जेसिंडा ऑर्डर्न : पंतप्रधान, मग आई आणि आता साखरपुडा

आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणामुळे कायम चर्तेत असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यांचे लिव्ह इन पार्टनर क्लार्फ गेफार्ड यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा झाल्याच्या बातमीला पंतप्रधान कार्यालयाने दुजोरा दिला आहे.
ऑर्डर्न शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या डाव्या हातात हिऱ्याची अंगठी घालून दिसल्या तेव्हा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली.
आपल्या साखरपुड्याची बातमी त्यांनी स्वतःहून दिली नाही. आपली हिऱ्याची अंगठी घालून त्या एका कार्यक्रमात गेल्या. त्यावेळी एका पत्रकाराच्या दृष्टीस त्यांची अंगठी पडली. त्याने पंतप्रधान कार्यालयाला याबाबत विचारणा केली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला.
त्यांच्या साखरपुड्याची बातमी प्रसारमाध्यमात आल्यावर जेसिंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रेडिओ न्यूझीलंडशी बोलताना म्हणाल्या, "मी अतिशय नशीबवान आहे. माझी साथ देणारा जोडीदार मला मिळाला आहे."
क्लार्क गेफोर्ड हे टीव्ही अँकर आहेत. दोघं बऱ्याच काळापासून प्रेमात आहे. लग्न न करता ते बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. बेनझीर भुट्टोनंतर पंतप्रधान असताना आई झालेल्या जेसिंडा या दुसऱ्या महिला आहेत. जेसिंडा यांच्या मुलीचं नाव 'नेव्हे ते अरोहा' असं आहे.
बीबीसीच्या निवेदक व्हिक्टोरिया डर्बीशायर यांनी जानेवारीत जेसिंडा यांना विचारलं होतं की, 'तुम्ही क्लार्क यांना लग्नासाठी प्रपोज करणार की नाही?'
तेव्हा त्या म्हणाल्या "नाही. मी त्यांना प्रपोज करणार नाही. लग्नासाठी विचारणं आणि लग्न करणं हा त्याचा प्रश्न आहे."
आई झाल्यावर चर्चेत
जेसिंडा यांनी पंतप्रधानपद असताना मुलीला जन्म दिला आणि संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत चार महिन्याच्या मुलीला घेऊन सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांना अनेकांनी नको ते सल्ले दिले होते.
त्यावर त्या सांगतात, "मला अनेकांनी न मागता बरेच सल्ले दिले आहेत. त्यांचं काय करायचं माहिती नाही. मात्र मी सल्ला देणाऱ्यांचे आभार मानते."
जेसिंडा यांनी सर्व नोकरी करणाऱ्या महिलांना संदेश दिला की नोकरी किंवा काम करताना मातृत्वाची जबाबदारी पार पाडता येते.

फोटो स्रोत, Getty Images
जुलै 2017 मध्ये जेसिंडा यांचा विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. तेव्हा त्या एका टीव्ही शोमध्ये गेल्या असता त्या शोच्या निवेदकाने त्यांना विचारलं "करिअर आणि मूल यांपैकी पहिली निवड कुणाची कराल?"
त्यावर त्या म्हणाल्या "मूल कधी हवंय हा निर्णय त्या स्त्रीने घ्यायचा असतो. नोकरी करत असू तर गरोदर होणं शक्य नाही असा विचार करू नये."
उदारपणाने ठसा उमटवला
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये नुकताच दोन मशिदीमध्ये स्फोट झाले होते. त्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती त्यांनी योग्यरीत्या हाताळली होती. त्यांच्या संयमशील नेतृत्वाचं जगभरातून कौतुक झालं.
त्या स्वत: पीडितांच्या घरी गेल्या आणि त्यांना जवळ घेत न्यूझीलंड तुमचं घर आहे अशा शब्दांत दिलासा दिला.

फोटो स्रोत, Getty Images
"आपला देश विविधता, करुणा, दया या मूल्याचं प्रतिनिधित्व करतो. जे लोक या मूल्यांची कदर करतात हा देश त्यांचा आहे," असे उद्गार त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयासमोर काढले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








