77 फुटी साप तुम्ही पाहिलात का?

बर्फवृष्टी होत असताना त्यापासून स्नोमॅन तयार करणंही अवघड आहे. कारण त्यासाठी बर्फाला शिस्तबद्ध पद्धतीने रचून आकार द्यावा लागतो. हे कमी की काय म्हणून अमेरिकेतल्या एका कुटुंबाने बर्फापासून 77 फूट लांबीचा साप तयार केला आहे.

मॉन मूजली आणि त्यांच्या पाच भावाबहिणींनी दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करत हा खंडप्राय साप तयार केला आहे.

2019 मध्येही या कुटुंबाने बर्फात साकारलेल्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी या कुटुंबाने तयार केलेला वाघ व्हायरल झाला होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली होती.

त्यांनी यावेळी साप बनवला आहे, त्याची लांबी 77 फूट आहे आणि तो जवळपास 23 मीटर विस्तारला आहे. मूजली यांनी आईच्या घरातील बागेत या सापाला तयार केलं आहे.

हा साप बनवण्यासाठी मूजली यांनी किती मेहनत घेतली असा व्हीडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे.

या सगळ्यांनी मिळून सापाचा आकार तयार केला, मग त्यात स्प्रे पेंटने रंग भरण्यात आला आणि मग शेडिंग करण्यात आलं.

मूजली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, आम्ही लहान होतो तेव्हा आमचे बाबा हे तयार करत असत. आम्ही मजेसाठी हे सगळं करतो.

या परिसरातून जा ये करणारे, शेजारपाजारचे हा साप बघून हरखून जात आहेत.

मूजली सांगतात, सापाचे फोटो काढण्यासाठी लोक आवर्जून थांबत आहेत.

फेसबुक पेजवर मूजली यांनी सापाचे फोटो टाकले. अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं की आता तुम्ही काय बनवणार या विचारांच्या प्रतीक्षेत मी राहू शकत नाही.

2019 मध्ये केलेल्या वाघासाठी मूजली कुटुंबीयांचं खूप कौतुक झालं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)