जेसिंडा ऑर्डन: कोव्हिड नियमांमुळे या पंतप्रधानांनी रद्द केलं स्वतःचं लग्न

जेसिंडा आर्डेन, न्यूझीलंड, कोव्हिड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेसिंडा आर्डेन

कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. याचं भान राखत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी स्वत:चं लग्न रद्द केलं आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. पंतप्रधानपदी असतानाही जेसिंडा आर्डेन यांनी नियमातून पळवाट न शोधता लग्न लांबणीवर टाकलं आहे. जेसिंडा टेलिव्हिजन अँकर क्लार्क गेफोर्ड यांच्याशी लग्न करणार आहेत. गेफॉर्ड हे त्यांचे लिव्ह इन पार्टनर आहेत. या युगुलाला एक बाळ देखील आहे.

जाहीर कार्यक्रमात लशीचे दोन्ही डोस घेतलेले 100 माणसंच असू शकतील. दुकानं तसंच सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्क परिधान करणं अनिवार्य असेल.

न्यूझीलंडमध्ये 15,104 कोरोना रुग्ण आढळले असून, 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

"मी न्यूझीलंडच्या सर्वसामान्य नागरिकांपासून वेगळी नाही. कोरोना संकटाने न्यूझीलंडसह संपूर्ण जगावर भीषण परिणाम झाला आहे. त्यातील सर्वांत अधिक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी आपल्या स्वतःला न हजर राहता येणं, " असं जेसिंडा यांनी म्हटलं आहे.

जेसिंडा आर्डन

फोटो स्रोत, Getty Images

रविवारी कोव्हिड संदर्भात नवे नियम लागू झाले. देशात ओमिक्रॉनच्या 9 केसेस आढळल्यानंतर न्यूझीलंडने धोरणात बदल केला आहे.

ऑकलंडमध्ये लग्नाला उपस्थित राहून एक कुटुंब साऊथ आयलंडला परतलं. हे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रवासादरम्यान त्यांना सेवा देणारी फ्लाईट अटेंडटही पॉझिटिव्ह आहे. या कुटुंबापासून संसर्गाची बाधा होण्याचं प्रमाण अधिक आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इन्डोअर स्वरूपाच्या कार्यक्रमांना लशीचे दोन्ही डोस घेतलेली शंभर माणसंच उपस्थित राहू शकतात. जिम आणि वेडिंग या ठिकाणी 25 व्यक्तीच एकावेळी हजर राहू शकतात.

विद्यार्थ्यांनाही मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

जेसिंडा ऑर्डन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन

कोरोना संकट सुरू झाल्यापासून न्यूझीलंडने नेहमीच कठोर नियमावली लागू केली आहे. यामुळेच कोरोनामुळे या देशात मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी आहे.

देशाच्या सीमा बंद करून कठोर लॉकडाऊन लावणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो.

डेल्टा व्हेरियंट समोर आल्यापासून जेसिंडा यांनी कोव्हिड निर्मूलन धोरणाऐवजी जास्तीतजास्त लसीकरण आणि व्हायरसला एन्डेमिक म्हणून पाहण्याचं धोरण स्वीकारलं आहे.

जेसिंडा अर्डन

फोटो स्रोत, Getty Images

न्यूझीलंडध्ये 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांपैकी 94 % टक्के जनतेचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 56 टक्के जनतेला बूस्टर डोसही मिळाला आहे.

गेल्यावर्षी सीमा खुल्या करण्याचा विचार न्यूझीलंडने व्यक्त केला होता. 30 एप्रिलपासून परदेशी पर्यटकांनाही प्रवेश देण्याचं धोरण न्यूझीलंडने अंगीकारलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)