James Webb अवकाशात रवाना

जेम्स वेब, दुर्बीण, अंतराळ, अवकाश

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, महाकाय आकाराची दुर्बीण अवकाशात झेपावली आहे.

आतापर्यंतची सगळी मोठी दुर्बीण जेम्स वेब ही महाकाय दुर्बीण दक्षिण अमेरिकेतल्या फ्रेंच गयानातील कौरु इथून अवकाशात झेपावली आहे. 10 अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्च करून ही दुर्बीण अवकाशात पाठवण्यात आली आहे.

युरोपीय स्पेस एजन्सीच्या एरियन5 या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या साह्याने ही दुर्बीण अवकाशात झेपावली.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.50च्या सुमारास ही दुर्बीण अवकाशाच्या दिशेने रवाना झाली.

22 डिसेंबर रोजी दुर्बीणीचं प्रयाण आयोजित करण्यात आलं होतं. मात्र खराब हवामानामुळे प्रयाण लांबणीवर गेलं.

21व्या शतकातील महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असं या दुर्बीणीच्या उपक्रमाचं वर्णन केलं जातं. विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडून दाखवण्याची क्षमता या दुर्बीणीत आहे.

नासा, युरोपीय स्पेस एजन्सी, कॅनडा यांच्या संयुक्त सहकार्यातून ही महाकाय दुर्बीण तयार झाली आहे. या दुर्बीणीच्या उभारणीसाठी 30 वर्ष लागली आहेत. तब्बल 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या दुर्बिणीसाठी करण्यात आली होती.

अंतराळातील चमकणारे तारे आणि आकाशगंगेचे दर्जेदार फोटो टिपणं हे या दुर्बीणीचं प्रमुख काम असेल. सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातुने तयार केलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे.

कुठल्या ग्रहांवर वस्ती आहे याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने ही दुर्बीण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमेरिकेच्या स्पेस एजन्सीचे प्रमुख बिल नेल्सन यांनी जेम्स वेब टेलिस्कोप प्रोजेक्ट हा अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे.

जेम्स वेब, दुर्बीण, अंतराळ, अवकाश

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, जेम्स वेब

"आपण व्यापक विचार करतो तेव्हा त्यासाठी तसं कामही केलं जातं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा मोहिमांमध्ये अपयश आणि धोका दोन्ही असतं. पण जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी उत्तुंग असतं तेव्हा धोका पत्करावा लागतो", असं त्यांनी सांगितलं.

जेम्स वेब दहा वर्ष कार्यरत असा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. पण प्रत्यक्षात ही त्याहून जास्त वर्ष काम करेल असंही म्हटलं जात आहे.

दुर्बीणीच्या कॅमेऱ्याचा आकार 21 फूट म्हणजे 6.5 मीटर आहे. त्याचं वजन 62 क्विंटल आहे. हा कॅमेरा उणे 230 वातावरणातही काम करू शकतो.

अवकाशात जाऊन दमदार प्रदर्शन करणाऱ्या हबल दुर्बीणीची जागा घेण्यासाठी जेम्स वेब तय्यार आहे. 1990 मध्ये हबल दुर्बीण पाठवण्यात आली होती. 31 वर्षांनंतरही ती कार्यरत आहे.

हबलच्या कॅमेऱ्याचा आकार 8 फूट म्हणजे 2.4 मीटर एवढाच होता. त्याचं वजन 122 क्विंटल आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)