बुलडाण्यातल्या भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू

बुलडाण्यात भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ टिप्पर पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.

लोखंडी रॉड घेऊन टिप्पर मजुरांसह समृद्धी महामार्गाकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका बसला जाण्यासाठी जागा करून देताना टिप्पर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

या टिप्परमध्ये लोखंडी रॉड होते. या रॉडखाली 16 मजूर दाबले गेले. त्यातील 8 जणांचा घटनास्थळी तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

अपघात इतका भीषण होता की टिप्पर पलटी झाल्यानंतर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दाबले गेले. स्थानिक नागरिक तात्काळ मदतीला धावले. अनेक जखमींना स्थानिक नागरिकांनीच बाहेर काढलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)