You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेक्सिको अपघातः स्थलांतरित लोकांना नेणारा ट्रक कोसळला, 54 ठार
दक्षिण मेक्सिकोत ट्रक उलटून 54 जणांचा मृत्यू झाला असून, 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानं या अपघाताबद्दल ही माहिती दिली.
चियापासजवळील ब्रिजजवळ ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी जवळपास 100 स्थलांतरित लोक ट्रकमध्ये होते. हे लोक मध्य अमेरिकेतील होते.
या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते.
अपघातातील दुखापत झालेल्या जवळपास 58 जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती चियापस सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीचे लुईस मॅन्यएल ग्रासिया यांनी दिली.
त्यांच्या माहितीनुसार, या अपघतात प्रौढ स्त्री-पुरुषांसह लहान मुलंही होती.
या ट्रकमधील लोक होंडुरासमधील स्थलांतिरत होते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या प्रमुखाने रॉयटर्स न्यूज एजन्सीला दिली.
स्थलांतरितांना वाहून नेणारा हा ट्रक वळणावर घसरला आणि चियापास राज्याची राजधानी टक्स्टला गुटेरेझकडे जाणाऱ्या रस्त्यारील फूटपाथवर जाऊन धडकला.
कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांचं सर्वात मोठं ट्रान्झिट पॉईंट म्हणून चियापासची ओळख आहे.
मध्य अमेरिकेतील गरिबी आणि हिंसेला कंटाळून शेकडो लोक दरवर्षी मेक्सिकोमार्गे स्थलांतर करत अमेरिकेत पोहोचतात. अनेकजण स्मगलर्सना पैसे देऊन स्थलांतर करतात. मात्र, एकाच वाहनात अनेकांना कोंबून असे वाहून नेले जाते, जे अत्यंत धोकादायक ठरतं.
मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेझ मॅन्युएल लोपेझ ओब्रॅडर यांनी या दुर्घटनेबाबत म्हटलं की, अत्यंत वेदनादायी घटना आहे. तसंच, या घटनेबद्दल अत्यंत वाईट वाटतंय, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)