नेब्रा स्काय डिस्क : ताऱ्यांचा 3600 वर्षांपूर्वीचा नकाशा खरा की खोटा हा वाद का?

नेब्रा स्काय डिस्क

फोटो स्रोत, Getty Images

तंत्रज्ञानामुळे 21 व्या युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या. एवढ्या सहज की जमिनीवरुन आपण अंतराळ, तारे आणि ग्रहसद्धा पाहू शकतो. इतकंच काय तर माणूस चंद्रावर पोहचला, मंगळावर पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अंतराळातले नवनवीन संशोधन सतत समोर येत असतात. पण शेकडो वर्षांपूर्वी असं नव्हतं.

खगोल शास्त्रज्ञ आणि त्यासंबंधी जाणकार तेव्हाही होते परंतु आजसारखे आधुनिक तंत्रज्ञान त्यावेळी नव्हते. मर्यादित साधनांच्या माध्यमातून खगोलशास्त्राचं संशोधन करावं लागायचं.

त्याकाळात धातूचा नकाशा बनवून ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास केला जात होता. असाच एक बहुमूल्य नकाशा ब्रिटिश संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक जुना ताऱ्यांचा नकाशा जनतेला पाहाण्यासाठी उपलब्ध केला जाईल.

नेब्रा स्काय डिस्क जवळपास 3600 वर्ष जुना असल्याचं मानलं जात आहे. हा नकाशा कांस्य युगातील असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

1999 साली हा नकाशा जर्मनीत मिळाला. या कांस्य तबकडीला 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे पुरातत्त्व संशोधन मानले जाते. परंतु या संशोधनावरुन वाद आहेत.

नेब्रा स्काय डिस्क

फोटो स्रोत, Getty Images

काही संशोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेब्रा डिस्कचा व्यास जवळपास 30 सेमी आहे. यात निळा आणि हिरवा रंग आहे. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांना सोनेरी रंग आहे.

युनेस्कोच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या जागतिक यादीत या डिस्कचा समावेश केला आहे.

सोन्याच्या धातूच्या शोधाच्या प्रारंभासंदर्भातही या डिस्कच्या माध्यमातून संकेत मिळतात. जर्मनीच्या स्टेट म्युझियम ऑफ प्री हिस्ट्री अंतर्गत या डिस्कची नोंद आहे. परंतु याला ब्रिटिश संग्रहालयाला उधार देण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात स्टोनहेज प्रदर्शनात हे उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याचं ब्रिटिश संग्रहालायने सांगितलं आहे.

'द वर्ल्ड ऑफ स्टोनहेज' प्रदर्शनाचे क्यूरेटर नील विल्किन यांनी याबाबत म्हटलं की, "हे डोळे उघडणारं आहे."

नेब्रा स्काय डिस्क

फोटो स्रोत, ullstein bild

नेब्रा डिस्कवर सूर्य आणि त्यासोबत इतर खगोलीय ग्रहांना दर्शवलं आहे. उत्तर यूरोपीय कांस्य युगात सूर्य धर्माचं केंद्र होतं असं जाणकार मानतात.

पुरातत्त्व आणि कांस्ययुगाचे तज्ज्ञ प्राध्यापक मिरांडा एल्डहाऊस-ग्रीन यांनी यापूर्वी बीबीसीला सांगितलं होतं की, नेब्रा डिस्कवर असलेलं प्रतिक विश्वासप्रणाली दाखवतं. लोक याकडे स्वर्ग म्हणून पाहतात, त्याची पूजा करतात, सूर्य आणि चंद्राची पूजा करतात.

नेब्रा डिस्कवर या सगळ्याचे प्रतिक असल्याने त्याकाळात लोक काय पाहत होते, त्यांची मान्यता आणि विश्वास काय होता याबाबत माहिती मिळते असंही ते सांगतात.

ही डिस्क जर्मनीच्या नेब्रा शहराजवळ तलवार, कुऱ्हाड आणि कांस्ययुगाशी संबंधी इतर वस्तूंसोबत सापडली होती.

बेकायदेशीर ट्रेजर हंटर्स यांना याची माहिती मिळाली होती. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्यांनी हे शोधलं आणि नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

काही लोक याला कांस्य युगाशी संबंधीत मानत असले तरी काही जणांनी हे बनावट असल्याचा दावा केला आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली होती. जर्मन संग्रहालयाने मात्र असे सर्व दावे फेटाळले.

द वर्ल्ड ऑफ स्टोनहेज पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 17 जुलैपर्यंत खुले असेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)