपणे काम करू शकतील का याबद्दल डॉ. लिम प्रश्न उपस्थित करतात. कारण तिथे अतितापमान, बारीक धूळ आणि कमी गुरुत्वाकर्षण आहे.

ते म्हणतात, "आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांची योग्य चाचणी करावी लागेल."

ते पुढे सांगतात की, सरकारी अवकाश संस्था सार्वजनिक निधीवर अवलंबून असल्यामुळे सावधपणे पुढे जातात, पण स्पेसएक्स वेगळ्या पद्धतीने काम करते.

"त्यांच्या नवीन रॉकेट सिस्टीमने नियोजनाप्रमाणे काम केले तर चंद्रावर उपकरणे अधिक वेळा आणि कमी खर्चात पाठवता येतील."

चंद्र

फोटो स्रोत, Getty Images

भारतातल्या जीडी गोएंका युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर एअरोस्पेस अँड एनर्जी स्टडीजचे संचालक डॉ. उगुर गुवेन सांगतात की, सुरुवातीच्या मानवी वसाहतींसाठी चंद्राची मोहिम मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त ठरू शकते- विशेषतः जलद पुरवठा आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "काही बिघाड झाला तर तिथे निवासस्थान असेल, जिथून फॉलो अप मिशन पाठवता येऊ शकते."

ते म्हणतात, पृथ्वीवरून हा प्रवास साधारण दोन ते तीन दिवसांचा असतो.

तरीही डॉ. लिम इशारा देतात की, 'चंद्रावरील स्वयंपूर्ण शहर' हा अजून बराच लांबचा टप्पा आहे.

"पृथ्वीवरून पोषकतत्त्वे न आणता अन्न उगवणं, एक अशी बंदिस्त व्यवस्था जिथे सगळ्या गोष्टींचा पुनर्वापर होईल तयार करणं हे अतिशय गुंतागुंतीचं आहे. यासाठी कदाचित दशकं लागतील. हे सर्व टप्प्याटप्प्यानेच होईल, एकदम नाही."

अमेरिकेतल्या इंडियानामधील युनिव्हर्सिटी ऑफ नोत्रदाम इथे सिव्हिल व एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग आणि अर्थ सायन्सेसचे प्राध्यापक क्लाइव्ह नील हे डॉ. लिम यांच्या मताशी सहमत आहेत.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "जोपर्यंत आपण चंद्रावर वापरता येण्यासारखे संसाधनं प्रत्यक्षात आहेत हे दाखवण्यासाठी मोठे रिसोर्स-प्रॉस्पेक्टिंग मोहीम राबवत नाही, तोपर्यंत या 'सेल्फ ग्रोइंग सिटी'चे काय होईल हे आपल्याला माहीत नाही."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

डॉ. लिम यांच्या मते पुढील 10 वर्षांत 'चंद्रावरील एक लहान चौकी' स्वतःचा काही ऑक्सिजन तयार करू लागेल आणि कदाचित पाणीही काढेल — हे शक्य आहे.

MIT मधील एअरोनॉटिक्स व ॲस्ट्रोनॉटिक्सचे प्राध्यापक आणि माजी NASA अंतराळवीर जेफ्री हॉफमन म्हणतात, "जर स्पेसएक्स आणि ब्लू ओरिजिन यांनी लुनार लँडर्स विकसित केले, तर आपण आता चंद्रावरील वसाहतीसाठी पुरवठा व्यवस्थापन नीट शकतो."

त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, पण मंगळ अजूनही दूर आहे.

मात्र प्राध्यापक हॉफमन म्हणतात की, चंद्रावर कायमस्वरूपी वसाहत उभारण्याचा अनुभव मंगळावर वसाहत निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल.

डॉ. गुवेनही याच्याशी सहमत आहेत.

त्यांच्या मते, एकदा चंद्रावर वसाहत उभी राहिली की मंगळापर्यंत पोहोचणे खूप सोपं होतं. कारण चंद्र हा सुरुवातीचा प्रेरणादायी टप्पा ठरू शकतो.

वाढती स्पर्धा

इलॉन मस्क यांची वक्तव्यं अशावेळी आली आहेत, जेव्हा अमेरिकेला गेल्या काही वर्षांत चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी चीनकडून वाढत्या स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे.

नासाच्या अपोलो 17 मोहिमेनंतर 1972 पासून कोणीही चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवलेले नाही.

मस्क यांनी अलीकडे जाहीर केले होते की, स्पेसएक्सने एक्सएआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे, ज्याचं नेतृत्व ते स्वतः करतात.

या करारात रॉकेट आणि उपग्रह कंपनीचे मूल्यांकन 1 ट्रिलियन डॉलर, तर एआय फर्मचे मूल्यांकन 250 अब्ज डॉलर असे करण्यात आले.

न्यूयॉर्कमधील बीबीसीच्या प्रतिनिधी मिशेल फ्लरी सांगतात की, ही घोषणा अंतराळातील डेटा सेंटर्सचा वापर एआय कम्प्युटिंग हाताळण्यासाठी करण्याच्या मस्क यांच्या महत्त्वाकांक्षेला बळ देऊ शकते.

त्या सांगतात की, स्पेस एक्समधील सर्वात मोठे भागधारक असलेले मस्क स्टॉक मार्केट लिस्टिंगच्या आधी आपले व्यवसाय सुव्यवस्थित करत आहेत. कारण स्पेसएक्स कंपनी सार्वजनिक करण्याचा त्यांचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे.

मागील महिन्यात मस्क यांनी अंतराळात दहा लाख डेटा सेंटर्स उभारण्याची योजना जाहीर केली होती. वाढत्या एआय वापरामुळे पृथ्वीवरील सुविधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची अपेक्षा आहे.

मात्र, काही तज्ज्ञ त्यावर शंका व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं आहे की, अंतराळातील निर्वात वातावरणात हवा नसल्यामुळे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स थंड ठेवणे मोठे आव्हान ठरेल आणि हे एआय तसंच डेटा-आधारित कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)