आरोग्य : प्लास्टिकच्या बाटल्यांतील पाणी प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो का?

फोटो स्रोत, Getty Images
खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळं आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत कायम वेगवेगळ्या प्रकारचे दावे समोर आलेले आहेत.
त्यात सध्या आणखी एक ई-मेल व्हायरल होत आहे. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात ठेवल्यानं त्यातून काही रसायनं निघतात आणि ती बाटलीतील पाण्यात मिसळली जाऊन शरीरात जातात, त्यामुळं कॅन्सर होऊ शकतो असा दावा त्यात करण्यात आलेला आहे.
या ईमेलमध्ये एका विद्यापीठाच्या रिसर्च पेपरचा दाखला देण्यात आला आहे. पण हा एक फेक ईमेल आहे.
बिस्फेनॉल-ए बाबत काहीशी चिंता
व्हायरल होत असलेला हा ईमेल फेक असला तरी, बिस्फेनॉल ए (बीपीए) नावाच्या एका रसायनाबाबत शास्त्रज्ञांमध्ये खरंच काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे.
पॉलिकार्बोनेट कंटेनर, जेवणाच्या डब्याच्या बॅग आणि त्याचबरोबर पावत्या आणि तिकिटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदांमध्येदेखील बीपीए रसायन आढळतं.

फोटो स्रोत, Getty Images
बीपीए फिमेल हार्मोनप्रमाणे परिणाम करून त्याद्वारे नुकसान पोहोचवू शकतं असं दावा करण्यात आला आहे. मात्र, यामुळं आरोग्यासंबंधी काही त्रास होऊ शकतात हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.
पण हे रसायन धोकादायक ठरू शकतं, याचे काही पुरावे आहेत का?
बीपीए मोठ्या प्रमाणावर शरीरात गेल्यास त्यामुळं, उंदीर, गर्भधारणा झालेल्या किंवा लहान उंदरांसाठी हानीकारक ठरू शकतं, हे याबाबत केलेल्या संशोधनावरून स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library
मात्र, मानवी शरीरात बीपीएसारख्या रसायनांचं पचन वेगळ्या पद्धतीनं होतं. मानवी शरीरात रोज किती प्रमाणात बीपीए जाऊ शकतं आणि त्यामुळं काही नुकसान होतं किंवा नाही, याबाबत अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नाही.
पॅकेजिंगसाठी अनेक वर्षांपासून बीपीएचा वापर केला जात आहे. एका अंदाजानुसार विकसित देशांच्या बहुतांश प्रौढ व्यक्तींच्या मूत्रामध्ये बीपीए आढळू शकतं.
असं असलं तरीही, प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये बीपीएचा वापर टाळून याचा धोका कमी केला जाऊ शकतो. बहुतांश प्लास्टिकवर एक नंबर लिहिलेला असतो. त्यावरून त्यात बीपीए आहे किंवा नाही, हे समजू शकतं.
बीपीएबाबत माहिती कशी मिळवाल?
हा नंबर एका त्रिकोणी पुनर्वापराबाबतच्या चिन्हामध्ये (♲) असतो. 1, 2, 4 किंवा 5 या नंबरचा अर्थ म्हणजे, ते प्लास्टिक 'बीपीए मुक्त' आहे.
तर 3 आणि 7 चा अर्थ त्या प्लास्टिकमध्ये बीपीए असू शकतं. तुम्ही प्लास्टिक गरम केलं आणि त्यावर डिटर्जंट टाकलं तर त्यातून बीपीए निघू शकतं. प्लास्टिकवर 6 आकडा असेल तर त्याचा अर्थ म्हणजे ते पॉलीस्टायनिनपासून तयार झालेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युरोपीय संघामध्ये लहान मुलांच्या बाटल्या खेळण्यांमध्ये वापर होणारं प्लास्टिक हे 'बीपीए मुक्त' असणं गरजेचं असतं. मात्र, जेवणाच्या डब्यांच्या बॅग, आणि काही पावत्यांमध्येही बीपीए असतं. त्यामुळं सर्वसाधारण जीवनात बीपीएपासून दूर राहणं हे अशक्यच आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








