नासा: मानवी हाडांच्या सापळ्याचं नाव नासाच्या मोहिमेला कसं मिळालं?

फोटो स्रोत, NASA
- Author, जोनाथन अमोस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
आपल्या सौरमंडळात जिवाश्मांचा शोध घेण्यासाठी नासाने एक नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला लुसी मिशन असं नाव देण्यात आलं असून याअंतर्गत एक यान गुरू ग्रहाकडे रवाना झालं आहे.
गुरू चहूबाजूंनी वायूंनी वेढलेला आहे. या ग्रहाच्या कक्षेत एका कळपाच्या स्वरुपात जात असलेल्या अॅस्टरॉईडच्या दोन गटांचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे. याला ट्रोझन अॅस्टरॉईड असंही संबोधलं जातं.
अमेरिकचे अंतराळ संस्था (नासा) येथील शास्त्रज्ञांच्या मते ग्रहाच्या निर्माणासादरम्यान या गोष्टी राहून गेल्या होत्या. त्यामुळे या ट्रोझनद्वारे सौरमंडळाच्या उत्पत्तीसंदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकते.
या अभ्यासामुळे आपल्या सौरमंडळातील ग्रहांच्या सध्याच्या स्थितीचं काय कारण आहे, याचीही माहिती मिळू शकते, असं नासाने म्हटलं आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी (17 ऑक्टोबर) पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी (ईस्टर्न टाईमझोननुसार पहाटे 5 वाजून 34 मिनिटे) फ्लोरिडातील केप-कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून अॅटलस-व्ही रॉकेटने लुसी मोहिमेसाठी उड्डाण घेतलं.
या मोहिमेवर पुढील 12 वर्षांत 981 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 7360 कोटी रुपये खर्च केले जातील. यादरम्यान लुसी मिशन ट्रोझनजवळ पोहोचून त्याचा अभ्यास करेल.
मोहिमेला लुसी नाव कसं पडलं?
नासाने या मोहिमेला लुसी नाव का दिलं? यामागे एक कारण आहे.
1974 मध्ये इथिओपियाच्या हदार या ठिकाणी मानवी हाडांचा सापळा सापडला होता.

फोटो स्रोत, JASON KUFFER CC
त्याच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा जगातील सर्वात प्राचीन सापळा असल्याचं सांगितलं होतं.
या सापळ्याला लुसी (ऑस्ट्रेलोपिथिकस अफरेन्सिस) हे नाव देण्यात आलं. याच्यामार्फतच होमो सेपियन प्रजातीची उत्पत्ती झाली, असं मानलं जातं.
गुरु ग्रहावरील ट्रोझनच्या अभ्यासासाठी नासाने या सापळ्याचंच नाव आपल्या मोहिमेचं निवडलं.
हे अंतराळ यान पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या, गुरुसोबत सूर्याची परिक्रमा करत असलेल्या जीवाश्मांच्या शोधात निघालं आहे.
कोलोरॅडोच्या बोल्डर येथील साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये लुसी मोहिमेचे प्रमुख संशोधक हॅल लेव्हिसन यांनी सांगितलं, "ट्रोझन अॅस्टरॉईड आपल्या कक्षेत 60 डिग्रींपर्यंत गुरु किंवा त्याच्यासोबत पुढे चालतात.

फोटो स्रोत, NASA
"ते गुरु आणि सुर्य यांच्यादरम्यानच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामुळे तिथंच वसलेले आहेत. सौरमंडळाच्या इतिहासात एखादी गोष्ट ज्याठिकाणी ठेवली गेली, अथवा निर्माण झाली, ती तिथलीच बनून गेली. वास्तविक पाहता या गोष्टी जीवाश्मच आहेत, त्यांच्यामार्फतच आपल्या ग्रहांची निर्मिती झाली."
लुसी अंतराळयानाला एका शहराच्या आकाराच्या पदार्थाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे.
हे यान पदार्थाचा आकार, संरचना, पृष्ठभागाची वैशिष्ट्ये आणि तापमान यांचा अहवाल तयार करेल.
गुरुचा चंद्र ज्या पदार्थांनी तयार झाला, त्याच पदार्थांचे ट्रोझन बनलेले असल्यास हे सूर्यापासून तितक्याच अंतरावर तयार होऊ शकतात, असं मानलं जाईल.
साऊथ वेस्ट रिसर्च इन्स्टीट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. कार्ली हार्वेट यांनी याविषयी अधिक माहिती दिली.
ते सांगतात, "उदाहरणार्थ, जर कुईपर बेल्ट(सौरमंडळाच्या बाह्य क्षेत्रात आढळणारे सर्कमस्टेलर डिस्क) या पदार्थांनी बनलेले असतील, ते तिथंच बनून आत खेचले गेले असतील की नाही, याविषयी आपल्याला माहिती मिळेल.)
सौरमंडळ कसं बनलं?
डॉ. कार्ली हार्वेट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "ही मोहीम आपल्या मॉडेल्सचं परीक्षणच आहे. जेव्हा सौरमंडळ निर्माण होत होतं, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर फेकल्या गेल्या, तर काही गोष्टी आत खेचल्या गेल्या, अशी आमची संकल्पना आहे.

फोटो स्रोत, NASA
शास्त्रज्ञांच्या मते, सौरमंडळ बनत असताना मोठ्या प्रमाणात धूळ आणि गॅसचे कण खेचले गेल्याने ते एकत्र आले. त्यामधूनच पुढे सूर्य, विविध ग्रह, उपग्रह आणि इतर छोट्या पिंडांची निर्मिती झाली. या प्रक्रियेत काही पदार्थ कच्च्या अवस्थेत राहिले, उदा. अॅस्टरॉईड.
हे अॅस्टरॉईड गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे सूर्यात समाविष्ट झाले. तर काही सौरमंडळाच्या बाह्य भागात जमा झाले. त्यालाच कुईपर बेल्ट असं संबोधलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
हे सगळे सूर्याचीच परिक्रमा करतात. कुईपर बेल्टमध्ये जमा झालेले अॅस्टरॉईड आणि त्या माध्यमातून सौरमंडळाची उत्पत्ती यांसदर्भात सातत्याने नवी माहिती समोर येत असते.
लुसी अंतराळयान ट्रोझनपर्यंत कधी पोहोचेल?
लुसी अंतराळयान ट्रोझनच्या तोंडाशी 2017-28 पर्यंत पोहोचेल. तर याच्या तळाशी पोहोचण्यास त्याला 2033 साल उजाडेल.
हा संपूर्ण प्रवास 6 अब्ज किलोमीटर इतका अवाढव्य आहे.
ट्रोझनचा अभ्यास करणं, हे लुसी मिशनचं प्रमुख उद्दिष्ट आहे. पण गुरु ग्रहापर्यंत पोचण्याच्या दरम्यान ते डोनाल्ड जॉनसन या अॅस्टरॉईडजवळही जाईल.
डोनाल्ड जॉनसन एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1974 मध्ये इथिओपियामध्ये एका प्राचीन जीवाश्माचा शोध लावला होता. त्यांच्या नावावरच या अॅस्टरॉईडचं नाव ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








