आपल्या आकाशगंगेच्या बाहेर सापडला नवीन ग्रह?

फोटो स्रोत, ESO / L. CALÇADA
- Author, पॉल रिंकन
- Role, सायन्स एडिटर, बीबीसी न्यूज वेबसाइट
आपल्या आकाशगंगेच्या बाहेर पहिला ग्रह आढळल्याचे संकेत खगोलतज्ज्ञांना मिळाले आहेत.
आपल्या सूर्याच्या भोवती फिरणारे जवळपास 5 हजार एक्झोप्लॅनेट्स आतापर्यंत आढळले आहेत. मात्र ते सर्व 'मिल्की वे' या आकाशगंगेमध्येच आढळले आहेत.
नासाच्या चांद्र एक्स-रे टेलिस्कोपने शोधलेला हा ग्रह 'मेसिएर 51' या आकाशगंगेमध्ये आहे. आपल्या आकाशगंगेपासून हे अंतर 28 दशलक्ष प्रकाशवर्षं दूर आहे.
हा नवीन शोधाचा निष्कर्ष पारवाहनाच्या प्रक्रियेवरून काढण्यात आला आहे. यामध्ये ताऱ्याच्या समोर येणारा ग्रहाचा भाग ताऱ्याचा प्रकाश अडवतो आणि चमकतो. हा भाग टेलिस्कोपमधून पाहता येतो.
हजारो एक्झोप्लॅनेट्स शोधण्यासाठी डॉ. रोझअॅन डी स्टिफानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक्स-रे ब्राइट बायनरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑब्जेक्टमधील एक्स-रे तून येणाऱ्या प्रकाशाचा मागोवा घेतला.
या ऑब्जेक्टमध्ये बहुतांशवेळा न्यूट्रॉन स्टार किंवा जवळच्या ताऱ्याच्या कक्षेतील वायू ओढून घेणारे ब्लॅक होल असतात. न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होलच्या जवळपासचे घटक हे प्रचंड उष्ण होतात आणि चमकतात.
प्रखर एक्स-रे चा भाग हा लहान आहे, त्यामुळे हा ग्रह ताऱ्याचा बराचसा प्रकाश अडवत आहे. त्यामुळे हे पारवाहन शोधून काढणं सोपं आहे. M51-ULS-1 या बायनरी सिस्टिममधील एक्झोप्लॅनेट शोधून काढण्यासाठी स्टिफानो यांच्या टीम मेंबर्सने हे तंत्रज्ञान वापरलं.
"हेच तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं आहे आणि इतर आकाशगंगेमधील ग्रह मालिका शोधण्यासाठी वापरलं जाणारं सध्याच्या परिस्थितीतलं एकमेव तंत्रज्ञान आहे," डॉ. रोझान डी स्टिफानो यांनी म्हटलं आहे. स्टिफानो हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स इन केंब्रिज, यूएसमध्ये कार्यरत आहेत.
"हे अतिशय आगळंवेगळं तंत्रज्ञान आहे," असंही त्यांनी म्हटलं.
भविष्यातला ग्रहांचा शोध
या बायनरीमध्ये ब्लॅक होल किंवा न्यूट्रॉन तारे आहेत, जे एका सहकारी ताऱ्याभोवती फिरतात ज्याचं वस्तुमान हे सूर्याच्या 20 पट अधिक आहे. 'न्यूट्रॉन स्टार' हा कधीकाळी प्रचंड आकारमानाच्या ताऱ्याचाच भाग होता.
हे पारवाहन जवळपास तीन तास चाललं होतं, ज्यामध्ये एक्स-रे चं उत्सर्जन हे शून्यापर्यंत खाली आलं. या आणि अन्य माहितीवरून खगोलतज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला की हा संभावित ग्रह शनीच्या आकाराचा असू शकतो. आणि न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होलच्या कक्षेचं अंतर हे सूर्य आणि शनीमध्ये जेवढं अंतर आहे, तेवढं असू शकतं.

फोटो स्रोत, NASA / ESA / S. BECKWITH / HHT
डॉ. डी स्टिफानो यांनी म्हटलं की, मिल्की वेमधील एक्झोप्लॅनेट्स शोधण्यासाठी वापरलं गेलेलं हे तंत्र इतर आकाशगंगांमधील ग्रह शोधताना काहीसं कमी पडतं. कारण अंतर जास्त असल्यामुळे टेलिस्कोपर्यंत येणारा प्रकाश हा कमी कमी झालेला असतो. अनेक ऑब्जेक्ट हे छोट्याशा जागेत दाटीवाटीनं असतात, त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे शोधून काढणं हे अधिक अवघड होतं.
आपले निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी अधिक डाटा आणि माहितीची आवश्यकता असल्याचंही हे संशोधक मान्य करतात. पण या संभावित ग्रहाच्या कक्षेचं अंतर पाहता, तो पुढच्या सत्तर वर्षांमध्ये त्याच्या बायनरी पार्टनरसमोर येणार नाही. त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये या ग्रहाचं पुढचं निरीक्षण करण्याची संधी मिळणार नाही.
अजून एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे की, खगोलतज्ज्ञ ज्याला डिमिंग समजत होते (टेलिस्कोपपर्यंत कमी कमी होत पोहोचणारा प्रकाश) ते एक्स-रे सोर्समधून वायूंचा ढग आणि धूळ गेल्यामुळे झालेलं असू शकत.
अर्थात, ही गोष्ट वायूंच्या ढगामुळे झालेली असल्याची शक्यता स्टिफानो यांना फार शक्य वाटत नाही.
"आम्हाला माहीत आहे की, आम्ही खूप धाडसी दावा करत आहोत. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की अन्य खगोलतज्ज्ञ याकडे अधिक काळजीपूर्वक पाहतील," असं प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधील ज्युलिया बर्न्डटसन यांनी म्हटलं.
हे संशोधन नेचर अस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








